चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा?

Submitted by विनार्च on 1 August, 2012 - 05:46

माझी लेक यंदा चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेला बसली आहे.कोणताही क्लास न लावता तिला मी घरातच शिकवायचं ठरवल आहे. साधारण कसा अभ्यास घ्यावा? याची माहिती कोणी सांगाल का?
(लेक अभ्यासात बरीच हुशार व एकपाठी आहे त्यामुळे माझ्याकडुन कुठे कमी पडायला नको याची भीती वाटते)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनन्या, जय आणि दोघांच्या आयांचे अभिनंदन!

विनार्च, इथे कळवल्याबद्दल तुझे आभार! बर्‍याचदा इथे मदत/माहिती मागितली जाते. ती माहिती उपयोगी पडली/नाही पडली काय मार्ग निघाला हे कळतच नाही.

अरे, हा धागा आहे हे माहितच नव्हत. अजून उपयोग झाला असता. असो. केदारला (मुलगा ) स्कॉलरशिप मिळाली. तो हुशार पण अभ्यासाला बसायचा अतिशय कंटाळा करतो.. एका जागी थोडावेळ बसून अभ्यासाची सवय लागावी हा आमचा हेतू पूर्ण झाला आणि वर बोनस मिळाला.. Happy

मुलांना फक्त पुस्तके आणून द्या, अभ्यास घेवू नका (अभ्यास घेवून होत नाही),त्यांना अडचण भासली तरच मदत करा , (घोकमपट्टी नको कदाचित अशामुळे या वर्षी स्कॉलरशीप मिळेलही पण भावी आयुष्यात अशा सवयी घातक आहेत) ,

स्कॉलरशीप म्हणजे सहामाही परिक्षेसारखी साधारण परिक्षा आहे असेच वातावरण ठेवा,
उगाच अभ्यासाचे तास ठरवू नका स्वताच्या सवडीने आणि आवडीने मुलांना अभ्यास करु द्या
(पाढे पाठ करुन घ्यायची गरज नाही )

sorry but due to some problem i am unable to write in Marathi.
I wanted to know whether ICSE Board student is getting this scholarship ?
my daughter got more marks than marks delclared in cut off list and she is studying in ICSE Board.

प्रतिभा ताई,
तुमच्या कन्येला परिक्षेस बसू दिले असेल, व मार्क जास्त असतील (मेरिटलिस्टमधे येण्याइतके), तर तिला नक्कीच स्कॉलरशिप मिळेल.
माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाला पैसे रुपात दर महा स्कॉरशिप मिळत नाही. सुरुवातीचे ५०-१०० नंबर काहीतरी असतात. त्यांतही पालकांच्या किमान उत्पन्नाची अट असते. जास्त उत्पन्न असल्यास स्कॉलर असल्याचे सर्टिफिकेट + एकाच वेळी काहीतरी टोकन रकमेचे बक्षीस असते.

अनन्या, जय आणि केदार यांचं अभिनंदन! मागे लागून, मारून मुटकून अभ्यास न करून घेतल्याबद्दल त्यांच्या पालकांचं पण! Happy

असंच भरपूर सुयश मिळो!

Thanks Iblis. pan mala ase kalale ki ICSE Board students na phakt pass mhanun declare karataat, merit list madhe ghet naahit aani scholarship hi det naahit. punyala shikshan mandala madhe phone kela hota tevha tyanni kaahihi clear saangitale naahi.
hey deva maajhe marathi kadhi chaalu honaar ? ase koni lihaayache tevha tya posts mi vachanyaachahi traas ghet navhate, aaj maajhyaavarach hi vel aali aahe. Sad

निवांत, २८२ म्हणजे सॉल्लिड गुण मिळालेत! हार्दिक अभिनंदन आणि मुलाला शाबासकी. पहिल्या वीसात असणार नक्की!

धन्यवाद सगळ्यांना.

किरण कुमार, (पाढे पाठ करुन घ्यायची गरज नाही ) >>> हे नेमकं काय म्हणायचे आहे ते समजले नाही. याचे पोटेंन्शिअल फार आहे असे माझे मत आहे. तुमचे नेमके मत (पाढे पाठ असण्याबद्दल) सविस्तर लिहाल का प्लिज.

आता शिष्यवृत्ती परीक्षा चौथी /सातवीऐवजी पाचवी/आठवीची झालीय. दोन भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी.
यंदा कोणाचे पाल्य देताहेत का?

http://www.mscepune.in/scholarship_syllabus.aspx

माझी लेक गेल्या वर्षी बसली होती. पास होण्याइतपत गुण मिळाले (४२% बहुधा) . आम्ही काही विशेष क्लास लावला नव्हता. आम्हीच शिकवलं घरी. पण त्यानिमित्ताने बुद्धीमत्ता चाचणीची तिला ओळख झाली हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटलं

अरे वा अजूनही असते का ही परीक्षा. हल्ली कोणाच्या तोंडून फारसे ऐकण्यात आले नाही.

मलाही चौथीत असताना स्कॉलरशिप मिळालेली. मुंबईत चौथा आलेलो.
सातवीला उगाचच लोकांना वाटायचे की मी मुंबईत पहिला येईन पण 22 वा आलेलो. गणित बुद्धीमत्ता सोबत ती भाषा नसती तर आलोही असतो पहिला.

येनीवेज, मला आठवत नाही की मी फारसा विशेष अभ्यास केलेला की माझ्या घरच्यांनी तो करवून घेतलेला. पण अर्थात उपजत बुद्धीमत्ता असली तरी अभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे सराव हवाच. पण गणित बुद्धीमत्ता हा असा प्रकार आहे की प्रत्येकाचे एक डोके चालायची मर्यादा असते. त्यापुढे उगाच ताण देऊन नेण्यात अर्थ नाही की पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्याला ती परीक्षा मजेमजेचीच वाटू द्या.. चौथीतला पोरगा म्हणजे खरंच लहान झाला खूप.

आमच्याकडे तर एक गंमत झालेली. मला स्कॉलरशिप मिळाली हे मी घरी सांगितलेच नव्हते. दोन दिवसांनी वर्तमानपत्रात फोटो आला. तेव्हा शेजारचे घरी धावत आले, अरे आपल्या ऋषीचा पेपरात फोटो आलाय Happy

मला 234 गुण मिळाले होते ,आणि 247 ला स्कॉलरशिप होती, अजून आठवतंय...
तेंव्हा वाईट वाटलेलं,पण आता कळतंय या असल्या परीक्षा मॅटर करत नाहीत.

Pages