पंछी बनु...उडता फिरु...मस्त गगन में...!!! माझा स्काय डायव्हिंग अनुभव.

Submitted by शापित गंधर्व on 11 August, 2012 - 18:47

काश मला या पक्षांसारखं उडता येत असतं...

प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येणारा हा विचार लहानपणी माझ्याही मनात बर्‍याच वेळा यायचा... स्पेशली जेंव्हा मी कटलेली पतंग पकडायला तिच्या मागे पळायचो तेंव्हा... काश आत्ता मला उडता आलं असतं... वरच्या वर मी या पतंगाचा मांजा पकडला असता आणि बाकी सगळ्या पोरांना टुक टुक करत लांब निघुन गेलो असतो... पण ते विचार तसेच हवेत विरुन जायचे.

आत्ता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे या विकांतास मी चक्क हवेत उडण्याचा अनुभव घेतला... आज मै उपरss आसमाँ निचेss... टाईप. नाही नाही... मी परत कुठला ही विमान प्रवास केला नाही...तर मोकळ्या हवेत, उघड्या आकाशाखाली, पंख असल्याच्या अविर्भावात हात पसरुन, २०० किमी च्या वेगाने अंगावर वारा झेलत जमिनीकडे झेपावण्याचा अनुभव घेतला... हो बरोबर ओळखलत... मी चक्क स्काय डायव्हींग केल :-).

काय तो अनुभव वर्णावा महाराजा... आहाहा... असं शब्दात मांडताच येणार नाही... फक्त अनुभवता येईल. तरीपण जसं जमेल तसं मोडक्या तोडक्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतो.

आधिच बुकींग केलेली होती तरी मंगळवारी स्नोफॉल झाल्या मुळे शनिवारच्या हवामाना बद्दल साशंक होतो. पण दैवाने साथ दिली आणि शुक्रवार पासुनच आकाश निरभ्र होऊ लागलं. शनिवारची स्वच्छ सोनेरी सकाळ उजाडली आणि आम्ही जोहानसबर्ग पासुन १५० किमी वर असणार्‍या "विट्बँक स्कायडायव्हींग क्लब" च्या अंगणात पोहोचलो.

