गणितातले रूल बदलले आहेत ?

Submitted by चित्रा on 31 July, 2012 - 03:40

लेकीच्या गणिताच्या पेपर मधल्या एका प्रश्नाने (नाही उत्तराने ) विचारात पाडले आहे ...

माफ करा हं... पण पुढे सगळे इंग्रजीत टायपले आहे .. नीट प्रश्न कळावा म्हणून ...

Lowest possible six and seven digit number from given digits...?

My daughter had a question in her exams to form Lowest possible six and seven digit number from given digits... 2,6,7,0 and 9.

She created - 200679 and 2000679.

Teacher marked her wrong saying the correct answer is 220679 and 2220679. She said that the rule regarding creating such numbers for fifth standard is changed. Even after insisting she didnot explain the rule but said that she will take a revision on it.

Can anyone tell me.. what is the rule and how it has changed for fifth standard?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

barober aahe nanba, majhya kadhun tya post kadhe durlaksha jhaale. kaay wichar karun (kiwwa aajibaat na karun) boltayat ki kuthe tari waachun boltayat kaay maahit bail.

सिक्षीकेने नियमांचं रॉन्ग ईन्टर्प्रितेशन केलय.
तीने "०" हा आकडा मानलेला नाहीये. म्हणून तीच्या दृष्टीकोनातून तीचच उत्तर बरोबर आहे.

पण गणिताचे नियम आणि स्पर्धापरीक्षा या दोघांचाही विचार करता, २००६७९ हेच उत्तर बरोबर आहे.

नो सेकंड थॉटस् अबाऊट ईट.

तीने "०" हा आकडा मानलेला नाहीये. म्हणून तीच्या दृष्टीकोनातून तीचच उत्तर बरोबर आहे.

तरी तिचे उत्तर चुकतेच.

२२०६७९ पेक्षाही २०२६७९ लहान आहेच ना?

लोएस्ट पॉसिबल याचा अर्थ काय?

<< rule regarding creating such numbers for fifth standard is changed >>
Uhoh
गणिताचे नियम असे इयत्तेप्रमाणे बदलतात की काय?
काय बिनधास्त आणि बिनडोक शिक्षिका आहे Sad

वाचकहो,

डेलियाला अनुमोदन. बरं झालं ही शिक्षिका गणिताची होती ते. कल्पना करा की ती भौतिकशास्त्राची शिक्षिका आहे. आणि पाचव्या यत्तेसाठी गुरुत्वाकर्षणाचे नियम वेगळे आहेत असं सांगून मुलांना गच्चीतून ढकलून देते आहे!
Uhoh + Angry + Lol = :संमिश्र भावना व्यक्त करणारा बाहुला:

आ.न.,
-गा.पै.

आज ५-६ पालक गेलो होतो टीचर ला भेटायला. तासभर वाट पाहिल्यावर appointment घेवून या मगच madam भेटतील असा निरोप मिळाला. लेकीच्या कम्युनिकेशन मध्ये नोट लिहिते आहे. पाहूयात कधीची appointment देताहेत madam ते. नाहीतर नक्की principle ला भेटावे लागेलसे दिसते.

चित्रा ताई,
थोडे वेगळे मत मांडतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा.
जे काय ५वीच्या टीचरनी केलंय, प्लीज डू नॉट मेक अ बिग इश्यू ऑफ इट. कुठे तरी पीटीए मीटिंगनंतर वगैरे हळूच सांगा कानात की 'अहो, ते अमुक गणित जरा वेगळं उत्तर असेल असं वाटतंय, माझ्या मॅथ्स प्रोफेसर भावाने तसं मला सांगितलं आहे.'
५वी पर्यंत ठीक आहे,
पुढे इतकं किचकट काहीकाही त्या मुलांच्या अभ्यासक्रमात भरलं आहे की बास! आयसीएसई च्या अभ्यासक्रमात ३री मधे मॅरॅस्मस अन क्वाशिर्कोर च्या व्याख्या आहेत. त्या टिचरच्याही डोक्यापलिकडचे आहे ते. तुमच्या लेकीला 'टीचर सर्वज्ञ नाहीत, कधीकधी प्रत्येक माणूस चुकू शकतो' याचा धडा देण्यासाठी हे उदाहरण वापरा.
जर टीचरने चूक केली अशी शंका तुला आली, तर अमुक मार्गाने आपण त्याचे निराकरण करू शकतो, उदा. गूगल, संदर्भ पुस्तके, ओळखीच्या अ‍ॅथॉरिटी व्यक्ती इ..हे तिला सांगा.
कारण, ८वी नंतर टीचरने काय चूक केली हे तुम्हाला समजणारच नाहिये.. या घटनेच्या निमित्ताने लेकीला 'शिकायचं कसं' हे शिकायला मिळेल असं वाटतंय, अन तेच तुम्ही करा असं सुचवू इच्छितो..

(थोडं विस्कळीत मांडलं आहे. आशा करतो, तुम्हाला आशय ध्यानी आला असावा)

ईब्लीस : अगदी मनातले बोललात. Happy

फक्त काळजी इतकीच वाटते कि या वयात मुलांवर टीचर चा इतका प्रभाव असतो ना कि ते आपलं प्रत्येक वेळी ऐकतीलच असे नाही.

पण तुझा सल्ला अगदी पटला. कमीत कमी पुन्हा असे काही घडे पर्यंत तरी वाट पहावी असा विचार करते आहे.

