अवान्तर [१]- शब्द - शब्दार्थ

Submitted by मी-भास्कर on 2 August, 2012 - 05:23

२ ऑगस्ट १२ :
* मायबोलीवर आल्यापासून रच्याकने, गटग, विपु, माबो, धन्स, फामा अशा संक्षिप्त आणि विक्षिप्त शब्दांचे खडे सतत दाताखाली यायचे. हळुहळु अंदाजाने बरेच खडे विरघळले. तरी रच्याकने हा मात्र परवा परवा एका सज्जनाने समजावून दिला तो असा : रच्याकने म्हणजे ' स्त्याच्या डेकडेने '
म्हणजे बाय द वे (याचाही 'बादवे' होतो), म्हणजे जाता जाता, म्हणजे अवांतर!
ज्याने जाता जाता ला 'रस्त्याच्या कडेकडेने' हा समानार्थी शब्दसमूह सुचवला तो सज्जन बहुधा भारताबाहेरील अशा देशात दीर्घकाळ राहात असावा कि जिथे घरचे पाळलेले कुत्रे फिरायला घेऊन जातांना कुत्र्याचे निसर्गविधी निस्तरण्याचे सर्व बारदान (किट) घेऊनच बाहेर पडावे लागते. इथे भारतात तरी कोठल्याही शहरात 'जाता जाता' हौसेने 'रस्त्याच्या कडेकडेने' अगदी दुचाकीवरूनही जाण्याचे धाडस कोण करील बरे?
कारण प्रभातकाळी रस्तोरस्ती कडेकडेने मानवी व श्वान कृपेने दिसणार्‍या सुगंधी (?) सजावटी (?) आपल्याला परिचित आहेत. परवानाधारक श्वानप्रेमीही कुत्र्यांना फिरायला घेऊन जाण्याच्या नावाखाली आपली घरे व घरासमोरचा रस्ता स्वच्छ ठेवून उर्वरित रस्त्यावरील सजावटींमध्ये मोठ्या कौतुकाने भर घालीत असतात. त्याशिवाय गाढवे, डुकरे आदी इतर चतुष्पाद भरीत भर घालण्यास आहेतच!
तात्पर्य- जाता जाता 'रच्याकने' म्हणजे 'रस्त्याच्या कडेकडेने' जाणे भारतात तरी जोखमीचे असल्याने त्याज्य होय! हा खडा मात्र विरघळणारा नाही.

***************************************************
७ ऑगस्ट १२ :

माबो अर्थात मायबोलिवरील 'रच्याकने' हा शब्द मला आवडला नसला तरी तिथेच वापरला गेलेला 'फामा' म्हणजे 'फाट्यावर मारणे ' हा मात्र फार आवडला. एका सज्जनाने त्याचा अर्थ (सभ्यतेच्या) अंगाने दुर्लक्ष करणे , उपेक्षा करणे , इग्नोअर करणे असा होतो , असे समजावून दिले होते.

त्याआधी मात्र त्या शब्दात मला खालिल अर्थान्चे दर्शन व्हायचे.

अ)माबोवर कांहि वाद मुद्द्यावरून शाब्दिक गुद्यांपर्यंत पोचतांना दिसल्यावर त्याचा अर्थ 'कानफटात मारणे ' किंवा मुख्य रस्त्यापासून छोट्या गावांना फाटे फुटतात त्या फाट्यावर गाठुन थोबाडणे असा हिंसक असावा असे वाटायचे.
पण इथे सगळे अहिंसेचे पुजारीच भेटायला लागल्यावर इतरही काही अर्थ असावेत असे वाटायला लागले.

आ)एखाद्या झाडाच्या वाटेत येणार्‍या फांद्या (फाटे) तोडतांना, फाट्यावर मारा अशा सुचना देतात. तेथे मारल्यावर फाटिचा व झाडाचा सम्बध तुटतो, तसे फामा म्हनजे 'सम्बंध तोडणे' असा अहिंसक असावा असे वाटू लागले.

