हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

Submitted by शेळी on 11 August, 2012 - 05:12

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.

त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते.

दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल.

हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी.

मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Proud आता पुन्हा मढे होऊन पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Proud )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेळीच्या मुखवट्यामागचे जामोप्या अचानक प्रकटले...
जामोप्या, नाटकाच्या भाषेत बोलायचं तर तुमचं ’बेअरिंग’(अवधान) सुटलं हो. Happy

चर्चगेटच्या बाहेर आहे ते काय आहे? >>> ती पाण्याची विहिर आहे. पारसी लोकं ती पवित्र मानतात आणि आजूबाजूच्या परिसरातले पारसी तिथून पाणी प्यायला घेऊन जातात.

>>>> ज्याला दहन करुन घ्यायला आवडेल त्याने तसे करावे, ज्याला दफन करुन घ्यायचे आहे, त्याने तसे करावे. <<<<
मेल्यावर कस काय बोवा करुन घ्याव ज्याच त्यान?
खान्देकर्‍यान्चा काही विचार करणार की नै?
अन ते खड्डे खणणारे? त्यान्ची बिदागी कोण देणार? त्यान्च्या श्रमाला काही किम्मत आहे की नै? Proud

फारेण्डा, विद्युत दाहिनीमधे वीजेच्या कॉईल्सद्वारे उष्णता निर्माण केली जाते, तिथे लाकडे वापरत नाहीत, शिवाय की मृतदेह आत ढकलताना सोईचे जावे म्हणून बाम्बूच्या दाहिनीच्या कर्मचार्‍यान्नी बनविलेल्या तिरडीवर ठेवतात.

हिन्दू धर्मातही बालकान्चे दफनच करतात. जाळत नाहीत.

बाकी लाकडाच्या खर्चाची इतकीच काळजी असेलच, तर आधी महाराष्ट्रभरच्या, गेला बाजार कोकणातल्या नगरपालिकान्ची स्मशाने व तिथल्या सोई पाहुन आला अस्तात तर बरे झाले अस्ते. कोकणात चिपळूणात लाकडे शास्त्रापुरती लावतात, बाकी दुचाकी/चारचाकी गाड्यान्चे जुने टायर जाळून मृतदेह भस्मसात करतात. (ये ऑखोदेखा हाल है Wink ) तेव्हा आता शेळीमहोदया/शेळीमहोदय, टायर (वा लाकडेही) जाळल्यामुळे प्रदुषण होते हा नवाच मुद्दा तुम्हाला मिळालेला आहेच, कारणी लावालच, नै का? Proud

यान्ना एकदा सहा फूट लांम्ब बाय दोन फूट रुंद बाय तिन फूट खोल खड्डा एका दमात खणायला लावला पाहिजेल! Proud मग लाकडेच काय, जे काय जळाऊ मिळेल त्याने पेटवा असे म्हणतील Lol

>>यान्ना एकदा सहा फूट लांम्ब बाय दोन फूट रुंद बाय तिन फूट खोल खड्डा एका दमात खणायला लावला पाहिजेल! फिदीफिदी मग लाकडेच काय, जे काय जळाऊ मिळेल त्याने पेटवा असे म्हणतील हाहा<<

हाण्ण तिच्च्च्या! :हहपुवा:

तेव्हा आता शेळीमहोदया/शेळीमहोदय, टायर (वा लाकडेही) जाळल्यामुळे प्रदुषण होते हा नवाच मुद्दा तुम्हाला मिळालेला आहेच, कारणी लावालच, नै का?

प्रदुष्हण होते म्हणुन किंवा हिंदु कसे मागासलेले वगैरे या हेतूने हा धागा काढलेला नाही. ज्याना जमिनीत गाडून घ्यायचे आहे, त्याना धर्माने / सरकारने सोय करावी, इतकीच बापुडी मागणी आहे.. अशाच विचाराच्या लोकात बाबा आमटे , महात्मा फुले होते हे ऐकून शेळीला आता मूठभर मांस्च चढले आहे. Proud

कदाचित अशा समविचारी लोकान्नी एखादी मसनभूमी सुरुही केली असेल, जर असेल, तर त्यांच्याशी संपर्क व्हावा हा धाग्याचा हेतू आहे.

दफन फुकट होते असे आमचे म्हणणे नाही .. त्यांची बिदागी पोहोच करावी लागेलच. कदाचित, त्यांची बिदागी लाकडापेक्षाही जास्त होत असेल, तरीही एखाद्याला त्याच्या मर्जीनुसार दफनच करुन घ्यायचे असेल, तर त्याला तशी संधी मिळावी.

टायर बर्‍याच ठिकाणी वापरतात.

जामोप्या मला एक सान्ग ...................................

-जर मला दहन हाच पर्याय योग्य वाटत असेल..........
-माझ्या धर्माप्रमाणेच माझा अन्त्यविधी व्हावा अशी माझी इच्छा असेल (दहन)..........
-दफन विधी मला दहनापेक्षा इष्ट वाटतच नसेल..............
-ही वाक्ये सगळेजण एकमुखाने घोषवायला तयार असल्यासारखे इथले प्रतिसाद असतील (तुझा सोडून )

..........तर ...........तू ..........इत्का........... मागे.......... का.......... लागला........ आहेस ??????????

