Submitted by सतीश देवपूरकर on 5 August, 2012 - 13:29
गझल
असू दे फाटका संसार माझा!
तुला कळणार ना व्यवहार माझा!!
जगाची आसवे पुसता समजले.....
मलाही वाटतो आधार माझा!
असे हे काय प्रतिसादात माझ्या?
कवींना सोसला ना भार माझा!
किती मजला दळावे या जगाने?
भुगा झाला पहा हो पार माझा!
कसा यावा कुणा अंदाज माझा?
पवित्रा भासतो हळुवार माझा!
सुगीचे सोबती पाहून झाले!
कधी भेटायचा मज यार माझा?
कुणी आग्रह करावा जेवताना;
असा ना राहिला आहार माझा!
स्वत:चा मीच शत्रू काय झालो;
पहावा लागला संहार माझा!
गझल म्हणजेच श्वासोच्छ्वास माझा!
कसा नाकारता अधिकार माझा?
किती आयुष्य अस्ताव्यस्त माझे!
घरी या! अन् पहा! बाजार माझा!!
शिरावरुनीच पहिले चाक गेले!
क्षणी त्या संपला प्रतिकार माझा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरच अफलातून ... इथे तुम्ही
सुधाकरराव (ऑर्फी..)+१
सुधाकरराव (ऑर्फी..)+१
आवडली गझल....
आवडली गझल....
जगाची आसवे पुसता
जगाची आसवे पुसता समजले.....
मलाही वाटतो आधार माझा!
सुगीचे सोबती पाहून झाले!
कधी भेटायचा मज यार माझा?
स्वत:चा मीच शत्रू काय झालो;
पहावा लागला संहार माझा!<<
वा आवडले शेर प्रोफेसरसाहेब