इ) बरेच कोल्हापुरकर माबोवर पडीक असल्याने 'टांग मारणे' असते तसे कदाचित 'फाट्यावर मारणे' हे कुस्तितल्या एखाद्या डावाचे नाव असावे असेहि वाटायला लागले.

ई) शिवाय ज्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे , कल्पकतेप्रमाणे आणि वृत्तीप्रमाणे फामाचे अनेक लाँग फॉर्म असू शकतात. विस्तारभयास्तव फामा म्हणजे फार माननीय कींवा फाटका माणूस एवढे दोनच नमूद करतो.
असो. आज इतके पुरे.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

१० ऑगस्ट १२ :

मायबोलीवरील एक सुप्रतिष्ठित आय डी किरण यांनी माझ्या लेखाला प्रतिसाद देतांना दोन सुप्रसिद्ध मराठी म्हणींचे संक्षिप्तीकरण केले होते : एक होते तोंदाबुमा. दुसरे होते सांतायेनासनहोना.
प्रतिसाद गैरसमजावर आधारित असला तरी ही पद्धत मात्र मला आवडली. अनुकरणीय वाटली. तेवढेच टायपणे कमी.
आलागंभेली म्हणायची !

***************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भास्कर,

गटग तर मला अजुन ही कळलेले नाही. म्हणजे गटागटाने टगेगिरी असे काही आहे का??
उलगडून सांगावे

@ झककास | 4 August, 2012 - 14:31
>> गटग तर मला अजुन ही कळलेले नाही. म्हणजे गटागटाने टगेगिरी असे काही आहे का?? <<

असेलहि कदाचित. टागटाने गेगिरी करणारा ट असे असेल.

पण मी ही अंधारातच चाचपडतो आहे. वेबमास्टर देखील 'गटग'त'असतात असे एका धाग्यावर आढळले. त्यांनाच विचारावे. उत्तर आल्यास मलाहि उलगडून सांगावे.
तुम्ही गझलाकार, कादंबरीकार, कवी, गप्पिष्ट यापैकि कॉनि असाल तर उत्तर मिळेल. नाहीतर आपल्याला शक्य होते ते केले असे मानून 'चित्ती असो द्यावे समाधान'.

ज्याने जाता जाता ला 'रस्त्याच्या कडेकडेने' हा समानार्थी शब्दसमूह सुचवला तो सज्जन बहुधा भारताबाहेरील अशा देशात दीर्घकाळ राहात असावा कि जिथे घरचे पाळलेले कुत्रे फिरायला घेऊन जातांना कुत्र्याचे निसर्गविधी निस्तरण्याचे सर्व बारदान (किट) घेऊनच बाहेर पडावे लागते. <<<

Rofl

<<<गेट टुगेदर = जी टी जी त्याचे गटग झाले>>>
शेळी,
आभारी आहे, मी भास्कर....उत्तर मिळाले ना! आपण ही हे जाणून घ्यावे.

२३ ऑगस्ट १२ :

एका मागास गावातून मी पुण्याच्या एका नावाजलेल्या शाळेत आठवीत असतांना आलो.
येऊन दोन तीन दिवसच झाले असतील. मधल्या सुट्टीत एका बेंचभोवती मुलांचा हा गराडा पडलेला!
मीही डोकावलो. एक्जण त्याने काढलेलि निसर्गचित्रे दाखवीत होता आणि पोरे 'अहाहा! काय तुच्छ! निव्वळ तुच्छ! ' अशा शब्दात प्रतिसाद देत होती. त्यांचे आविर्भाव तरी त्या चित्रांचे कौतुक करणारेच वाटत होते पण तोंडातून फवारले जात होते, 'तुच्छ! तुच्छ !'
' वा काय छान आहे ' अशा शब्दात कौतुक करायची आम्हाला सवय. तुच्छ म्हणजे छान हा अर्थ थोड्याच वेळात डोक्यात शिरला. त्यावेळी रूढ अर्थाने शब्द वापरायचाच नाही असे फॅडच होते कि काय कोण जाणे. असे बरेच शब्द आमच्या वर्गात वापरले जायचे आणी त्यांचे आम्हाला अभिप्रेत अर्थ इतर वर्गातिल मुलांना न कळल्याने अनेक गंमती होत. पण आम्हाला अभिप्रेत असलेले अर्थ इतरांना माहीत असलेच पाहिजेत असा आग्रह नसायचा. उलट तो माहीत नसल्याने होणार्‍या गंमती आम्ही सर्वजन एन्जॉय करायचो. त्यानंतर इतरानीही तोच प्रयोग आमच्यावर करायला सुरुवात केल्यावर हे फॅड कमी झाले.
'मी एक यशस्वी लेखक आहे. त्यामुळे प्रत्येक वाचकाला कोणत्याही शब्दाचा मला अभिप्रेत असलेला अर्थ माहीत असलाच पाहिजे' असा अहंकार असलेला लेखक येथे भेटला आणी मला शाळेतील वरील प्रसंगाची आठवण झाली.

