Submitted by चित्रा on 31 July, 2012 - 03:40
लेकीच्या गणिताच्या पेपर मधल्या एका प्रश्नाने (नाही उत्तराने ) विचारात पाडले आहे ...
माफ करा हं... पण पुढे सगळे इंग्रजीत टायपले आहे .. नीट प्रश्न कळावा म्हणून ...
Lowest possible six and seven digit number from given digits...?
My daughter had a question in her exams to form Lowest possible six and seven digit number from given digits... 2,6,7,0 and 9.
She created - 200679 and 2000679.
Teacher marked her wrong saying the correct answer is 220679 and 2220679. She said that the rule regarding creating such numbers for fifth standard is changed. Even after insisting she didnot explain the rule but said that she will take a revision on it.
Can anyone tell me.. what is the rule and how it has changed for fifth standard?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिक्षिकेच चूक आहे.. त्यांना
शिक्षिकेच चूक आहे.. त्यांना त्यांनी लिहिलेली संख्या आणि तुमच्या लेकीने लिहिलेली संख्या ह्यांची वजाबाकी करायला सांगा जर वजाबाकी करता आली तर तुमच्या लेकीने लिहिलेली संख्या बरोबर आहे हे त्यांना मान्य करावेच लागेल..
प्रश्नात असे कुठेही लिहिलेले नाही की ० हा आकडा एकदाच वापरावा.. त्यामुळे अंकगणिताच्या नियमा नुसार ० सगळ्यात लहान अंक असल्याने तुमच्या लेकीने लिहिलेले १००% बरोबर आहे.
प्रश्न परत एकदा नीट तपासा... जर त्यात ० हा आकडा एकदाच वापरावा असे असेल तर मात्र शिक्षिकेने लिहिलेले बरोबर आहे.
टीचर चुकल्यात. आंगठे धरुन
टीचर चुकल्यात. आंगठे धरुन उभ्या करा.
Teacher marked her wrong
Teacher marked her wrong saying the correct answer is 220679 and 2220679.>>>
कुठला आकडा किती वेळा वापरावा याविषयी काही अटी होत्या का प्रश्नात?
शिक्षिकेच्या व मुलीच्या
शिक्षिकेच्या व मुलीच्या उत्तरावरून असं वाटतंय की एक आकडा कितीही वेळा वापरला तरी चालतंय.. २००६७९ मधे शून्य व २२०६७९ मधे २ हा आकडा जास्त वेळा आला आहे.
असं असेल तर २००००० आणि २०००००० हे नीचतम होतील ना? (६ व ७ वेळा शून्य लिहीण्याचं मी टाळलं आहे
). प्रश्नात असंही कुठे लिहीलेलं नाही की सगळे आकडे एकदा तरी वापरलेच पाहीजेत.
>> She said that the rule regarding creating such numbers for fifth standard is changed.
शिक्षिकेच्या बिनधास्त उत्तराला सलाम!
मंजूडी : तसं काही म्हटलं
मंजूडी : तसं काही म्हटलं नव्हतं प्रश्नात.
चिमण : २००००० आणि २०००००० हे नीचतम होतील ना? >> अगदी अगदी ... माझ्याही मनात नेमके हेच आलं होतं
० ने सुरुवात केली तर ? किरण
० ने सुरुवात केली तर ?
किरण मंदबुद्धे
( वसंतदादा विद्यापीठ )
चित्रा .. १ स. पे. प्रश्ण ..
चित्रा .. १ स. पे. प्रश्ण .. "शाळा कुठली ... ?" ... <<प्लिज दिवे घ्या>>
० ने सुरुवात केली तर ? किरण
० ने सुरुवात केली तर ?
किरण मंदबुद्धे
____/\______ किरणराव
( वसंतदादा विद्यापीठ )
>>>>>>>>>>>>>
काहीतरी नजरेतून सुटतय. एक
काहीतरी नजरेतून सुटतय. एक आकडा अनेक वेळा वापरता येत असेल (आणि तसे तुमच्या मुलीच्या आणि शिक्षीकेच्या दोघांच्या उत्तरात केलेलेच आहे) तर चिमण म्हणतोय ते उत्तर पाहिजे. तेंव्हा तुमच्या मुलीचे आणि शिक्षीकेचे अशी दोन्ही उत्तरे चुकलेली आहेत.
