किल्ले रोहिडा

Submitted by अतुलनीय on 7 August, 2012 - 02:59

किल्ले रोहिडा -

मागील महिन्यात २२ जुलै रोजी आम्ही किल्ले रोहिडा येथे जाऊन आलो. त्या वेळी घेतलेली हाही प्र.चि. देत आहे.

रोहिडा (किंवा विचीत्रगड) हा भोर - वाई (मांढरदेवीमार्गे) या रस्त्यावर भोरपासून साधारणपणे १५-२०कि.मी. वर आहे. पायथ्याशी बाजारवाडी असे ठीकाण आहे. गडाची ऊंची साधारणपणे सिंहगडाएवढी आहे (फक्त पायी वाट वर जाते). वर पुरातन असे रोहिडेश्वराचे मंदिर आहे.

भोरच्या अलिकडे ५ कि.मी. वर दादा कोंडके यांचे जन्मगावाजवळ नीरा नदीचे असे वळण आहे.

Neckless Point.JPG

रोहिड्यावरुन घेतलेली काही प्र.चि.

A view from Rohida.JPGAnother View from Rohida.JPGColour contrast.JPGCascade.JPG

गडावर जाताना भेटलेली जीवसृष्टी -

Mungyanche Warul.JPGPaisa Kida.JPGSnail in the shell.JPGRaan Phool.JPG

बाजारवाडी येथील काही प्र.चि. व काही प्रयोग-

A landscape.JPGLow Depth of field.JPGLarger depth of field.JPG

तेथुन निघून रायरेश्वराजवळ आंबवडे नावाचे ठिकाण आहे. तेथे साधारणपणे १९४० साली बांधलेला एका छोट्या नदिवरील झुलता पूल आहे (सस्पेंशन ब्रीज). त्यावरुन जाऊन पलिकडे शिवाचे मंदिर आहे. सध्याच त्याची नव्याने रंगरंगोटी झाली आहे. त्याच्यासमोर छोटासा धबधबा आहे.

Shiv temple at Ambavade.JPGColours.JPGA small waterfall.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते नेमके शिवालय नाही का आता तिथे ? जिथले चित्र आपल्या पुस्तकात असायचे ते ?>>>>> +१
(ते पहायला मिळेल या आशेनेच प्रचि पहायला सुरवात केली होती)
फोटो सुंदरच आहेत.

ते नेमके शिवालय नाही का आता तिथे ? जिथले चित्र आपल्या पुस्तकात असायचे ते ? >>> ते नेमके शिवालय रायरेश्वरा च्या डोन्गरावर आहे.

किल्ले रोहिडा - जिथे थोरल्या महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली..>> थोरल्या महाराजांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वरा च्या साक्षीने घेतली.

किल्ले रोहिडा - जिथे थोरल्या महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली..>> थोरल्या महाराजांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वरा च्या साक्षीने घेतली.
>>> रायरेश्वर का रोहिडेश्वर असा वाद आहे. नक्की मलासुध्धा माहित नाही. सेनापती किंवा केदार यावर प्रकाश टाकू शकतील. Happy

मस्तय Happy

छान आहेत प्रचि. किल्ल्यावरचेही द्या शक्य असेल तर. आम्ही गेलो तेंव्हा देउळ फारशा चांगल्या अवस्थेत नव्हते. दोन-तीन वर्षापुर्वी श्रमदानातून जीर्णोद्धार झाल्याचे फोटो पाहिले होते. आता कसे आहे ते बघायची उत्सुकता आहे.

>>> रायरेश्वर का रोहिडेश्वर असा वाद आहे.

असा कुठलाही वाद नाही. काही लोकांचा नामसाधर्म्यामुळे गोंधळ होतो एवढेच. कृपया धाग्याच्या नावात बदल करा.

अतुलनीय,
मस्त फोटो.
मला त्या देवळाच्या नुकत्याच रंगवलेल्या दाराचा फोटो खूप आवडला
@जीएस,
मग नक्की रायरेश्वर की रोहिडेश्वर?
(वाद नाही हे सांगितलेत, पण वादातीत कुठले ठिकाण ते सांगितलेच नाहीत :))