वरुनी दिसावयाला सगळे झकास होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 31 July, 2012 - 10:07

गझल
वरुनी दिसावयाला सगळे झकास होते!
असुनी फुलात, काटे अगदी उदास होते!!

थरकाप काळजाचा व्हावा असेच होते;
ते शहर माणसांचे इतके भकास होते!

जे जे मनात होते, ते ते तसेच घडले!
अगदी अचूक माझे सारे कयास होते!!

बदमाश कोण होते? ठाऊक त्यांस होते!
दुनियेस दाखवाया त्यांचे तपास होते!!

अडले कुठेच नाही त्यांचे कधीच घोडे;
करण्यात ते दिखावा निष्णात खास होते!

गेलीस तूच इथुनी, कळले लगेच मजला;
नव्हती फुले तरीही त्यांचे सुवास होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users