वर्गात काही विशेष सांगितले होते का अशा गणितांबद्दल? इतर मुलांची उत्तरे काय आहेत? ती शिक्षीका म्हणते त्याप्रमाणे असतील तर तशी का हे विचारून पहा त्यांना.
शिक्षिकेच्या बिनधास्त
शिक्षिकेच्या बिनधास्त उत्तराला सलाम >>>
अगदी अगदी!
शिक्षिका म्हणतात तसला काही नियम मला तरी आढळला नाही.
पण एक शक्यता आहे. 'दिलेले सर्व आकडे एकदा तरी वापरलेच पाहिजेत. पण त्यातील शून्य मात्र एकदाच वापरता येते.' असे काही सांगितले आहे का शाळेत?
इथे माबो वर रविंद्र प्रधान
इथे माबो वर रविंद्र प्रधान गणिताच्या ट्युशन्स घेणारे, ते सभासद आहेत . त्यांना विपू केली तर उत्तर मिळेल.
अरभाटा परिक्षेत विचारलेला
अरभाटा परिक्षेत विचारलेला प्रश्न आहे आणि पूर्ण प्रश्न वर लिहिलेला आहे.. त्यामुळे तू विचारात घेतलेली शक्यता चूक आहे... आणि असे आकडे बनवताना परिक्षेतील प्रश्न काय आहे तो महत्त्वाचा नाही का? शाळेत शिकवताना घेतलेले उदाहरण आणि हे उदाहरण वेगवेगळे असू शकते... (उदाहरण... एकदम परचुरे सरांची आणि अरादेशपांडे सरांची आठवण आली, गणित म्हणले की सटकन खडू यायचा अंगावर)
हिम्या, पण शिक्षिकेनं उत्तर
हिम्या, पण शिक्षिकेनं उत्तर देताना << rule regarding creating such numbers for fifth standard is changed >> असं म्हटलंय म्हणजे मूळ नियम किंवा बदललेला नियम काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे नाही का?
हिम्सकूल ह्यांचे बरोबर
हिम्सकूल ह्यांचे बरोबर वाटते.
माझी मुलगी सातवीत आहे. ती अश्या प्रकारची गणिते तुमच्या मुलीसारखीच सारखीच सोडवित असे.
And teacher never marked her wrong
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद !!
नियम इतकाच होता कि प्रत्येक संख्या किमान एकदा तरी वापरली पाहिजे.
माधव : खोटं वाटेल तुम्हाला पण वर्गात जितक्या मुलांना मी ओळखते त्या सगळ्यांची उत्तरे वेगवेगळी आहेत (आणि सगळ्यांची उत्तरे चूक दिलेली आहेत). खूप confuse झाली आहेत ती. हीच मुले मागच्या वर्षी स्कॉलरशिप मध्ये ८०% च्या पेक्षा जास्त मार्क घेतलेली आहेत आणि दोघे तर स्कॉलरशिप मिळवणारी आहेत.
अरभाट : शाळेत काय सांगितले आहे या पेक्षा गणित काय म्हणते हे मला महत्वाचे वाटते.
शिक्षिकेने चक्क रूल बदलले आहेत असे सांगितल्यावर मला वाटले कि खूप दिवसात आपला काही गणिताशी (शालेय) फारसा संबंध आलेला नाही तेव्हा असे खरेच झाले असेल काय.
म्हटलं पुन्हा त्याच शिक्षिकेला भेटायला जाण्याच्या आधी योग्य माहिती मिळवावी आणि त्यासाठी मायबोली शिवाय दुसरे कोणी दिसलं नाही मला
प्रश्न मार्कांचा किंवा कोणाचे बरोबर कोणाचे चूक यापेक्षा जास्त काय बरोबर काय चूक असा आहे. माझ्या मते गणित हा कोणत्याही अभासक्रमाचा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि जर पायाच कच्चा राहिला तर नंतर खूप त्रास होवू शकतो.
