संभाजी ब्रिगेड आणि रायगडावरील वाघ्या कुत्रा

Submitted by चिखलु on 1 August, 2012 - 12:23

सकाळ मधील बातमी
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड 29 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे. वस्तुतः वाघ्या कुत्र्याला कोणताच ऐतिहासिक पुरावा नाही. त्यामुळे हा पुतळा तेथून हटविण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ब्रिगेडचे प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. शासनाने येत्या सहा जूनपूर्वी हा पुतळा तेथून हटवावा, ही आमची लोकशाही मार्गाने केलेली मागणी आहे. शासनाने या मागणीबाबत टाळाटाळ केली तर ब्रिगेडलाच तो हटवावा लागेल.''

आधी दादाजी कोंडदेव आणि आता वाघ्या कुत्रा. यामुळे नक्की काय साध्य झाले?

तळ टीप: कृपया चर्चा करावी, वाद विवाद नको.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

शिवाजी महाराजांबद्दल प्रेम वगैरे कुणालाच नाही. पूर्वी भगव्या मंडळींनी मुसलमानांविरुद्ध त्यांचं नाव वापरलं आता ब्रिगेड वापरते आहे. दोघांनाही प्रेम आहे म्हणून ते आंदोलनं करताहेत असं मुळीच नाही. महाराजांचं नाव वापरता येईल तितकं वापरा आणि ते कुणाविरुद्ध तरी वापरा. जे महाराजांच्या गटात ते अर्थात विनिंग टीममधे आणि जे नाहीत ते अर्थात देशद्रोही, राष्ट्रद्रोही टीममधे. आता पारडं उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला झुकलंय. कुणालाच सहानुभूती द्यावी अशी त्यांची पात्रता आहे असं मला तरी वाटत नाही. अफजलखानाच्या ज्या समाधीवरून आंदोलनं झालीत ती महाराजांनी बांधली एव्हढी अक्कल ज्यांना नाही त्यांना कुत्रा शिवाजी महाराजांचा आहे हे माहीत असतं हे खरोखर नवलाचं आहे.

मला या संपूर्ण प्रकरणात एकच कळालं नाही .. पुतळा जर कुत्र्याचा उखडला आहे तर त्यात जातीयवाद कसा काय आला ? कुत्र्याच्या मला माहीत असलेल्या जाती वेगळ्या आहेत. त्यावरून लिहीलं तर कायदा ही माफ करेलच.

मी इथे घारुअण्णांच्या पोष्टीला जोरदार अनुमोदन देऊ शकलो. मात्र अफजलखानाच्या समाधीविरुद्ध जी आंदोलनं झाली त्याबद्दल कुणाला अनुमोदन द्यावंसं वाटू नये का ? कारणं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

Kiran..>>>
१) अफजाल्खानाची समाधी नसून कबर आहे,
२) अफजलखान हा संत नव्हता, त्यामुळे त्याचा उरूस वगैरे करण्याला विरोध होता
3)अनधिकृत/वाढीव बांधकाम केल्यामुळे वाद झाला असावा, पुरातत्व खात्याच्या जागेवर कायदा धाब्यावर बसवून बांधकाम चालले होते, मला वाटता कोर्टात केस चालू आहे

२) अफजलखान हा संत नव्हता, त्यामुळे त्याचा उरूस वगैरे करण्याला विरोध होता

कुत्रा हाही संत नव्हता.. त्याचा पुतळा/ समाधी कशाला?

अफजलखान हा शत्रु होता, पण कुत्रा शत्रु नव्हता त्यामुळे, कळालं का
कुत्र्याचा पुतळा असला (अगदी खरे घडले नसले समजा) तर कोणाच्या काकाचे काय जात होते ?

कुत्र्याचा पुतळा असला (अगदी खरे घडले नसले समजा) तर कोणाच्या काकाचे काय जात होते ?

कोणाच्या काकाचे जाणे वा न जाणे, इतकाच मुद्दा असेल तर माझाही पुतळा रायगडावर बसवायला हरकत नसावी.

आणि कुत्र्याचा पुतळा मोडला तरी कुणाच्या काकाचे काय गेले? मग पुतळा मोडला तर गदारोळ कशाला?

कुत्र्याचा पुतळा असला (अगदी खरे घडले नसले समजा) तर कोणाच्या काकाचे काय जात होते ?

इतर कुनाच्या काकाचे माहिती नाही पन 'दादाच्या' काकाचे जाते न!!!

अफजलखान संत होता कि नाही हा मुद्दा बाजूला

तो शिवाजी महाराजांचा राजकिय शत्रू होता. मृत्यूनंतर वैर संपते. खान युद्धात मेल्याने राजांनी स्वतः त्याची समाधी कबर बांधली. इथे कुत्र्याच्या पुतळ्याच्या शिल्पकाराचा अवमान होतो म्हणून पोष्टी पडताहेत. उरुसाबद्दल मी बोलतच नाही तर कबर उखडायला निघालेले कुणाचा अवमान करायला निघाले होते असं वाटतं ? त्या वेळी निषेध वगैरे झाल्याचं आठवत नाही.

जातीयवादाचा मुद्दा देखील अनुत्तरीतच आहे.

kiran..अफजलखान आणि कुत्रा ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत, कृपया एकत्र नको करायला. पुतळा एखाद्या ब्राह्मणाने घडवला म्हणून जर काढण्यात आलेला असेल असे मला तरी वाटत नाही. सब्रि ला नव्याने इतिहास लिहायचा आहे हे मात्र पटते. जातीयावादापेक्षाही, सवंग प्रसिद्धी आणि राष्ट्रवादीला दुसरीकडे लक्ष वळवण्याच्या दृष्टीने ह्या घटनेकडे पाहता येईल.

महेश: अनुमोदन

इतर कुनाच्या काकाचे माहिती नाही पन 'दादाच्या' काकाचे जाते न!!!>>> +१

चिखल्या
या दोन गोष्टी वेगळ्या असल्या तरी वृत्ती एकच आहे. आधी ज्यांनी याची सुरुवात केली त्यांना लोक सबुरीने घ्या म्हणून सांगायचे तेव्हां. हिरवी कावीळ, सुंता वगैरे शब्दफुलांचा यथेच्छ वापर होत असे. आता ते शब्द वापरून गुळगुळीत झालेले असल्याने आणि एकूणच त्या लोकांची विश्वासार्हता पणाला लागलेली असल्याने त्यांनी गळे काढल्यास लक्ष द्यायची गरज नाही असं माझं मत आहे.

कुत्र्याचा पुतळा उखडणे हे जितके अनावश्यक आहे तितकेच कबर उखडण्यासाठी निधी द्या, वेळ द्या म्हणून दम देणारे कार्यकर्तेही. एकाला झोडपून उपयोग नाही. इथं आयडी ब्लॉक करायची जशी सोय आहे तशी व्यवहारात असती तर दोघांनाही ब्लॉक करायला हवं तरच सामान्यांना शांतपणे जगता येईल.

Proud

किरण, अफजलखानाची कबर महाराजांनीच बांधली यावर दुमत नाही.

पण त्याचे उदात्तीकरण का करावे??????

गापै यांच्या संपुर्ण पोष्टीला अनुमोदन.

Pages