टेनिस

Submitted by Adm on 30 July, 2012 - 11:10

९ दिवस १७२ खेळाडू ५ सुवर्ण पदके.
शनिवार २८ जुलै ते रविवार ५ ऑगस्ट
ठिकाण : विंबल्डन (ग्रास कोर्ट)

-टेनिस कोर्ट २४ मिटरपेक्षा थोडेसे लहान असते आणि कोर्टच्या मध्यभागी नेट असते. नेट १ मिटरपेक्षा थोडे कमी उंचीचे असते.

-दुहेरी सांमन्यांसाठी कोर्टची पूर्ण रूंदी वापरली जाते. एकेरी सामन्यांसाठी कोर्ट थोडे अरूंद असते. साईड लॉबीचा वापर केला जात नाही.

-खेळाचा मुख्य भाग म्हणजे चेंडू जाळ्याच्या पलिकडे अश्यापद्धतीने मारणे जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही.

-आपण मारलेल्या फटक्यावर आपण खालील कारणांमुळे पॉईंट हरू शकतो.
१. बॉल जाळ्यात अडकला तर
२. बॉल कोर्टच्या बाहेर पडला तर.

- प्रत्येक पॉईंटची सुरुवात सर्व्हिस पासून होते.
१. जर पहिली सर्व्हिस चुकली तर सर्व्हिस करणार्‍या खेळाडूला आणखी एक संधी मिळते.
२. ह्या सर्व्हिसला सेकंड सर्व्ह म्हणतात.
३. एका गेममध्ये एकच खेळाडू सर्व्हिस करतो . गेम संपल्यानंतर दुसर्‍या खेळाडूची सर्व्हिस सुरु होते.

-पॉईंट मोजण्याची पद्धत
१.पहिले तीन पॉईंट १५, ३०, ४० असे मोजतात तर पुढच्या पाँईटवर खेळाडू गेम जिंकतो.
२. स्कोर ४०-४० झाला तर त्याला ड्युस म्हणतात. ड्सुस नंतर जो खेळाडू सलग दोन पॉईंट जिंकतो, तो गेम जिंकतो.
३. गेम्सचा मिळून सेट बनतो. कमित कमी दोन गेमच्या फरकानी पहिल्यांदा ६ गेम जिंकणारा खेळाडू सेट जिंकतो. उदा. ६-४, ७-५.
४. जर सेट मधल्या गेम्सचा स्कोर ६-६ झाला तर टाय ब्रेकर खेळला जातो.टाय ब्रेकरमध्ये कमित कमी दोनाच्या फरकाने पहिल्यांदा सात पॉईंट जिंकणारा खेळाडू जिंकतो.

- मेडल्स
१. पुरूष एकेरी
२. महिला एकेरी
३. पुरुष दुहेरी
४. महिला दुहेरी
५. मिश्र दुहेरी

- पुरूष एकेरीची अंतिम फेरी पाच सेटची (बेस्ट ऑफ फाईव्ह) खेळली जाते बाकी सर्व सामने तीन सेटचे (बेस्ट ऑफ थ्री) खेळले जातात.

-टेनिसचे सामने बाद फेरी पद्धतीने खेळवले जातात. हरणारा खेळाडू किंवा संघ स्पर्धेबाहेर जातो.

-खेळाडू आणि संघांना मानांकन दिले जाते. सगळ्यात चांगला खेळाडू किंवा संघ प्रथम मानांकित असतो. सर्वोत्तम चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीपर्यंत एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत.

- चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतात. त्यातून दोन अंतिम फेरीत जातात. अंतिम विजेत्याला सुवर्ण पदक मिळते. उपविजेत्याला रजत पदक मिळते. उपांत्य फेरीत हरलेले दोन खेळाडू / संघ एकमेकांशी सामना खेळतात आणि त्यातल्या विजेत्याला कांस्य पदक मिळते.

