"तू"

Submitted by -शाम on 4 August, 2012 - 10:14

तू आलीस आणि माझं घर, अंगण तुझं झालं
अगदी माझ्यासकट..

दिवस फुलत गेले
रात्री जागत सरल्या
प्रेमात, रागात, गप्पांत,
किंवा नुसतच तुला बघत...

तुला दिलेलं काहीच
कधी मोजलं नाही
प्रेमाचा हिशेब ठेवायचा नसतो म्हणून...
तू ही निर्व्याज दरवळत राहिलीस
मिठीत येऊन...

पण सुगंध कोणाला बांधता आलाय कधी
शेवटी बघत राहिलो तुझ्या वाटेवरची धूळ
वार्‍याची झुळूक होऊन
तू दूर जाताना...

आता आठवण आली की,
सजल डोळ्यांनी थरथरता हात
फिरतो अंगणातून
जिथे तुझ्या नाजूक बोटांतून
कधी रांगोळी सजत होती
.

.
.
आणि लोक म्हणतात,
बापाला कुठं काळीज असतं....आईसारखं!

............................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद .. दोस्तांनो!

ढमे ही कविता ही लिहून झाल्यावर पुन्हा वाचताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं..
आणि इतक्या सहज डोळ्यात पाणी येतं म्हणूनच मी कवी झालो असेल कदाचित.

आभारीये..................................
शाम

आणि इतक्या सहज डोळ्यात पाणी येतं म्हणूनच मी कवी झालो असेल कदाचित.
<<< सहमत, उत्तम विधान व सहमती दर्शवत आहे Happy

श्याम................... अफाट जमलिये कविता....... जियो दोस्त जियो...!!!!!

खूप खूप सुंदर्............अप्रतिम....... Happy

आवडली.

छान!

अप्रतिम... शाम,
बाप अन मुलीचं हे भावविश्व... ते ही फक्तं बापाच्या नजरेतलं... अगदी अगदी भिडलं मनाला...
मी एक लेक आहे म्हणून तर अगदीच.

खूप खूप आभार दोस्तांनो!

शलाकाताई खूप खूप आभार... तुमची दाद म्हणजे पाठीवर कौतुकाची थाप वाटत आलिये नेहमीच Happy

व्वाह..

खूप सुंदर बापाला भावना असतात हे च प्रतीत होत
मुलगी तिच्या घरी गेल्यावर आई रडते
पण बाप फक्त अश्रू ........ बाप खंबीर असतो
त्याला रडायला देखील परवानगी नसते.
शिवाय काळजी वेगळीच..

खुपच सुंदर कविता आहे शाम! शेवट तर किती हळवा..
बाबांची प्रकर्षाने आठवण आली. त्यांनाही वाचून दाखवायला हवी.