गुढकथा -७.४० कर्जत फास्ट

Submitted by प्रसन्न अ on 31 July, 2012 - 13:26

भे** , साला हरामखोर स्वत : गाडी घेऊन येतो, त्याला काय माहित.. इथे १५ मिनिट जरी उशीर झाला तरी घरी पोचायला २ तासाचा फरक पडतो.. " तो वैतागत बडबडतो ..
हो न यार साला किती ट्राफिक ... आणि हा पाऊस.. त्यात आज ट्रेन पण लेट.. त्याचा मित्र .
साला सगळे भिकारचोट.. रेल्वे वाले तर त्याहून हरामखोर.. "@#@##$.." "मा#$%%.." त्याचा स्वतावरचा ताबा सुटत चाललेला असतो .
अरे काय घाणेरडी लाइफ आहे साली, दिवस भर आपल प्रवासच करत राहा. मुंबईतल्या मुंबईत .. आज हे बिघडल , उद्या सिग्नल तुटला , परवा गाडीच ठोकली .. अरे काय चाललंय काय.. तो बेभान होत असतो . .आजूबाजूचे हसत असतात .. त्याला त्याची पर्वा नसते ..
७.४० ची कर्जतला जाणारी जलद लोकल आज १० ते १५ मिनिट उशीराने अपेक्षित आहे... इति मध्य रेल्वे
हे ऐकून तर तो फुटतोच .... त्याचा मित्र पण चक्रावतो .. अरे शांत राहा .. आपण काही करू शकत नाहीयोत रे.. तू कशाला त्रास करून घेतोस?
अरे त्रास.. साल्या माझ्या आईचा आज वाढदिवस आहे .. घरी बिचारी एकटी असते.. कधी नव्हे ते आज जरा एक तास वेळेवर जाईन असा विचार करत होतो .. काय फरक पडला ... भे ** ... तो उसळतच असतो .
तेवढ्यात गाडी येते .. प्रचंड गर्दी , माणसं तुडुंब भरलेली .. त्याच्या मित्र कसाबसा लटकत पुढचा डोअर पकडतो.. हा सुद्धा पकडायला जातो.. पण समोरच एक मुलगा त्याच्याच वयाचा . त्याला मागे खेचून घुसतो..
अरे ल ** , कुत्र्या .. हा त्याची कॉलर खेचायला लागतो.. पण तो तोही याला ढकलत असतो .. शेवटी गाडी सुटते ... हा मागे मागे रेटला जातो.. नाही हि गाडी सोडायची नाही .. तो गाडीत चढायचा अविरत प्रयत्न करत असतो ..
शेवटी मागच्या डब्याच्या दरवाज्यात हा उडी घेतो. आधीच ६ माणस लटकत असतात हा सातवा... अरे मर्नेक्या हे क्या ... कोणीतरी खालून किंचाळत.. याला भान नसत ..
आई - वाढ दिवस- ट्राफिक - हलकट बॉस - समोर लटकणारा . आपल्याला ढकलून पुढे घुसणारा हरामखोर... आई - वाढदिवस - हलकट बॉस डोक्यात ज्वालामुखी फुटत असतात ..
या कुत्र्याला फोडायचा बस्स.... तो कसाबसा लटकत असतो.. स्टेशन भराभर मागे पडत असतात ... कधीतरी गाडी डोंबिवलीला लागते .. समोरचा उतरून चालायला लागलेला असतो...
त्याला बघताच भान हरपत .. कानशील तापतात ... लव* मला ढकलतोस.. हा कमरेचा बेल्ट काढतो ... गाडी हळू हळू वेग घ्यायला लागते .. हा जीव घेऊन त्याच्यावर बेल्ट हाणतो .. साट.. मानेवर फटका बसतो.. दरवाज्यातले याला अडवण्याचा प्रयत्न करतात.. "तो" तिकडेच कोलमडतो .. अजून एक. हा अजून एक हाणतो . पण तो आता त्याचा बेल्ट पकडतो.. आणि गाडीबरोबर धावायला लागतो ... हा बाहेर खेचला जातो.. लोक ओरडतात .. पण गाडीचा वेग वाढतो..
आणि काही कळायच्या आता समोरचा गाडी आणि platform च्या मध्ये खेचला जातो.. बेल्ट तसाच हातात ... विचित्र आवाज होतो ... समोरचा अर्धा कापला जातो... हा डोळे फाडून फाडून पाहत असतो .. लोक ओरडतात ..
केंव्हातरी गाडी थांबते .. काही लक्षात येण्याच्या आत.. कोणीतरी जोरदार पोटात गुद्दा हाणत. अजून चार पाच जण घोळका करून .. याला तुडवायला लागतात.. सालेने मर्डर किया.. मार सालेको ..
हा नाय, नाय ओरडत असतो. पण परिस्थिती आवाक्याबाहेर गेलेली असते ... याची शुद्ध हरपते ...