ऑलिंपीकमध्ये टेनिस
-१८९६मध्ये टेनिसचा ऑलिंपीकमध्ये सर्वप्रथम समावेश झाला पण नंतर १९२४ च्या पॅरिस ऑलिंपीकमध्ये टेनिस वगळण्यात आले.
-१९८८ च्या ऑलिंपीकपासून टेनिसचा परत समावेश करण्यात आला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोलेक्स वगैरे आठवणीने घालत शो-ऑफ करणार >>>>> हे शो ऑफ कोणत्या अर्थानी म्हणतोयस चमन? कारण मला तर वाटतं हे त्यांच्या एंडोर्समेंट काँट्रॅक्टचा भाग आहे. तो अगदी आठवणीनी ते घड्याळ घालतो आणि पुढे त्याचे ते घड्याळ घालून हातात कप असलेले फोटोही रोलेक्स जाहिरातीत वापरतं.

बुवा तेच तर म्हणातोय ना मी. एंडोर्समेंट काँट्रॅक्ट लक्षात राहतो पण हरल्यानंतर (कितीही दु:ख झाले असले तरी) चाहत्यांना त्यांनी दिलेल्या पाठींब्याबद्दल अभिवादन करायचे असते हे कसे लक्षात रहात नाही. हे ऑलिंपिक्स आहे स्लॅम नाही.

विम्बल्डनमध्ये रॉयल बॉक्स मध्ये कोणी असेल तर अभिवादन करावेच लागते (लागायचे?) त्याला पर्याय नाही (नव्हता?).

बोल्टने सुवर्ण जिंकल्यानंतर ब्लेकने काय केले, गॅटलिनने काय केले? की सुवर्ण नाही मिळाले म्हणून निघून गेले.
वुमेन्स वॉल्टमध्ये जर्मनीच्या ३७ वर्षीय ओक्सानाने १७ वर्षांच्या मुलींकडून हरल्यावर सुद्धा प्रेक्षकांना अभिवादन केले. (तिची कदाचित शेवटची स्पर्धा होती म्हणूनही केले असेल, पण केले ते महत्त्वाचे)

चमन, मला लक्षात आला तुझा मुद्दा, मरे जिंकल्यामुळे एक तर कॅमेरा त्याच्यावर जास्त काळ राहिला. फेडी वर अगदी ओझरता कॅमेरा होता बहुतेक. जाता जाता त्यानी एक दोन सह्या केल्या असतील तरी माहित नाही.
टेनिस आणि ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्डचे कवरेज थोडे वेगळे नाही का? त्यात ब्लेक आणि बोल्ट ट्रेनिंग पार्टनर आहेत. कॅमेरा सतत बोल्ट वर होता पण ब्लेक नी त्याच्या बरोबर राहायचे, स्क्रिन शेअर करायचे, जल्लोष करायचे निवडले. टेनिस मध्ये नेहमीच, जो हारतो त्याच्यावर फार काळ कॅमेरा राहत नाही.
फेडी ला कोणी स्पष्ट विचारल्या शिवाय ह्याचे निरसन होणार नाही पण त्याच्या वागण्याचा इतिहास बघता तो हिरमुसला होऊन निघून गेला हे आजिबात पटत नाही. फेडी, तेंडल्या वगैरे ह्याच कारणाकरता खुपच क्लासी वाटतात. ह्या ऐवेजी सेरेना वगैरे असती तर.... Proud

बुवा हिरमुसणे, दु:खी होणे नि निराश होणे ह्यात वेगळ्या छटा (intensity) आहेत हो. बाकी तुम्ही फेडीला विचारलेत कि कळवा काय ते Lol

फेडी ला कोणी स्पष्ट विचारल्या शिवाय ह्याचे निरसन होणार नाही पण त्याच्या वागण्याचा इतिहास बघता तो हिरमुसला होऊन निघून गेला हे आजिबात पटत नाही. >>>> बरं!! हा विडीओ बघा, पहिले २० सेकंद.
http://www.cnn.com/video/?hpt=hp_t2#/video/sports/2012/08/06/mclaughlin-...