अमा : रवींद्र प्रधान यांना विपू करते आहे.
नियम इतकाच होता कि प्रत्येक
नियम इतकाच होता कि प्रत्येक संख्या किमान एकदा तरी वापरली पाहिजे>>> मग तुमच्या मुलीचे उत्तर बरोबर आहे. शाळेत जाऊन शिक्षिकेशी बोला, आणि ते उत्तर 'चूक' का दिलं त्याचं तिच्यामते कारण इथेही नक्की लिहा.
ठिक आहे. पण नियम होता तो
ठिक आहे. पण नियम होता तो प्रश्नात तरी कुठे दिला आहे? म्हणजे तो शाळेत सांगितलेला असू शकतो ना? मग शाळेत दुसरेही सांगितले असण्याची शक्यता आहे. असो.
दुसरे म्हणजे 'प्रश्न काय विचारतो हे महत्त्वाचे आहे' हे थोडे घातक ठरू शकते. शाळेत प्रत्येक संकल्पनेची काही पूर्वपिठिका तयार करून घेतात. त्याला अनुसरून प्रश्न असतील तर प्रत्येक वेळी प्रश्नात ती पूर्वपिठिका सांगितली जात नाही. तेव्हा तिच्या शाळेची पद्धत काय आहे ते महत्त्वाचे.
राहता राहिला तिने गणित शिकण्याचा प्रश्न. तो सर्वात मुख्य. तिला जर 'दिलेल्या अटींनुसार अमुक संख्या लघुत्तम, अटी वेगळ्या असतील तर तमुक संख्या लघुत्तम' हे कळले असेल तर तिला गणित कळले.
मंजू अंकगणिताचे नियम फारच सरळ
मंजू अंकगणिताचे नियम फारच सरळ आहेत की.... ह्यात कुठला आलाय मूळ नियम आणि कुठला आलाय बदलेला नियम.. ० ते ९ हे अंक आहेत त्यात ० सगळ्यात लहान तर ९ सगळ्यात मोठा.. त्यातील कुठलेही अंक वापरुन नवीन लहानात लहान संख्या तयार करावयाची झाल्यास सगळ्यात लहान अंक पहिला लिहून त्यानंतर चढत्या सारणीने पुढील अंक लिहायचे.. दिलेल्या अंकात ० असल्यास तो पहिला लिहिता येत नाही कारण संख्या सुरु करताना ० असल्यास तो धरला जात नाही.. त्यामुळे तो कायमच दुसर्या स्थानावर लिहायचा.. आणि पहिला अंक उरलेल्या अंकांतील सगळ्यात लहान अंक लिहायचा...
अरभाटा.. अंकगणित जागतिक
अरभाटा.. अंकगणित जागतिक स्तरावर एकच असेल माझ्यामते, त्यात शाळेशाळेत फरक असेल तर अवघडच होईल नाही का??? शाळेत जर असले काही अचाट नियम शिकवत असतील तर धन्य ती शाळा..
अरे बाबा, अंकगणित वेगळे नाही
अरे बाबा, अंकगणित वेगळे नाही शिकवत रे! आणि जागतिक स्तरावर एकच असते. शाळेत अंकगणित बरोबर शिकवतात. ते शिकवताना असेही सांगत असतील की 'अश्या प्रकारचा प्रश्न आला तर प्रत्येक आकडा एक वेळा तरी वापरायचाच व.... इ. इ.' या अटी पाळूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेत लघुत्तम संख्या शोधायची आहे. याचा अर्थ हे त्या परीक्षेपुरते आहे व अटीसुद्धा तेवढ्यापुरत्या आहेत. बदललेला नियम अश्या अर्थाने असेल. असे होऊ शकते हे समजून घेऊ. तेव्हा खरा प्रश्न असा आहे की या अटी नसतानासुद्धा तिला योग्य संख्या शोधता येते का? माधव यांनी बरोबर मुद्दा मांडला आहे.
