नेमेचि येतो...!
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
0
कालपासून धो धो पडणार्या पावसात
नव्याने वाहून जाईल सुचलेलं शहाणपण
सुरू होईल पुन्हा पाण्याचा बेलगाम वापर
निर्धास्त होतील आपली कोडगी मनं
वर्षा संचयनाचे बेत राहतील कागदावरच
आणि बांधकामांना ऊत येईल राजरोसपणे
सोयीस्करपणे विसरली जाईल पाणीटंचाई
आपापल्या कामाला लागतील सगळे
'नेमेचि येतो' म्हणून मनाची समजूत काढत
अजून एका वर्षाची सोय झाली या आनंदात
पुन्हा सुरूवात होईल नव्या दुष्टचक्राची
कालपासून धो धो पडणार्या पावसात
नव्याने वाहून जाईल सुचलेलं शहाणपण!
विषय:
प्रकार:
शेअर करा