ऑफिसमधे stream block होतेय रे. काय आहे ते इथेच लिही. Options : निराश, दु:खी, आनंदी, हिरमुसला, शोऑफ केला, विसरला, Oops was I suppose to wait in order to avoid analysis on माबो :p

मॅच संपली तरी त्याला ब्रेकपॉईंट्स कमावता आणि वाचवता आले नाहीत तर बाकीच्या गेम पाँईंटसबद्दल लिहिण्यासारखे काही नाही. >>>>> अरे.. पण फेडरर हरला की तू समोरच्याच्या खेळाचा अ‍ॅनालिसिस करतोस ना Proud (कोण कसं डिफेंसिव्ह खेळतं, कोण कसं लायनीच्या पुढे येत नाही, कोण कसं फक्त धावाधाव करतं, कोण कसं फक्त चेंडू इकडून तिकडे मारतं वगैर वगैर वगैरे...) त्यामुळे मला मरेच्या खेळाचा अ‍ॅनालिसिस अपेक्षित होता..त्याने काय केलं काय केलं नाही वगैरे वगैरे.. फेडररच्या नाही.. Proud

कॉम्प्लिमेंट म्हणून घेईन >>> ती कॉम्प्लिमेंटच होती. विंबल्डनच्या वेबसाईट वरच्या कोणाचे तरी विचार तुझ्या विचारांशी जुळले म्हणून दिलेली. विंबल्डनच्या वेबसाईट वर लेख लिहिणारे भारी असतीलच ना !

हिरमुसला होऊन निघून गेला >>>> फेडरर माणूसच आहे. त्यालाही भावना असतीलच की (पाहिलं तर जवळ जवळ सर्व सरफेसेसवर (हरल्यावर)अश्रू ढाळून झालेले आहेत!).. हिरमुसला तर हिरमुसू द्या.. बिग डील!

लालू.. मी वुमेन डबल्सचे हायलाईट्स पाहिले. व्हिनसचे काही काही फोरहँड मस्त मारले. बर्‍याच दिवसांनी पूर्वीची व्हिनस पहायला मिळाली. मिक्स्ड डबल्सची नाही पाहिली मॅच किंवा हायलाईट्स.

(कोण कसं डिफेंसिव्ह खेळतं, कोण कसं लायनीच्या पुढे येत नाही, कोण कसं फक्त धावाधाव करतं, कोण कसं फक्त चेंडू इकडून तिकडे मारतं वगैर वगैर वगैरे...) >> पग्या पेटला आता Lol

लोला>>
मेडलचा प्रश्नच कुठे येतोय.
सुवर्ण, रौप्य, ताम्र कुठल्याही पदकावर आनंदीच आहे, पदक नाही मिळाले तरी चालेल कारण मला फेडरर आणि त्याचा खेळ एकंदरीतच आवडतो.
पण काल त्याचं हरल्यानंतर मैदानातून खालमानेनं निघून जाणं नाही आवडलं आणि त्याच्याबद्दलच मी एवढ्यावेळ लिहित होतो. ऊद्या तो मरे सारखा प्रेक्षकातल्या झाडून सगळ्यांना मिठ्या मारत बसला तर तेही 'आवडलं नाही' म्हणून लिहिणार.
प्रश्न हरण्याबद्दलचा नाही हरल्यानंतरच्या वागण्याचा (खिलाडूवृत्तीचा) आहे. रडणंही ग्राह्य वाटतं पण निघून जाणं आवडलं नाही.

फेडीचं निघून जाणं बरोबर असेल तर मग मरोनीचंही वागणं आजिबात चूक नाही.

पराग >> मरे, नदाल्-जोको सारखं ईकडून तिकडे बॉल मारत एकसूरी आणि कंटाळवाणी बॉलची ढकलाढकली न करता, केवळ बेस लाईनलाच चिकटून न राहता चांगलं टेनिस खेळला (लेंडल आल्यापासून तो हे असं चांगलं टेनिस खेळतो आहे). हे लिहिलं आहेच की रे वर.
अजून काही अ‍ॅनालिसिसची गरज नाही असंही लिहिलं आहे.

