"आजी"

Submitted by आर.ए.के. on 8 August, 2012 - 23:59

तिचा सुरकुतलेला हात, तिच सुकलं मनगट,
तिच्या दमल्या जीवात, कढ मायेचा तो दाट!

सर सोसली ढगांची, कळ सोसली उन्हाची,
भोवताली तिच्या मात्र दु:ख राहिलं दमटं...!

कधी लेकराची माया, कधी नातवाचा थाट,
मिळाली मात्र नाही तिला कोणाची संगत..!

दिवसाची रात्र झाली,अंधारला आसमंत,
तिने तेवला तो दिवा, तिच्या भाबड्या मनात...!

लढा तिचा एकटीचा, तिने लढला घरात,
तिच्या धैर्याची ती गाथा , माझ्या अस्पष्ट आठवांत....!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे कविता.
आवडली.
फक्त एक सुचवतो, राग मानू नका.
'लगट' हा शब्द थोडा नकारार्थी आहे. त्याऐवजी 'संगत' हा शब्द तिथे बसेल असे वाटते.
यमकही जुळेल आणि कवितेच्या अर्थालाही काही बाधा येणार नाही.
शुभेच्छा!

छान वर्णन आहे.

>>>तिच्या धेर्याची ती गाथा , माझ्या अस्पष्ट आठवांत....!<<<

ही ओळ सुंदर आहे

पण अश्या कविता अनेक वाचल्या, त्यामुळे नावीन्याची अपेक्षा उगीचच मनात होती, ती अपूर्ण राहिल्यासारखे वाटले. पण हे कबूल की यात काय नावीन्य आणणार आणि कशाला?

शुभेच्छा

सुरेखच....

अवांतर - पण अश्या कविता अनेक वाचल्या, त्यामुळे नावीन्याची अपेक्षा उगीचच मनात होती, ती अपूर्ण राहिल्यासारखे वाटले. पण हे कबूल की यात काय नावीन्य आणणार आणि कशाला? >>> बेफिंचे मत जाणून घ्यायला आवडतेच (पटते कि नाही हा मुद्दा वेगळा) - कारण त्यांचे विश्लेषण, मत जरा हटकेच असते, कधी विचार करायला लावते, कधी मिश्किल, कधी मार्मिक तर कधी जरा परखडही ....

छान वर्णन आहे.

एक छान Coincidence - आज माझ्या आजीचा ९२ वा वाढदिवस आहे आणि आम्ही मस्तपैकी पुरणपोळ्या खाऊन साजरा करणार आहोत.

@ मी नताशा - तुमच्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्चा द्या माझ्या तर्फे.
बेफ़िकीर,पुरंदरे शशांक प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
बेफ़िकीर यांचा प्रतिसाद खरच अनपेक्षित होता..पुरंदरे शशांक यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे विश्लेषण विचार करायला लावते.

तिच्या धेर्याची ती गाथा , माझ्या अस्पष्ट आठवांत....!
याऐवजी ,
'गाथा तिच्या त्या धैर्याची अस्पष्टशी आठवात ' असे केले तर मीटर अधिक सांभाळला जाईलसे..

कविता छानच.

चांगली कविता उत्स्फूर्त अनघडही बरीचशी सुंदर असते, निसर्गातल्या सुंदरतेसारखी..तिला जssरा
सावरलं सजवलं सांभाळलं की ती अविस्मरणीय ठरते..