श्रावणाच्या चिंब धारा

Submitted by सांजसंध्या on 10 August, 2012 - 04:05

एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली आणि आता कामात असताना कविता स्फुरली. इथे द्यायचा मोह आवरता आला नाही. श्रेय त्या ओळीला (ओळखालच तुम्ही) Happy )

श्रावणाच्या चिंब धारा

अवचिता भेटीत या तू,
चांदण्यांचे गीत गावे
आणि गाताना हळूसे,
ऐकू माझे नांव यावे

मन्मनींच्या उंच लाटा
वादळाने वादळाव्या
सागरा रे चंद्रवेड्या
तू मला लिपटून घ्यावे

श्रावणाच्या चिंब धारा
आठवांशी दंग व्हावे
त्या खुणांनी, ओळखीच्या
अंग अंगी मोहरावे

धुंद वारा, बोचरासा
चेतवावा, देह सारा
झिलमिल्या या पावसाने
तव मिठीशी, चिंबवावे

बावरूनी सांज यावी
तू जरासे बावरावे
रात्र गेली रे सरूनी
हे तिला ना आठवावे

- संध्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकुण कवीता मस्तच....
सरळ..सहज्..नी सुन्दर्.....मला आवडली...

सागरा रे चंद्रवेड्या
तू मला लिपटून घ्यावे
....ए मला हे खुपच आवड्ल......शुभेच्छा....

सावरी

सन्ध्याजी धन्स !!

आपले स्मित पाहून असे जाणवते आहे की.............<<श्रेय त्या ओळीला (ओळखालच तुम्ही) >>>
असे जे तुम्ही म्हणालात ती हीच ओळ असावी कदाचित .
मला अख्ख्या कवितेत झिलमिल्या हा एकच शब्द इतर सर्वान्पेक्षा वेगळ्या धाटणीचा वाटला

असो .......
मी जर बरोबर ओळखले असेन तर काही बक्शीसी वगैरे जाहीर करणार आहात की कसे Wink

ती एका गाण्याची पहिली ओळ कुठली हेही ओळ्खा अन् सान्गा असे काही सान्गू नका
ती ओळच सान्गून टाका डायरेक्ट Happy

पहिली ओळ शक्य असेल तर वेगळ्या पद्धतीने लिहीण्याचा प्रयत्न करून पाहा .कारण दुस-या ओळीपासून लय व ताल चांगला लागत आहे. कविता मनापासून आवडली.

अवचिता भेटीत या तू,चांदण्यांचे गीत गावे
आणि गाताना हळूसे,ऐकु माझे नांव यावे

मन्मनींच्या उंच लाटा वादळाने वादळाव्या
सागरा रे चंद्रवेड्या तू मला लिपटून घ्यावे

श्रावणाच्या चिंब धारा आठवांशी दंग व्हावे
त्या खुणांनी, ओळखीच्या अंग अंगी मोहरावे

धुंद वारा, बोचरासा चेतवावा, देह सारा
झिलमिल्या या पावसाने तव मिठीशी, चिंबवावे

बावरूनी सांज यावी तू जरासे बावरावे
रात्र गेली रे सरूनी हे तिला ना आठवावे

अरे स्सहीच ....ही गझल होवू शकते ...मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे.सारखी !!

वैवकु

मनापासून धन्यवाद. Happy लक्षातच नव्हतं आलं. मूळ गाणं पण गझल आहे हे लक्षात नव्हतं. स्पष्टपणे कबूलच करायचं तर तेव्हढी ओळच माहीत होती. ( अज्ञान आणि दुसरं काय !) आभार सर्वांचे !!!

... छान.
"श्रावणाच्या चिंब धारा
आठवांशी दंग व्हावे
त्या खुणांनी, ओळखीच्या
अंग अंगी मोहरावे" >>> हे अधिक आवडलं.

धुंद वारा, बोचरासा
चेतवावा, देह सारा
झिलमिल्या या पावसाने
तव मिठीशी, चिंबवावे>>> मस्त.... एकुणच मस्त जमलिये!!! भारी Happy

सुप्र. अखिल मानवजात यांच्याकडे या बाफचा अर्ज धाडून देण्याचे करावे Lol