रात्रीचे ९.४५ : रेल्वे पोलीस दल ,डोंबिवली .
याला भान येत.. आणि आठवत काय झालंय ते.. प्रचंड ओकारी आल्यासारखं होत.. आपण काय करून बसलो .. समोरचा पोलीस उठून याच्यासमोर येतो ..
"साहेब" मर्डर केलात आज ... कळतंय का ? मर्डर ..
हा त्याच्या थंड आवाज ऐकून हा गळपळतो.. मी नाय , मी नाय अस काहीस बरळतो .. पण तोंडातून काहीतरी विचित्रच आवाज निघतात ..
तेवढ्यात याचा फोन वाजतो .. "AAI calling ... " हा कसाबसा फोन उचलतो ..
अरे कुठेस तू.. १० वाजले अरे "...
हा - "आई.. आई.." अग...
"बाळा अरे तुझ्या आवडीची खीर केलीये मी.. बाहेर काहीतरी खाऊन आलास तर बघ.. किती रे उशीर ... कुठे पोचलास ?"
"आई मी करतो तुला फोन अग .." कट.
स्टेशन अजूनही गजबजलेल . प्रत्येक जण आपापल्याच विश्वात .. हा बघतोय... काही तासांपूर्वी हा त्यांच्यातलाच होता.. आणि आता ??
तेवढ्यात त्याच लक्ष " बाहेर झाकून ठेवलेल्या प्रेताकडे जातं. आता ओकारी थांबत नाही .

वेळ रात्री ११.००
फोन बंद
RPF : बोल का मारलस?
तो : नाही हो साहेब.. मी त्याला ओळखत पण नाही
RPF : मग काय असंच मारलस भाड्या .. आ ?
तो : .....
बोल कि असंच मजेत मारलस का? कुठे कामाला आहेस?
तो : XYZ company ltd
मयताशी काय दुष्मनी ? भडव्या अर्धा कापला गेलाय बरोबर ..
तो : साहेब मी नाय हो.. मी नाय ...
पट्ट्याने मारलस ना..
RPF : पाटील ती बॉडी हलवा लवकर .. आणि हा पट्टा फ्रीज करा .. मेन पुरावा आहे... मगाशी घेतलेल्या लोकांची जी जबानी आहे तिच्या चार कॉप्या तयार करा ... उद्या केस फाईल करू . आज याला कल्याण ला हलवावा लागेल..
तो: साहेब सोडा ना प्लीज मला.. मी काय नाय केल .. आईचा वाढदिवस आहे हो आज प्लीज सोडा ना .. किती हवेत तुम्हाला ...?
RPF : (संणकन कानाखाली पेटवून ) ए सोडा काय ? आ? तुला काय तिकीट नाय म्हणून पकडला आहे कारे भाड्या .. मर्डर केलास आत्ता .. आणि सोडा बोलतोस.. तुला तर फाशीच होणार आता एका तरुण पोराचा जीव घेतलास ...
तो : आई ... आई...... आई कुठेस ग तू....