अरभाट: अगदी मान्य तुमचे
अरभाट: अगदी मान्य
तुमचे म्हणणेही बरोबर आहे पण त्यासाठी हि मुले फार लहान आहेत हो.
आणि दुसरे म्हणजे शाळेप्रमाणे गणित बदलत नाहीच ना. त्याचे मूळ नियम तेच राहतात हां जर वेगळ्या पूर्वपिठिकेनुसार प्रश्न विचारायचे असतील तर ती त्या त्या प्रश्नात सांगितलीच पाहिजे नाहीतर by default गणिताचे मूळ नियम गृहीत धरून ते सोडवायचे असे आम्ही शिकलो आहोत.
हिम्सकूल >> सहमत
त्याचे मूळ नियम तेच राहतात
त्याचे मूळ नियम तेच राहतात हां जर वेगळ्या पूर्वपिठिकेनुसार प्रश्न विचारायचे असतील तर ती त्या त्या प्रश्नात सांगितलीच पाहिजे >>> अर्थातच. प्रश्न अचूक पाहिजे. म्हणजे एकमेव उत्तर असलेला.
यावरून परिचितांपैकी एकाच्या मुलीचा किस्सा आठवला. इंग्रजी माध्यमात असलेल्या एका लहान मुलीची मराठीची परीक्षा.
प्रश्न: चिंचा --- लागतात.
मुलीचे उत्तर: चिंचा झाडाला लागतात.
नंतरच्या गोंधळाची तुम्ही कल्पना करू शकता
अरभाटा तुझा हा मुद्दा मान्य..
अरभाटा तुझा हा मुद्दा मान्य.. आणि मग माधव जसे म्हणत आहेत तसे शोधावे लागेल..
पण तसे असेल तर मूळ उदाहरणच चुकीचे आहे... त्यात योग्य ती गृहितके दिलेली नाहीत. एखादा अगदी स्पेसिफिक नियम जर सांगितलेला असेल आणि तो मूळ नियमापेक्षा वेगळा असेल तर उदाहरणात तसे लिहायला हवे होते.
हिम्या, पाच(च) आकडे दिलेले
हिम्या, पाच(च) आकडे दिलेले असताना सहा आणि सात आकडी संख्या तयार करायची तर त्यासाठी कुठला आकडा किती वेळा वापरावा असा नियम प्रश्नात दिलेला असण्याची शक्यता आहेच ना?
नियम दिलेला नसेल तर शून्य हा आकडा वापरूनच सगळ्यात लहान सहा आणि सात आकडी संख्या तयार होईल.
अरभाट थेट लेकिच्या notebook
अरभाट
थेट लेकिच्या notebook मधूनः
Rule 1. If one of the given digits is 0, then while writing the smallest number, write the digit 0 in the second place from the left.
Rule 2. While creating the smallest possible five digit number using the given four digits, use the smallest of the given digits twice.
बरोबर ना मंजू... शिक्षिकेने
बरोबर ना मंजू... शिक्षिकेने लिहिलेले उत्तर जर ग्राह्य धरले तर प्रश्न काहीसा असा हवा होता.
Lowest possible six and seven digit number from given digits using 0 only once...?
नाहीत मग चित्रा ह्यांच्या मुलीने लिहिलेले उत्तर बरोबरच आहे..
.
.
त्या गणित शिक्षिकेला शून्याचा
त्या गणित शिक्षिकेला शून्याचा शोध लागल्याचं माहीत नसेल का? वहीतल्या पहिल्या नियमात सरळ सरळ डावीकडून दुसरा आकडा शून्य लिहा असे म्हटल्याने त्यांचा तेवढ्यापुरता नाईलाज झाला असेल.
हे गणित इयत्ता पाचवीला आहे?
हे गणित इयत्ता पाचवीला आहे?
हिम्या, चित्राच्या मुलीने ० दोनदा वापरलं की उत्तरात, मग उत्तर चूक कसं काय?
