उखाणा

Submitted by दाद on 9 August, 2012 - 03:13

शशांकच्या आग्रहावरून Happy - http://www.esnips.com/displayimage.php?pid=34176613

मेंदीभारलं सारंssवणं
शहार अंगणं
आठंssवून

पहिलं न्हाणं पाहुन वेळं
हळवी केळं
गोरीssमोरी

खांबं घाट सुरुssदार
शेलाटी कोर
रांजssणाशी

उन्हंss लाही खुळीपिशी
पोटरीशी
लाडीssगोडी

वाढूs नको पंगत बाई
घरात नाही
मोठंss कुणी

भरमाध्यान्ही साजणवेळा
रेशिमं झळा
आडोssशाला

टिचेल काच पिचेल गोठ
हळवे ओठ
उखाssण्याला
-- शलाका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय शलाका - आज श्रावण सरींसारखी बरसून राहिली आहेस या सर्व रचनातून.......
फार अलवार रचना आहे ही आणि खरं तर ही रचना तू स्वतः म्हटलेली अशी ऐकायला जास्त आवडेल (मी मनात त्या टिपिकल चालीवर म्हणत होतोच...) आम्हा सर्व रसिकांना... बघ जमलं तर....

जे काही आहे ते मोहवणारं आहे. स्त्री जगतातल्या उपमा असल्याने अडाण्यासारखी अवस्था झाली. थोडा थोडा बोध झाला. पण एकंदर रचना सुखावणारी वाटली

काय छान लयीत, सूरांशी - शब्दांशी एकरुप होऊन म्हटलीयेस - व्वा - किती तरी वेळा ऐकली तरी 'अजून एकदा' असं होतंय ऐकताना ....

मस्तच जमलेय.

"भरमाध्यान्ही साजणवेळा
रेशिमं झळा
आडोssशाला" >>>
हे सर्वाधिक आवडलं.
-----------------------------------------------------------
ऑडियो क्लिप ऐकली.... छान वाटली.

.

धन्यवाद.. सगळ्यांचे खूप आभार.
विशेषतः शशांकचे Happy

अनघा, माझा आवाज गोड म्हणणारी तू एकमेव... अगदी मीही म्हणत नाही असं Happy
(आज मी बर्‍यापैकी पडीक होते मायबोलीवर)