हिंदी वाहिन्यांवरील मोठमोठे मथळे वाचतांना बर्‍याच शब्दांचे अर्थ अंदाजाने काढण्याची मला संवय आहे. त्यामुळे फार्से बिघडत नाहि. आमच्याकडे ऐकण्यात असलेली हिंदी म्हणजे 'आलू बहोत सस्ते होयेला है' , ' पळते पळते धपकन पड्या.' अशी . त्यामुळे 'बवंडर' म्हणजे अवडंबर, 'सस्तेमे ' म्हणजे स्वस्तात असे अर्थ घ्यायचे हे ठरलेले. अमुक एक मंत्री सस्तेमे अशी बातमी दिसली की आमदारा प्रमाणे मंत्रीही कोणीतरी स्वस्तात मिळवला अस कळून यायचे नि एक दिवस बातमी दिसली , 'पी.एम सस्तेमे!' . अरेच्चा , पंतप्रधानही स्वस्तात विकला जायला लागला? आणी घेतला तरी कुणी त्याला? केवढ्याला? करनार तरी काय त्याचे? एक ना दोन हजार शंका. शोधाअंती कळले की सस्तेमे म्हणजे संकटात, अडचणीत.

>>'ते', "पी एम सक्ते में" असावे. सक्ते में आना : सावध पवित्रा घेणे<<
'सक्ते में ' असे नव्हते. स्क्रीनवर आले होते ते 'सस्तेमे' असेच होते.
@बाजो
आपल्याकडे गावाहून कोणी येणार असेल आणि आपण वाट पाहात असलो तर घरापाशी रिक्षा येऊन थांबल्याचे भास होणे अनेकांनी अनुभवले असेल. त्याला काय म्हणायचे? 'विशफुल हिअरिंग '?

>>गेट वेल सून.. <<
बाजो, अशी कुरापत काढण्याची आवश्यकता होती काय? मीही असेच प्रतिसाद देऊ शकतो इतके लक्षात ठेवा. प्रशासकांच्या तुम्ही जवळचे असावेत म्हणूनच अशी कुरापत काढताहात अशी शंका येते.

मत्सर, द्वेष आणि असूया हे शब्द समानार्थी असावेत असे वाटते.
कि त्यात अर्थाच्या दृष्टीने कांही छटा आहेत?

@munja | 2 May, 2013 - 12:23
>>
तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहे.
'फाट्यावर मारणे ' याचा अर्थ याच धाग्यात वर दिला आहे. दुसर्‍या धाग्यावर अर्थ न मिळाल्यास आणि तुमच्या डोक्यात बिघाड नसल्यास तो वाचावा.

tumche kahihi aso ...pan mazyasarkhya anek sudnya vachakanche coment na karta dekhil baryapaiki manoranjan hote ahe .aso.

vaibhav lavhale | 10 May, 2013 - 13:26नवीन
<<
धन्यवाद!
मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला चुका होतील. पण बहुतेक सर्व लोक समजावून घेतील याची खात्री बाळगा.