हिरव्या हाताची हिरवी जादू

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुणाकुणाच्या हातात जादू असते तशी माझ्या बाबांच्या हातात जादू आहे असा माझा विश्वास आहे. त्यांच्या हाताने लावलेलं कुठलंही झाड लागतं, फुलतं, बहरतं. बाबांनी आता टेरेसवर भाज्या लावल्या आहेत दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी, हळद, पुदीना, अळू, घोसावळं...

तुमच्यासाठी बागेचे हे फोटो..

या फोटोत चार मोठे दूधी भोपळे आहेत ... तुम्हाला दिसताहेत का ?

Rakhi 057.JPG

कांदा - टोमॅटो. छोट्या चौकोनी भागात वांग / ढोबळी मिरचीची छोटी रोपं तयार करायची प्रक्रीया चालू आहे.

Rakhi 043.JPG

तांबड्या भोपळ्याचा वेल आणि दूसरा विभाग बनतोय त्याचं चित्र..

Rakhi 044.JPG

दुसर्‍या बाजूला फुलं आणि हळद, अळू, घोसावळं, पुदिना आहेत. आत्तापर्यंत बागेचे जे फोटो काढलेत ते खालील अल्बममधे बघा Happy

https://picasaweb.google.com/meenakshi.hardikar/MyDadSBeautifulGarden?au...

विषय: 
प्रकार: 

जबरदस्त!!
हिरव्या हातांचे (आणि त्या मागच्या विचारी डोक्याचे) खूप कौतुक!

>> ओल धरत नाही का
टेरेस गार्डनसाठी खास असे वॉटरप्रूफिंग करून घ्यावे लागते. ग्रीन रूफ असे गूगलून बघितल्यास भरपूर माहिती सापडेल. माझ्या एका मैत्रिणीचे वडील बंगलोरात असे वॉटरप्रूफिंग करून देत असत.

कित्ती छान..............मस्त्च......:)

छान फोटो आणि मस्त बाग. Happy
माझ्या सासर्‍यांनीही पुण्यात घराच्या गच्चीवर अशीच बाग केलेली आहे. तिथे ते तासन् तास रमतात.

प्राची वांगी आली की सांगते तुला.

आत्ता आम्ही काही खास वॉटर प्रूफींग केलं नाहीये. बाबा म्हणाले की आहे ते वॉटर प्रूफींग पुरेसं आहे. म्हणजे आता पाऊस पडून पाणी साठतं ना त्याने कुठे काय गडबड होते? फूलझाडं सगळी कुंडीत आहेत. एकंच आयलँड केलंय त्यात एका शोभेच्या झाडासाठी जमीनीवर माती घातली आहे.

भाज्यांसाठी माती घालण्याआधी नारळाच्या भरपूर शेंड्यापण घातल्या आहेत. आय होप की वॉटर लिकेज होणार नाही. फूलझाडांची बाग लावून पाच सहा वर्ष तरी झाली सुदैवाने काही प्रश्न आला नाहीये आणि पाणी घालतो तेव्हा जास्त साचणार नाही असंच घालतो शक्यतो. पाणी पण वाचवायलाच हवं ना? Happy पुढे मागे प्रश्न आलाच तर मात्र करावं लागेल.

सुधीर ह्या झाडांची मुळं खूप नाजूक असतात. अशीच झाडं निवडली आहेत मातीत लावायला. बाकीची कुंडीतच आहेत.

सगळ्यांना धन्यवाद!

खुपच सुंदर आहे बाग! बाबांना नमस्कार सांग Happy

माझ्या आईच्या हातात अशीच जादु होती... कुठलही रोप्/बी लावा रुजायचचं... पुण्यात घरच्या गच्चीवर खास ताटवे करुन घेतले होते (वॉटरप्रुफिंग केले होते). त्यात ती पालेभाज्या, फुले, भोपळा, गाजरं, बीन्स इ इ भाज्या लावायची शिवाय औषध म्हणुन तुळस, कोरफड वगैरे पण लावले होते. घराच्या पुढच्या अंगणत पण खुप फुलंझाड होती. ब्रम्हकमळ, २-३ प्रकारच्या लिली, गुलाब, चमेली, रातराणी आणि काही सक्युलंट्स. खुप रमायची बागेत.. Happy