ठीक आहे. आता प्रत्येक टेनिस बीबी चर्चेऐवजी केवळ कुरापती काढणे आणि खेळाचे स्टॅट्स सोडून ईतर शब्दांवर कीस काढणे ह्याच वाटेने चालले आहेत. हे अतिशय कंटाळवाणे झाल्याने ईथून पुढे कुठल्याही टेनिसवर बीबींवर लिहिण्यात मला रस वाटत नाही. तुम्ही सगळे लिहित रहा मी वाचत आहेच.

धन्यवाद !! Happy

>> रडणंही ग्राह्य वाटतं
>> (हरल्यावर)अश्रू ढाळून झालेले आहेत! (पग्या हे चक्क खोटे आहे!)
फेडी हरल्यावर रडत नाही हो, जिंकल्यावर रडतो. राफाबरोबर विम्बल्डन हरल्यावर एकदाच त्याला खूप वाईट वाटलेले जाणवले. तसे त्याने या विम्बल्डनला मरेबाबत बोलताना सांगितलेसुद्धा.

चमनसर, तुम्ही असे टेनिस धागे सोडून जाऊ नका हो.

लोला, परत +१
हारल्यानंतर त्याला रडताना, खुपच वैतागलेले असं पाहिल्याचे आठवत नाही.

पराग, तुझी पोस्ट कळली नाही. बिग डील? कोण करतय? इथे फक्त तो का गेला असावा पटकन, ह्यावर दोन वेगळी मतं आहेत. इथे गप्पा, चर्चा करायच्या म्हणूनच लोकं येतात त्यामुळे मग सगळेच मुद्दे बिग डिल आहेत असं म्हणावं लागेल.

चमन, विडियो बघतो. उगाच जाऊ बिऊ नकोस कुठे. चर्चा, कीस वगैरे काय नवीन आहेत का इथे?
कुरापती काढणारे आहेत तसं नीट चर्चा करणारे सुद्धा आहेत, त्यामुळे... Happy

असामी Proud

फेडी हरल्यावर रडत नाही हो >>>>
लालू, हे पहा : http://www.youtube.com/watch?v=dCjw0Unm8OY&feature=related
ऑस्ट्रेलियन ओपन २००९. एकदा विंबल्डनमध्येही रडला होता. (२००८ मध्येच बहूतेक) माझ्याकडे लिंक उघडत नाहीयेत आत्ता.. वरचीच कशीबशी उघडली.

चमन, विंबल्डन धाग्यावरची आणि इथली, तुझी मतं न पटल्याबद्दल पोस्ट लिहिल्यावर ते कीस पाडणे वाटत असेल तर ह्या धाग्यांवर लिहायचं की नाही हे तुझं तुच ठरव. Happy (बाकीचा टिपी नेहमीच चालू असतो.)

(हरल्यावर)अश्रू ढाळून झालेले आहेत! (पग्या हे चक्क खोटे आहे!) >>>>> काय खोटं आहे ?? हरल्यानंतरच्या प्रेसेंटेशन सेरेमनीत ढसाढसा रडून झालय फेडररचं ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये !

असूदे, अश्या मोजून सापडतील काही.
जि़कल्यावर रडलेल्या तर चिक्कार सापडतील. Lol

'जवळजवळ सगळ्या सर्फेसवर' म्हणजे जणू हरल्यावर रडतो अशी सवयच असल्यासारखे म्हटल्याचे वाटले. तसे नसेल तर ठीक आहे. ती रडायची सवय जिंकल्यावरची आहे. Proud

असूदे, अश्या मोजून सापडतील काही.
जि़कल्यावर रडलेल्या तर चिक्कार सापडतील. >>>> मुद्दा तो नाहीये. वर लिहिलेल्यात खोटं काय आहे सांग ?
" फेडी हरल्यावर रडत नाही हो " हे विधान चुकीचं आहे हे सिद्ध होतय की त्या लिंक द्वारे !

