दिल्लीचा पावसाळा

Submitted by विवेक पटाईत on 1 August, 2012 - 09:42

या वर्षी पाऊस अजिबात नाही. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून काळे मेघ आकशात जमले आहे, पण अजून ही बरसले नाही. कुठे कुठे फक्त दोन-चार थेंब पडतात. त्यांना पाहून मला काय वाटते....

काळे कुट्ट मेघ

आकाशी दाटले.

विजेच्या कडाक्यात केल्या

त्यांनी पावसाळी घोषणा.

तेंव्हा त्यांचा चेहरा मला

नेत्यानं सारखा भासला.

दोन-चार थेंबच

अंगावर सांडले.

पावसात भिजण्याची

हौस मनी राहिली.

दिल्लीचा पावसाळा हा

असाच असतो.

भर श्रावणात हा

मृगजळ दाखवितो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चक्रधराने लिळाचरित्र आजच्या काळात लिहिले तर असेच असते ..............

.....काळे कुट्ट मेघ आकाशी दाटले.विजेच्या कडाक्यात केल्या त्यांनी पावसाळी घोषणा.तेंव्हा त्यांचा चेहरा मला नेत्यानं सारखा भासला. दोन-चार थेंबच अंगावर सांडले.पावसात भिजण्याची हौस मनी राहिली.दिल्लीचा पावसाळा हा असाच असतो.भर श्रावणात हा मृगजळ दाखवितो.