रच्याकाने : लेकीने योग्य तो धडा घेतला आहे असे आत्तातरी वाटते आहे.

मायबोलीकरांचे आभार !!!

इब्लिस,

उत्तम संदेश! मुलीच्या बाजूला आणि शिक्षिकेच्या बाजूला परिस्थिती कशी हाताळावी हे अगदी अचूकपणे सांगितलंत. Happy

आ.न.,
-गा.पै.

इब्लिस, इश्यु न करता, हळूच सांगण्याबद्दल +१ पण आपण हळूच सांगून बदल होईल किंवा ते त्यांचा इगो बाजुला ठेवून हवा तो बदल करतील की नाही ह्यात मला शंका आहे.
लहान मुलांना आपण बरोबर उत्तर देऊन सुद्धा मार्क कमी मिळाले हे पचायला, समजून घ्यायला जड जातं. लहान मुलांना आपली उत्तरं चुकली हे कळल्यावर सुद्धा किती वेळ अ‍ॅक्सेप्ट करायला जड जातं तिथे उत्तर बरोबर असताना चूक दिल्यावर तर विचारायलाच नको.
मुलांनी जर बरोबर उत्तर दिलय तर फक्त त्या बाईंचा/शाळेच्या इगोला धक्का लागू नये म्हणून आपण फक्त सांगून पहावे, नाही बदल केला तर सोडून द्यावे किंवा मुलांनी "कसं शिकावं" हे समजून घ्यावे हे इतकं नाही पटत.

माझं स्पष्ट मत आहे, इश्यु करु नका पण प्रिन्सिपलांच्या निर्देशनास आणून द्या. त्या टिचरांनाही बोल लावायची गरज नाही, चुका होतात, होऊ शकतात पण त्या करता बळच पोरांना अकाली भलते धडे द्यायची वेळ येऊ नये.

प्रिन्स्पलांना सांगावे की नाही हा चित्रा ह्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण सांगितल्यावर ते ही तेढ कशी सोडवतील कडे लक्ष लागून राहिल.

आकडा जास्त वेळा आला आहे.

असं असेल तर २००००० आणि २०००००० हे नीचतम होतील ना? (६ व ७ वेळा शून्य लिहीण्याचं मी टाळलं आहे ). प्रश्नात असंही कुठे लिहीलेलं नाही की सगळे आकडे एकदा तरी वापरलेच पाहीजेत.

>>
अरे चिमण स्पष्ट लिहिले आहे.
Lowest possible six and seven digit number from given digits... 2,6,7,0 and 9.

जर याचा अर्थ आपण ते वापरले पाहिजे असे दिले नाही असा काढला तर आपण असे पण म्हणु शकतो की त्यावर आणखी काही प्रक्रिया करु नये असे दिले नाही मग
२००००० / २ ही सर्वात छोटी सहा अंकी संख्या होइल ना.

माझ्या मते from given digits याचा अर्थ वापर हवा असा आहे.
चित्राच्या मुलीचे उत्तर एकदम बरोबर आहे.

पण याचा मोठा इश्यु करु नका हे मात्र पटले.

तरी देखिल मुलांच्या अशा गोष्टी लक्षात रहातात हे पण खरे म्हणुन मुलीला पण समजाउन सांगा.

.

माझ्या विचारांना अनुमोदन देणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
चित्राताईंनीही मनातलेच लिहिले म्हटले, म्हणून आनंद झाला. किरण यांनाही पोस्ट आवडली, याचा विशेष आनंद झाला.
बागुलबुवा,गापै, रैना, मंजूडी, आस्चिग, धन्यवाद!
**
वैद्यबुवा,
आपले म्हणणे योग्य आहे, परंतू
>>लहान मुलांना आपली उत्तरं चुकली हे कळल्यावर सुद्धा किती वेळ अ‍ॅक्सेप्ट करायला जड जातं तिथे <<
यातच उत्तर दडलेले आहे..
...तिथे टीचरनेही एकदा कमिट केलल्यावर आपली चूक झाली असे प्रांजळपणे कबूल करणे त्यांनाही थोडे जड जाऊ शकेल. नाही का? म्हणून इतर कुणासही मधे न घालता त्यांनाच आडवळणाने सांगा असे सुचविले होते.

तिथे टीचरनेही एकदा कमिट केलल्यावर आपली चूक झाली असे प्रांजळपणे कबूल करणे त्यांनाही थोडे जड जाऊ शकेल. नाही का? म्हणून इतर कुणासही मधे न घालता त्यांनाच आडवळणाने सांगा असे सुचविले होते. >>>>> आडवळणाने मान्यच आहे पण सांगा नक्की हे म्हणत होतो. मुलं लहान असल्यामुळे गोष्टी अ‍ॅकसेप्ट करायला शिकत आहेत. मोठ्यांना मोठे असल्यामुळे (इगो जास्त बळावल्यमुळे) प्रांजळपणे कबूल करणे जड जाऊ शकते हे ही मान्य पण फक्त त्याकरता ह्यावेळी सोडून देऊ नये असं म्हणतोय. मोठ्यांनी त्यांचा इगो चेक मध्ये ठेवणे हे त्यांचे काम/जवाबदारी आहे.
परत एकदा, आडवळणानी, शांतपणे त्या बाई ऑफेंड (जे जरा अवघडच आहे) होणार नाहीत अशा तर्‍हेने हे हँडल करण्याबद्दल मी तुमच्याशी सहमत आहे.

Pages