गाण्यांचे ट्रॅक्स कसे व कुठे मिळवावेत ?

Submitted by शुगोल on 11 August, 2012 - 13:27

लोकहो,
-- स्थानिक म. मंडळासाठी मराठी गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. काही गाण्यांचे ओरिजिनल ट्रॅक्स हवे आहेत. ते कुठे मिळतील ? त्यासंबधी लिंक्स मिळू शकतील काय ?
-- किंमतीचा काही अंदाज ?
-- ट्रॅक्स चे स्केल बदलता येते का ? उत्तर ' हो ' असेल तर कुठे, केवढ्याला ?
ही काही गाणी---
- फुलले रे क्षण माझे फुलले रे
- का रे अबोला
- काल पाहिले मी स्वप्न गडे
- बाई बाई मन मोराचा कसा पिसारा
- स्वप्नात रंगले मी
- का कळेना कोणत्या क्षणी
- तोच चंद्रमा नभात
- गेले ते दिन गेले
- मानसीचा चित्रकार तो
- नसतेस घरी तू जेव्हा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओरिजिनल ट्रॅक्स म्हन्जे नक्की काय? तुम्हाला तुनळी मध्ये मिळतील ना हे सगळे गाणे. की तुम्हाला म्युझिक कम्पोझिशन हवे आहे?

यु ट्युबवर मिळतील.

यु ट्युब डाउन लोडर गुगलून बघा. फ्री आहे. त्यातून यु ट्युब विडिओ डाउनलोडून घ्या . ते ऑडिओ मध्ये त्याच सॉफ्ट वेअरने कन्वर्ट करा.

सगळी गाणी ओरिजिनल स्केलला कुठलाही मनुष्य म्हणू शकेल, अशीच आहेत.. कशाला स्केल बदलताय??? आणि यदाकदाचित आयत्या वेळी गायकाने स्केल बदललेच, तर ऑर्केस्ट्रावाले अ‍ॅडजेस्ट करतात Proud स्केल ही त्यांची डोकेदुखी असते, आपली नव्हे. आपण बिन्धास्त होऊन म्हणायच Biggrin

लाईव्ह ऑर्केस्ट्रा नाहीये, म्हणून ओरिजिनल गाण्याचा फक्त म्युझीक काँपोझीशन असलेला ( गाण्याचे शब्द विरहित ) ट्रॅक मिळाला तर बरे होईल. हा ट्रॅक त्या त्या गायकाच्या स्केल शी जुळणारा असतो. आमच्या गायकांच्या स्केल शी जुळेल अशा रितीने ट्रॅक बदलून घेता येतो का ?

मेर गाना वरचे ट्रॅक डाउनलोडेबल नाहीयेत. कार्यक्रम बहुतेक वेळा एखाद्या शाळेच्या हॉल मधे असतो. तिथे इंटरनेटला अ‍ॅक्सेस नसतो.

शुगोल, माझ्या बहिणीने आणि मायबोलीकर रार ह्यांनी अ‍ॅरिझोनातच तयार ट्रॅकवर गाऊन मराठी गाण्यांचा कार्यक्रम केला होता. कॅरिओकी सिस्टीम असेल तर मूळ ट्रॅकमधील पट्टी आपल्या सोयीनुसार बदलता येते. तुम्ही रार ह्यांना संपर्क करा. त्या तुम्हाला सगळेच तपशील पुरवू शकतील Happy

'तोच चंद्रमा नभात'चा काराओके ट्रॅक इथून घेऊ शकता.
https://docs.google.com/file/d/0B5kQcMTmbC1QREg0aExfZ1ltOFE/edit
तुमच्याकडे ऑडेसिटी हे सॉफ्टवेअर नसल्यास जालावरून डालो करून घ्या ..फुकट आहे...त्यात स्केल,टेंपो,स्पीड हवं ते बदलता येतं.

ऑडासिटी हे सॉफ्टेवेअर वापरुन काराओके ट्रॅक कसा बनवायचा याची स्टेप बाय स्टेप कृती खालील ब्लॉगवर सचित्र माहिती मराठीतुन दिली आहे
mp3 गाण्यातले संगीत तसेच ठेवून आवाज कसा वेगळा कराल?