*******

अभय अरे काय झाल? . उठ उठ...
आई .. आई .. .....
अभय अरे उठ कि ..
तो खडबडून जागा होतो .. अंग घामाने थबथबलेलं असत..
हळू हळू त्याला शुद्ध येते ,, आई बाबा दोघेही बाजूला उभे असतात ... आई प्रचंड चिंतेत असते ..
याच्या घशाला कोरड पडलेली असते.. हा खुणेनेच पाणी मागतो .. आक्खी एक बाटली पाणी प्यायल्यावर याच्या जीवात जीव येतो .. आई विचारते. काय रे कुठलं स्वप्न पडल का ? किती जोरात ओरडलास.. आम्ही दोघेही किती घाबरलो
काही नाही आई .. मला आठवत नाही काय दिसलं ते.. तुम्ही जाऊन झोपा...
थोडा वेळ आई याच्या केसातून हात फिरवत बसते .. कधीतरी याला परत झोप लागते
*****

दुसरा दिवस

हा ऑफिस मध्ये .. काय भयंकर स्वप्न पडलं काल? एवढ खर.?. आत्ता नुसती कल्पना जरी केली ना . तरी थरकाप उडतोय .. तो मारणारा कोण असेल? त्याला कधी पाहिल्याचं आठवत नाहीये..
त्याची नंतरची अवस्था अतिशय दयनीय होती..त्याच्या आईचं काय झाल असेल ?
आणि जो मेला तो? बापरे .. त्याचा चेहरा पण दिसला नाही......
असल्याच काहीबाही विचार्रांनी त्याचं कामातलं लक्ष उडतं ,
जिभेवर कडू चव रेंगाळत असते .. बाहेर भयंकर पाऊस पडत असतो .. दिवसभर याचे डोळे चुरचुरत असतात .. हा एक तास आधीच निघतो
पण पावसामुळे स्लो लाईन बंद झालेली असते .. हा भयंकर गर्दीतलाच एक असतो .. पुलावर असताना कुठलीशी फास्ट ट्रेन येताना दिसते ..हा जीव घेऊन पुलावरून उद्या मारत खाली उतरतो .
platform वर प्रचंड गर्दी असते हा तसाच सुसाट गर्दीत घुसतो येईल "त्याला" मागे लोटत , धक्का बुक्की करत कसाबसा दरवाज्यात लटकतो
कधीतरी डोंबिवली येत. हा सुखरूप उतरतो आणि चालायला लागतो ... तेवढ्यात मानेवर सणसणीत काहीतरी आपटत .. बाजूने जाणार्या ट्रेन च्या दरवाज्यात एक तरुण हातात पट्टा घेऊन उभा असतो , त्याला एकदम आठवत हाच तो ....
तो अजून एक वार करणार तेवढ्यात हा बेल्ट पकडतो .. पण त्याचं एक टोक याच्या स्लीव्स मध्ये अडकत .. ते निघता निघत नाहीये

********
आता आजूबाजूची लोक ओरडायला लागलीयेत .. गाडीने वेग घेतलाय .. आणि हा फरफटत गाडी च्या दिशेने ओढला जातोय ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे भयानकच!

मीही अर्धी बाटली पाणी प्यायले वाचुन झाल्यावर!

खरच लोकलचा प्रवास बेकार! Sad

सुहास्य Happy
हो अर्थातच हे काल्पनिक आहे

पण या अशा मारामार्या रोजच्याच असतात .
कसलातरी राग कुठेतरी काढला जातो.. आणि २ क्षणात होत्याचं नव्हत होत

कथा आवडली. गूढ काय ते कळले नाही. कथेचा मधला भाग (अभय स्वप्नातून जागा होतो तिथे) वाचतानाच पुढे काय असेल ह्याचा अंदाज आला.

पुढे घडणार आहे त्या घटनेची आगाऊ सूचना अभयला मिळते. आणि अभयचाच जीव जाणार असे संकेत असतात. पण मधल्या भागात अभय झोपेतून उठताना "आई .. आई .. मी नाय .. मी नाय काय केल...." असे जे बरळतो त्यामुळे खून करणारा अभय असू शकेल असा अंदाज येतो. आणि दुसर्‍या दिवशी मात्र "तो मारणारा कोण असेल?" असा विचार अभय करतो असे लिहिले आहे. म्हणजेच स्वप्नामधे मारणारा तो मी नाही हे अभय ला कळलेले असते. मग "मी नाय काय केल...." या संवादाचे कारण कळले नाही. Uhoh

Pages