जामोप्या, उपाय सोपा आहे...तू एक काम कर,एक खाजगी जागा विकत घे आणि तिथे ’हिंदूंसाठी दफनभूमी’ असा फलक लाव....आपोआप कळेल तुला...ज्यांना तुझ्यासारखीच इच्छा असेल ते नक्कीच येतील चौकशी करायला....धंद्यापरी धंदाही होईल आणि भविष्यात तुझ्या चिरनिद्रेचीही सोय होईल...कसं? Light 1 घे!

..........तर ...........तू ..........इत्का........... मागे.......... का.......... लागला........ आहेस ??????????

कारण मी अजुण भरपूर जगणार आहे.... आणि आत्तापासूनच समविचारी मंडळीना शोधायला लागलो तर कदाचित आनखी २०-४० वर्षानंतर अशी सुविधा उपलब्ध होईलही .... त्यावेळी हिंदु धर्माचा इतिहास कुणी लिहायला घेतला तर माझ्या या लेखाची / माझी दफन चळवळीची उद्गाता वगैरे नोंद होईल .. Proud Biggrin बाबा आमटे, महात्मा फुले यांचे उदाहरण ऐकले तर असे विचार असलेले लोक नक्कीच प्रयत्न करतील.

विद्युत दाहिनी सुरु होईल असे ५० वर्षापूर्वी कुणाला स्वप्नात तरी वाटले होतेका? पण ५० वर्षात ते आस्तित्वात आलेच ना?

माझे विचार किती लोकाना पटतात, याच्याशी मला कर्तव्य नाही... माझी इच्छ्हा आहे मी दफन होऊन खड्ड्यात पडावे. सरळपणे झाले तर ठीकच नाही तर कॉन्स्टंटाइनसारखा मेल्यावर बाप्तिस्मा घेऊन का होईना धर्म बदलून मी माझी इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करीनच.

सरकारकडून हिंदुना दफनासाठी जागा मिळावी, अशी एखादी चळवळ सुरु व्हायला हवी. तीन दिवसानंतर पुन्हा एकदा त्या जागेला भेट देऊन तिथली चिमूटभर माती पुढील विधीना वापरली जावी.

चर्चगेट स्टेशच्या बाहेरच आहे. >>>

मामींचं बरोबराय.चर्चगेट स्टेशनच्या बाहेर नाही आहे. मलबार हिलवर आहे.
.. पण त्यांनाही गिधाडं कमी पडताहेत,गिधाडांच्याही प्रजाती नामशेष होताहेत..शहरात मिळत नाहीत.
(जब गीदडकी मौत आती है हे खरंच झालंय.)
आता बाल गिधाडांच.संगोपन करण्याचा इशू पारसी समाजात चाललाय. अनेक पारसी आज दहनविधी योग्य मानताहेत.

इलेक्ट्रिक दहनविधी इतकं समाधानकारक काहीच नाही.

नाही म्हणायला बा.भ.बोरकरांनी आपला देह समुद्रात माशांना खायला घालावा असं म्हटलं होत.,एका कर्मठ मत्स्याहार्‍याची परतफेड म्हणून.. :)) कविकल्पना..

मामींचं बरोबराय.चर्चगेट स्टेशनच्या बाहेर नाही आहे. मलबार हिलवर आहे.

हायला, ते बाहेरुन विहिरीगत दिसतं काहीतरी.. मला वाटायचं याच्यातच ढकलतात की काय! Biggrin

http://www.youtube.com/watch?v=NuFMgJSIWLg

दिसली विहीर की ढकलायचं नाही काही !

इलेक्ट्रिक दहनविधी इतकं समाधानकारक काहीच नाही. >>> +१

इलेक्ट्रिक दहनविधी इतकं समाधानकारक काहीच नाही.

हा सेकंड ऑप्शन ठेवायला हरकत नाही.

शेळी
साष्टांग दंडवत
हा लेख/बाफ काहीच्या काही बाफ मध्ये असण्याजोगा आहे. कमीत कमी विनोदी लेखात तरी हलवा शक्य असल्यास.

इलेक्ट्रिक दहनविधीची सोय इतकी वर्ष आहे. तुम्हाला माहिती नाही किंवा करून घ्यायची नाहीये. आणि तसेही तुम्हाला स्वतःचे दफन करायचे असल्यास कोणी अडवले आहे? मुळातच तुमच्या प्रतिक्रिया आणि बाकीच्या ठिकाणाचे लेखन बघता काही न काही कारणाने स्वतःचे उपद्रवमूल्य सतत दाखवायचे असे दिसते. असो. शुभेच्छा. चालू द्यात.

बरोबर! गीदड हा गिधाड या मराठी शब्दाचा हिंदी अपभ्रंश नाहि. Happy

आयला, जामोप्या (वाघाची) शेळी झालेली पाहुन फार वाईट वाटले...

चैतन्य इन्या,

अहो किमान लेख वाचायचे तरी कष्ट घ्या! पहिल्याच परिच्छेदात त्यांनी लिहिले आहे :
>>हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.<<

अन तुम्ही म्हणता:
>>चैतन्य ईन्या | 12 August, 2012 - 00:22

इलेक्ट्रिक दहनविधीची सोय इतकी वर्ष आहे. तुम्हाला माहिती नाही किंवा करून घ्यायची नाहीये.
<<<<

आधीच ठरवून, वा कुणीतरी सांगितले म्हणून प्रतिसाद टाकायचा असे आपण करता आहात काय? त्यांना वाटले त्यांनी लिहिले. तुम्हाला उपद्रव कसा झाला?

Happy

Pages