पण मग तुमच्या मुलीने दोन्ही
हा काथ्याकूट खरे तर आपल्या समाधानासाठी, कारण असे दिसते की तुमच्या मुलीला गणिती विचार कळला आहे. कदाचित शिक्षिकेपेक्षा जास्तच.
अरभाट लेटेस्ट पोस्ट +१ मंजू
अरभाट लेटेस्ट पोस्ट +१
मंजू चित्राच्या मुलीचे उत्तर बरोबर आहे ..
Rule 1. If one of the given
Rule 1. If one of the given digits is 0, then while writing the smallest number, write the digit 0 in the second place from the left.
>>
Teacher marked her wrong saying the correct answer is 220679 and 2220679.
>>
शिक्षकांनी शून्य ३र्या (डावीकडून) स्थानी लिहिला आहे
माझे ग्रुहितक : सर्वात डावीकडील २ हे स्थान १
Rule 2. While creating the smallest possible five digit number using the given four digits, use the smallest of the given digits twice.
>>
शून्य लहान कि दोन?
परत एकदा "शाळा कुठली ... ?"
शिक्षिकेला पुन्हा पहिलीत
शिक्षिकेला पुन्हा पहिलीत बसवा. चुकलीये ती आणि वर स्वतःच्या चुकीवर पांघरूण घालतीये. तुमच्या लेकीची उत्तरं एकदम बरोबर आहेत.
योग्य ती चर्चा सुरु आहेच पण
योग्य ती चर्चा सुरु आहेच पण शाळेतल्या बाई जेव्हा या विषयाची उजळणी करुन घेतील तेव्हा त्या काय सांगतात हे प्लीजच इथे लिहा! जाणुन घ्यायला आवडेल.
शाळा कोणती? हा प्रश्न न राहवुन विचारला आहे!
तुम्ही त्या शिक्षिकेशी बोललात का या विषयावर?
खूप खूप आभार सगळ्यांचे
खूप खूप आभार सगळ्यांचे !!!
अरभाट : हे फक्त आपल्या / माझ्या समाधानासाठी नव्हते हो ... हे माझ्या लेकीला हि पटवण्यासाठी होते कि ती जे करते आहे ते योग्य आहे. तीही खूप गोंधळून गेलेली आहे आणि तिचा मायबोलीकरांवर खूप विश्वास हि आहे. खूप कौतुक केलेलं आहे मायबोलीकरांनी तिचे.
वरची गंमत आणि माझ्या वेळेच्या
वरची गंमत आणि माझ्या वेळेच्या मास्तरांच्या गमती आठवून करमणूक झाली.
ते सगळे नियम चुलीत घालायला सांगा त्या मास्तरणीला.. २००६०० पासून मोजायला सुरुवात केली तर 200679 आणि 220679 यापैकी कोणती संख्या आधी येईल हा साधा प्रश्न मास्तरणीला विचारा.
तुम्ही त्या शिक्षिकेशी बोललात
तुम्ही त्या शिक्षिकेशी बोललात का या विषयावर? >> ओपन डे ला बोलले होते पण त्यानी उत्तर देण्याचे टाळल .. आता उद्या/ परवा परत जाणार आहे भेटायला. नक्की लिहीन इथे.
चिमण, परत एकदा - अगदी!
चिमण, परत एकदा - अगदी!
नाहीतर मायबोली राहूच दे, तिचा 'मोठ्यांना तिच्यापेक्षा जास्त गणित कळते' यावरचाही विश्वास उडायचा
(हा विश्वास खोटा आहे हे कधीतरी पोरांना कळतेच, तेव्हाच आपली खरी परीक्षा सुरू होते!)
चित्रा, तिला कळले आहे अचूक. तिची उत्तरेच तसे दाखवत आहेत. पण ही सगळी चर्चा तिला सविस्तर सांगू नका कृपया
अरभाट
अरभाट
शिक्षकांनी शून्य ३र्या
शिक्षकांनी शून्य ३र्या (डावीकडून) स्थानी लिहिला आहे>>
चारुदत्त : मानलं तुम्हांला... हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं
चित्रा, वरचे दोन नियम धरून नि
चित्रा, वरचे दोन नियम धरून नि शून्य एकदाच वापरायचे असे धरले तरी टिचरच्या 220679 ह्या उत्तरापेक्षा २०२६७९ लहान आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्या.
