"हुस्न-ए-कश्मीर" (७- अंतिम भाग) — "फ्लॉवर्स ऑफ कश्मीर"

Submitted by जिप्सी on 12 August, 2012 - 11:06

"हुस्न-ए-कश्मीर" या मालिकेतील हा शेवटचा भाग. सदर भागातील कश्मीरमध्ये टिपलेली काहि फुले आणि मुले Happy यांचे प्रचि सादर करत आहे. या मालिकेच्या सर्व भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
५. "हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स
६. "हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग
७. "हुस्न-ए-कश्मीर" (४) — अवंतीपुर
८."हुस्न-ए-कश्मीर" (५) — पहलगाम
९."हुस्न-ए-कश्मीर" (६) — सोनमर्ग
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१ आणि प्रचि ०२
प्रचि ०३ आणि प्रचि ०४
प्रचि ०५ आणि प्रचि ०६
प्रचि ०७ आणि प्रचि ०८
प्रचि ०९ आणि प्रचि १०
प्रचि ११ आणि प्रचि १२
प्रचि १३ आणि प्रचि १४
प्रचि १५ आणि प्रचि १६

प्रचि १७ आणि प्रचि १८


प्रचि १९ आणि प्रचि २०

प्रचि २१ आणि प्रचि २२

प्रचि २३ आणि प्रचि २४

प्रचि २५ आणि प्रचि २६
प्रचि २७ आणि प्रचि २८
प्रचि २९ आणि प्रचि ३०

=======================================================================
=======================================================================
||समाप्त||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच भारी....
मुले ही देवाघरची फुले...भारी कन्सेप्ट रे ......

सगळेच प्रचि क्लास

योगेश...

"काश्मिर" सफर इथल्या सर्व सदस्यांना ज्या अप्रतिम अशा प्रकाशचित्रांतून तुम्ही घडवून आणली त्या प्रयासांना खरोखरी तोड नाही. मला खात्री आहे की या मालिकेतील अशा देखण्या फोटोंचा आस्वाद घेतल्यावर धाग्याला भेट देणार्‍या सदस्य बंधूभगिनींच्या मनात नक्कीच येत असेल की, याची देहा याची डोळा कधीतरी अशी सफर मुलाबाळांसह प्रत्यक्षात व्हावीच.

लेखाच्या शेवटी तुम्ही "समाप्त" असे टंकून काश्मिर प्रचि विषय बंद केला, तसे करताना तुम्हाला काहीतरी चांगले फाईल करायला लागले म्हणून जी हुरहूर वाटत असेल, त्याच्या कैकपटीने अधिक माझ्या सारख्या सदस्यांना वाईट वाटत असेल....अशासाठी की, आता काश्मिर-दिल्ली सफर माबोच्या प्रथम पृष्ठावरून दूर होणार.

ऑफिसमधील दिवसभरातील घडलेल्या कामातील कोणत्याही कारणास्तव सायंकाळी जर निष्कारण डोकेदुखी होत असेल, तर मग घरी आल्यावर, चहा घेऊन झाल्यावर, एका बाजूला विनअ‍ॅम्पवर तलत, अन् दुसर्‍या बाजूला तुम्ही वर दिलेल्या कोणत्याही लिंकमधील सुंदर फोटो पहात निवांत बसणे, असा एक दिनक्रमच झाला होता...त्याचे रीझल्ट्सही छानच यायचे.

वेल.....थॅन्क फ्रेन्ड फॉर गिव्हिंग अस धिस काईंड ऑफ ट्रेझर.

अशोक पाटील

विसाव्या फोटोतलं गर्द जांभळं(!?) फूल खूप सुंदर! कधी बघितलं नव्हतं.

मुलांचे फोटो गोड आहेत. पण मायबोलीवर स्वतःच्या, आप्तेष्टांच्या, अनोळखी व्यक्तींच्या मुलाबाळांचे फोटो टाकणं (मला व्यक्तीशः) योग्य वाटत नाही.

वॉव किती देखणे फोटो आहेत..... कश्मिर मधील लोक सुंदर आहेत असे एकले होते त्यांचे गाल नैसर्गिकपणे सफरचंदासारखे लालसर गुलाबी असतात, आता या फोटोंवरुन खात्री पटली Happy

ही थीम (मुले आणि फुले) प्रचंड आवडली -
तू नुसता फोटोग्राफर नाहीचेस - "एक भन्नाट कॉम्बिनेशन" = "जिप्सी" हे - प्रत्येक भागातून हे दाखवून देतोस तू - हॅट्स ऑफ.....
मुलांच्या चेह-यावरचा निरागसपणा टिपायचा हे फार अवघड काम तू लीलया केलंस रे.......

फुलं म्हटल्यावर ज्या अपेक्षेनं धागा उघडला, त्यापेक्षा कितीतरी जास्त गोड बघायला मिळालं.

जिप्सी, तुझ्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. आणि इतक्या सुंदर सफरीबद्दल धन्यवाद. Happy