माझ्या ऑफिस मधले दोन सहकारी माझ्या सोबत स्काय डायव्हिंग करणार होते. सकाळी १०:०० ते १२:०० चा स्लॉट बुक केला होता. आम्ही आर्धातास आधिच म्हणजे ९:३० ला तिथे पोहोचलो. गेल्या गेल्या जेसनशी ओळख झाली. जेसन तिथला स्कायडाईव्ह इंस्ट्रकटर आहे. आम्ही काही फॉर्मस वर सह्या केल्या ज्यात लिहिलं होतं की स्कायडायव्हींग दरम्यान कुठलाही अपघात झाल्यास त्यास "विट्बँक स्कायडायव्हींग क्लब" जबबदार रहाणार नाही. मग आम्हाला स्कायडायव्हींग बद्दल एक छोटी फिल्म दाखवण्यात आली ज्यात स्कायडायव्हींग कशी करावी, स्कायडायव्हींग दरम्यान काय करावे, काय करु नये अशा सुचना दिलेल्या होत्या. थोडक्यात काय तर स्कायडायव्हींग चे प्रशिक्षण देणारी फिल्म दाखवण्यात आली. मग तिथुन आमची वरात प्रत्यक्ष युध्दभुमी वर म्हणजे ड्रॉपझोन वर आली आणि तिथे परत एकदा स्कायडायव्हींगचे प्रत्यकक्षिक दाखवण्यात आले. आम्ही सगळेच पहिलटकर असल्यामुळे सगळेच टँडम जंप करणार होतो. (यात एका अनुभवी स्कायडाव्हरच्या शरीराला तुम्ही पट्ट्याने बांधलेले असता. सगळ्या तांत्रीक बाबींची जसे योग्यवेळी पॅराशुट उघडणे वगैरे ची काळजी तो घेतो जेणे करुन तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता पुर्ण पणे स्कायडायव्हींगची मजा घेऊ शकाता). सगळ्यांना सगळ समजलय याची खात्री झाल्यावर आम्हाला स्कायडायव्हींगला सज्ज होण्यासाठी एक खास पोशाख आणि काही पट्टे दिले जे आम्ही आमच्या शरिराभोवती बांधले आणि विमानात जाऊन बसलो. मी पहिल्यांदाच इतक्या छोट्या विमानात बसत होतो. न्युयॉर्क ते ब्रॅडली (कनेक्टीकट) प्रवास मी २० आसनी विमातुन केला होता. पण हे विमान त्याहुनही खुप छोटे होते. आतुन जेम तेम एका कारच्या आकारचे, पण कुठल्याही सिटींग अ‍ॅरेंजमेंट शिवाय. सरळ भारतीय बैठक मारायची. फक्त पायलट साठी एक खुर्ची होती. पायलट सोडुन जेमतेम ९ माणस बसु शकतील अशी अंतर्गत रचना. कसे बसे सगळे आत मधे बसल्यावर विमानाने आकाशात झेप घेतली. साधारण १५/२० मिनिटात आम्ही १०००० फुट उंचीवर जाऊन पोहोचलो. मी खालचा देखावा देखावा बघण्यात गुंग होतो तेव्हड्यात पायलट्च्या आवाजाने माझी तंद्री भंगली... डोअर, ओपन द डोअर. माझ्या टँडमने विमानाचा दरवाजा उघडला आणि पहिल्यांदाच भितिची शिरशिरी पटकन माझ्या अंगातुन गेली. अबबsss. तब्बल १०००० फुट उंचीवर मी विमानाच्या दरवाज्यात पाय खाली सोडुन बसलो होतो. खाली मोठमोठाली घरं अगदी किड्या-मुंग्यां सारखी दिसत होती. इतक्या उंचावरुन सरळ खाली उडी मारयची??? पॅराशुट आहे रे ... पण ते योग्य वळी ओपन नाही झालं तर??? बास, मी इतकाच विचार करु शकलो.... त्या पुढे विचार करायला माझ्या टँडमने मला संधिच नाही दिली... दिला तो हलकासा धक्का आणि मी सरळ विमाना बाहेर फेकला गेलो. एका सेकंदासाठी पार तंतरली होती. पण दुसर्‍याच क्षणी आठवलं... अरे हे असच तर ठरलं होतं.... अशीच तर करायची असते टँडम जंप.... आणि मग मी एकदम रिलॅक्स झालो आणि फ्री फॉल ची मजा घेऊ लागलो. मस्त हात पसरुन उडण्याचा आनंद घेऊ लागलो. त्या वेळी जाणवलं की हा खरा उडण्याचा अनुभव. कही लोक उगाच विमानात बसुन केलेल्या प्रवासाला उडण्याचा अनुभव म्हणतात. जहाजात बसुन तरंगत प्रवास करणं आणि स्वत: पाण्यात पोहण यात जितका फरक अहे तितकाच फरक या उडण्यात आणि विमानात बसुन प्रवास करण्यात होता. साधारण ४० सेकंद (५००० फुटा पर्यंत) आम्ही फ्री फॉल केला आणि त्या नंतर टँडमने पॅराशुट ओपन केल. मग साधारण ८ मिनिट टंडमने हवेतल्या हवेत कधी डावी कडे तर कधी उजवी कडे तर कधी गोल गोल गिरक्या घेत विविध करामती केल्या आणि ९ व्या मिनिटाला अम्ही आरामात खाली उतरलो. Happy

प्रचि १: विमानाकडे जातांना
प्रचि २: हेच ते छोटसं विमान
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६: सुपरमॅन स्टाईल
प्रचि ७: मझ्या जंप चे प्रचि घेणारा फोटोग्राफर डावीकडे आणि या जंप मधे मदत करणारा टँडम उजवी कडे
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
यु ट्युब लिंक

!!!समाप्त!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह शागं...................
युट्युब व्हीडीओ खतरनाकच. Happy
एव्हढी एक गोष्ट करायचे मनात आहे......... तुमच्यामुळे चांगले प्रोत्साहन मिळाले Wink

सही
chef-anim-chef-cook-food-smiley-emoticon-000273-medium.gif

शागं

भन्नाट अनुभव आणि हॅट्स ऑफ टू यू !!
सॉल्लीड...........

( मला पण उड्डाण करायचंच होतं रे पण माझा मैत्रीवर गाढ विश्वास असल्याने तू उडी मारली काय नि मी मारली काय एकच.... Wink )

स्स्स्स्स्स्ससही. एक शंका उतरल्यावर / जमिनीवर पाय टेकल्यावर पळायचे नसते का? पडायचे असते?
व हे भारतात कुठे होते कोणाला माहिती आहे का?

वॉव.. ऑसम!!!!! कॉन्ग्रॅचुलेशन्स!!!! Happy
अविस्मरणीय अनुभव ...
पॅरासेलिंग खूप वेळा केलं ,स्काय डायविंग करण्याचे गट्स झाले नाहीत..

Pages