टिळक पहाताय ना सारे.....!

Submitted by SHANKAR_DEO on 1 August, 2012 - 01:59

टिळक पहाताय ना सारे.....!
तुमच्या जन्मसिद्ध हक्क असलेल्या
स्वराज्याची लक्तरे..
तुमच्यावेळी एक बरे होते टिळक
मधल्या सुटीत मुलांना खायला शेंगा होत्या..
आज आम्ही टरफले निवडत आहोत..
स्वराज्याच्या शेंगा कुणी खाल्ल्या टिळक..?
आम्हाला ठाऊक आहे, तुम्ही चहाडी करणार नाही.
चिखली गावात तुमचा जन्म झाला,
पण संपूर्ण देशाचाच सध्या चिखल झालेला आहे..
या चिखलातील चिखलफेक पहाणे नको म्हणूनच तुम्ही पाठ फिरवून उभे आहात चौपाटीवर...
टिळक... सांभाळा... एखादा गोळा तुमच्याही अंगावर पडेल आणि हे लोक तो साफ करतील... तुमच्याच उपरण्याने....

-- श्री. शंकर पु. देव

Group content visibility: 
Public - accessible to all site users