सावली सुद्धा स्वत:ची सोबतीला आज नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 9 August, 2012 - 11:02

गझल
सावली सुद्धा स्वत:ची सोबतीला आज नाही!
कोण मी? कोठे निघालो? कोणता अंदाज नाही!!

भोवती माझ्या स्मशानी शांतता आहे अशी की;
चालल्या झुंडी दिशांच्या, पण कुठे आवाज नाही!

ह्या अवस्थेला मनाच्या काय देवू नाव सांगा?
मी फिदा नसलो तरी कोणावरी नाराज नाही!

ते ऋतू गेले जयांना झिंग जगण्याचीच होती;
माझिया जगण्यात सुद्धा आज माझा बाज नाही!

केवढ्या जवळी उभा होता समुद्राचा किनारा!
लुप्त होणा-या नदीने ऎकली का गाज नाही?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवढ्या जवळी उभा होता समुद्राचा किनारा!
लुप्त होणा-या नदीने ऎकली का गाज नाही? ..... छान.

भोवती माझ्या स्मशानी शांतता आहे अशी की;
चालल्या झुंडी दिशांच्या, पण कुठे आवाज नाही!>>>>>>>.मस्त सर हा शेर खूप आवड्ला
'स्मशानी' हे शांततेला दिलेले विषेशण आहे का? 'माझ्या' नन्तर स्वल्पविराम हवाय मग !!

इतर शेर नेहमीप्रमाणे आवडले