सध्या आमचेही बॅकयार्डात प्रयोग चालु आहेत.. Happy

अतीशय सुन्दर बाग .माझ्या जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या.माझ्या वडीलानाही असेच बागेचे वेड होते. गच्चीवर व अन्गणात सारा दिवस ते खपत असत.तुमच्या बाबांची मेहनत पुरेपुर दिसतेय
हिरव्या हातांचे (आणि त्या मागच्या विचारी डोक्याचे) खूप कौतुक!>>>>>>+१
आपल्या बाबांना सादर नमस्कार.

दीप्स नाही रे ती पण आहे तू पाहीली होतीस ती. हे शेजारचं टेरेस आहे. फळं एकीकडे आणि तू पाहीलेलं फुलं एकीकडे.
धन्यवाद सगळ्यांना - बाबांना आवडतील तुमच्या प्रतिक्रीया वाचायला.

ओके ,असं आहे का!
बाय द वे, बाबांकडून आणलेला सोनचाफा खूप फुलं देऊन शेवटी सोसायटी रीनोवेशन मधे शहीद झाला.
Sad

नमस्कार मीनाक्षी.
खूप छान आहे हो तुमच्या वडिलांची बाग. झक्कास एकदम.अशी हिरवीगार बाग डोळ्यांना किती सुख देते ना? तुमच्या वडिलांना मनापासून सलाम !!!

तुमचा फोटोंचा अल्बम बघितला. खूप छान आहेत सर्वच फोटो.
६४ नंबरचा जो फोटो आहे, तो सोनटक्का आहे, पण त्याला नाव अनंत असे दिले आहे. ३३ नंबरच्या फोटोत अनंताची कळी आहे.

मस्त बाग, अशी बाग अगदी घराच्या बाल्कनी मधेही करू शकता. माझ्या आईची अशीच छोटी बाग होती, त्यात काकडी वांगी टोमाटो कोथिंबीर अशी भाजी घरच्यापुरती भरपूर मिळते. भाज्यांच्या साली वैगैरे घातल्या कि त्याचेच सेंद्रिय खत पण होते. आईच्या बागेत कधीच मुंग्या माशा झाल्या नाहीत. पण माझ्या नवरोजीने घराच्या टेरेस मध्ये लॉन करायचा घात घातला होता. लॉन वाढल उत्तम, पण त्यात खूप लाल मुंग्या झाल्या, त्यावर काही उपाय सापडला नाही, शेवटी सगळं लॉन काढून टाकाव लागल. Sad

धन्यवाद. आता कांद्याची पात आलीये. मावळी काकडी पण लावलीये सध्या तांबडा भोपळा मात्र लहानसा येतोय आणि गळून पडतोय. खूप सगळे टोमॅटो येऊन गेले.

<<< बागेला सगळ्यात मोठी दाद म्हणजे बागेत घरटी बांधणार्‍या पक्षांची. हळदीची दोन पानं शिवून एका पक्षाने छान घरटं बांधलंय आणि तीन छोटी छोटी अंडी घातलीत. अगदी चिटकू पिटकू अंडी आहेत. पूर्वी एका नर्तक पक्षाने घरटं बांधलं होतं कर्दळीच्या पानात. स्मित >>>

अरे वा. किती छान...

खुपच सुंदर बाग मीन्वा...

टेरेस गार्डन हि संकल्पना मलापन खुप खुप आवडते.. पण विदर्भातल्या उन्हानं सुदरु देत नाही... सारी झाड जळून जातात.. कुंड्या जराश्या सावलीत ठेवाव्या तर उन्ह डोक्यावर आल्यावर मिळतं त्यांना ..सकाळचं कोवळ उन्ह मिळत नाही...
आता वरचा मजला चढवत आहे तर परत एकदा हिरवी जाळी वगैरे टाकुन काही करता येईल का ते बघते..
हिरवे हात म्हणजे लक्की हं ते.. काश माझेपन असते...

Pages