Rule 1. If one of the given digits is 0, then while writing the smallest number, write the digit 0 in the second place from the left.
Rule 2. While creating the smallest possible five digit number using the given four digits, use the smallest of the given digits twice.
चित्राजी, तुमच्या मुलीचे
चित्राजी, तुमच्या मुलीचे उत्तर बरोबर आहे जर दिलेले सर्व अंक वापरायचे असतील तर. सर्व अंक वापरणे आवश्यक नसेल तर चिमणरावांचे उत्तर बरोबर आहे. शून्यापासून सुरू होणार्या संख्यांमध्ये शून्य विचारात घेतला जात नाही. संख्येचे अंक मोजताना पहिले अंक शून्य असू नयेत असा नियम आहे.
Rule 1. If one of the given
Rule 1. If one of the given digits is 0, then while writing the smallest number, write the digit 0 in the second place from the left.
Rule 2. While creating the smallest possible five digit number using the given four digits, use the smallest of the given digits twice.
इथे स्मॉलेस्ट मध्ये शुन्य येत नाही असं स्पष्ट पणे दिले असते तर टिचरबाईंचे उत्तर बरोबर आहे. पण तसं स्पष्ट द्यायला हवं होतं. टिचरबाई नुसत्या रूल म्हणून बाजी मारुन नेतायत असं वाटतय.
क्रमिक पुस्तकांमधे काय आहे ?
क्रमिक पुस्तकांमधे काय आहे ?
इयत्ता चौथी
इयत्ता चौथी
इथे स्मॉलेस्ट मध्ये शुन्य येत
इथे स्मॉलेस्ट मध्ये शुन्य येत नाही असं स्पष्ट पणे दिले असते तर टिचरबाईंचे उत्तर बरोबर आहे. पण तसं स्पष्ट द्यायला हवं होतं. टिचरबाई नुसत्या रूल म्हणून बाजी मारुन नेतायत असं वाटतय.
>> तरीही बाईंचं उत्तर चूक आहे..
कारण नियम क्रं १ नुसार डावीकडून दुसरा अंक शून्य पाहिजे.
एक शंका आहे. गणितातील....
एक शंका आहे. गणितातील....
एम एस वर्ड मध्ये ४ चा वर्ग म्हणजे ४ च्या वर २ कसे लिहायचे?
मामी, तुम्हाला १००% अनुमोदन.
मामी, तुम्हाला १००% अनुमोदन. शिक्षिका स्वत:च्या चुकीवर पांघरूण घालू बघत्येय!
वैद्यबुवा, होय, शिक्षिकाबाई कुठलातरी नियम सांगून बाजी मारू पहात आहेत.
सारांश :
१. प्रत्येक आकडा किमान एकदा वापरायचा असेल तर चित्रा यांच्या लेकीचे २००६७९, २०००६७९ हे उत्तर बरोबर.
२. शून्य केवळ एकदाच वापरायचं असेल तर २०२६७९, २००२६७९ हे उत्तर.
३. कुठलाही आकडा कितीही वेळा वापरायचा झाल्यास २०००००, २०००००० हे उत्तर.
४. शिक्षिकेचं २२०६७९, २२२०६७९ हे उत्तर अतर्क्य आहे. कुठल्याही अंगाने ते योग्य ठरत नाही.
कृपया चूकभूल द्यावीघ्यावी
.
आ.न.,
-गा.पै.
माझी शंका सुटली. समजले.
माझी शंका सुटली. समजले.
धन्य त्या शिक्षिका आणि धान्य
धन्य त्या शिक्षिका आणि धान्य ती शाळा !!!!!!!!!!!!!!!!!!! घोर कलियुग!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Pages