चार भिंती आणखी छप्पर असावे लागते

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2012 - 06:47

चार भिंती आणखी छप्पर असावे लागते
पण घरी जाण्यास घर हे घर असावे लागते

चाललो बाहेर मी... तू 'नीट जा' म्हणतेस ना
काळजाला आतुनी अस्तर असावे लागते

जोजवे दुर्गंध मदिरेचा... तरी झोपायला
या बिछान्यावर तुझे अत्तर असावे लागते

एकटीला जग जगू देईल हे समजू नको
मिरवण्या वैधव्यही सासर असावे लागते

त्या जगामध्ये विकावी लागली माणूसकी
माणसाचे मन जिथे पत्थर असावे लागते

तू बदलल्यावर किती स्थित्यंतरे होतील बघ
लोण क्रांतीचे कुठे जगभर असावे लागते

न्या चला हा एकदाचा वारला ... येवो मनी
सांत्वनाचे बोलणे वरवर असावे लागते

सोडला असता तसा मागेच माझा प्राण मी
पण तुझ्याखातर... तुझ्याखातर असावे लागते

जन्मभर या वास्तवाची लागली नाही हवा
लागते तोवर हवा जोवर असावे लागते

मी शिकाऊ सांगण्याने तू शिकाऊ राहशी
'बेफिकिर' गझलेत प्रोफेसर असावे लागते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्रदय पिळ्वटून टाकणारे शेर बेफिजी,

(नतमस्तक)

-सुप्रिया.

( अवांतर- मतल्यावरुन माझी ही गझल आठवली...

जेवलो एकत्र केव्हा ?.....आठवावे लागते!
चार भिंतींना अताशा घर म्हणावे लागते! )

लाखात एक ही गझलही खूप आवडली नेहमीसारखीच लाखात एक आहे ही

सगळेच शेर एकापेक्षा एक !

'बेफिकिर' गझलेत प्रोफेसर असावे लागते>>>>>ही ओळ जरा जास्त ईंप्रेशनफुल्ल वाटते म्हणून जरा जास्त आवडली

एकेक द्विपदी काळजाचा ठाव घेणारी.
ह्रदय पिळ्वटून टाकणारे शेर बेफिजी, लाखात एक ही गझलही खूप आवडली नेहमीसारखीच लाखात एक आहे ही

सगळेच शेर एकापेक्षा एक !
अप्रतिम

आवडली !

क्लासच............

आता क्लासच काढा..... तुम्ही पण प्रो. व्हालच (यथावकाश Wink )