"सवयच आहे" असं कोणी म्हणत नाहीये. पण "(हरल्यावर) रडतच नाही" असंही नाहिये. शेवटी माणूसच आहे. रडला तर रडला. तो रडतच नाही/ हिरमुसणारच नाही/ क्लासमुळे वाईट वाटतच नाही असं काहीही नाहीये !

तो रडण्याचा मुद्दा यावेळचे वागणे कसे असेल याचा अंदाज बांधण्यासाठी होता. रडणे ही त्याची सवय नाही आणि इथे फार काही गमावले असेही नाही तेव्हा चमन म्हणतोय तसे ते नसावे यासाठी ते उदाहरण होते.

खास लोकाग्रहास्तव :

काळ नाही, वेळ नाही, फक्त अश्रू ढाळतो
वर पुन्हा यू ट्यूबवर त्याचा पुरावा सोडतो!

हारला तर हारला! त्याचे किती पाल्हाळ ते!
फेडरर जणु देव टेनिसचा तयांना वाटतो!

हासला, वळला कधी, हाती घड्याळे कोणती
खेळ बाजूलाच! भल्ती स्टॅट्स आम्ही मांडतो!

हा मरे अन् तो रडे - अघटीत सारे वाटते!
एक भांडण काढतो अन् एक बीबी सोडतो!

चार स्पर्धा आणि वरती भूत ऑलिम्पिक्सचे!
एक साधा खेळ फूटेज केवढे हे मारतो!

टेनिस फॅन्सना समर्पित. Proud

जनी सांगता ऐकता जन्म गेला
परी वाद्वेवाद तैसाचि ठेला
ऊठे संशयो वाद हा दंभधारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी.

जनी वादवेवाद सोडूनि द्यावा
जनी वादसंवाद सूखे करावा
जगी तोचि तो शोकसंतापहारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी

लोला, बुवा, पराग >>>
ह्या संवादात आता मला आनंद येईनासा झाला म्हणून मी तो पुढे न वाढ्वता माझ्यापरीने थाबंवला. आजवरच्या वाद-विवादात माझाही वाटा आहेच नाही असे नाही.
बस्स बाकी काही नाही. राग वगैरे नाही आला, वाईटही वाटलेले नाही. अश्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टींविषयी राग-दु:ख करीत बसलो तर महत्वाची कामं कधी करणार. Happy

तुम्ही चालू ठेवा.

अश्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टींविषयी राग-दु:ख करीत बसलो तर महत्वाची कामं कधी करणार. >>> एकदम संत पदाला पोहोचलास की. Happy बाफ सोडून जाण्याने काही होणार नाही. संवादात आत्ता आनंद वाटत नसला तर थोडावेळ ब्रेक घे.तसही यंदा टोरांटोत काही मजा नाहीये. त्यामुळे सप्टेंबरात भेटू परत. Happy

मरेने त्याची मेडल्स देऊन टाकली!
मरेने त्याचे एक सिल्व्हर आणि एक गोल्ड त्याचे बेस्ट फ्रेन्ड्स "मॅगी मे" आणि "रस्टी" यांना देऊन टाकले..
मॅगी मे आणि रस्टी यांचा मेडलसह फोटो पहा! -

http://sports.yahoo.com/blogs/olympics-fourth-place-medal/andy-murray-do...

बुवा, विषयांतर करु नका. Proud

मरेचे पोस्टाचे तिकिट निघणार आहे!

http://www.atpworldtour.com/News/Tennis/2012/08/Features/London-Olympics...

राफाने आता "बरं वाटतंय" असं लिहिलंय. डँबिस आहे.. एकदम US Open ला येणार तो.

ए टी पी टेनिस पाहातंय का कुणी? आता सेरेनाला कर्बरने जबरी हरवलं ..आण्खी थो वेळाने फेडॅक्सची आहे...Live on ESPN2

Pages