९ दिवस १७२ खेळाडू ५ सुवर्ण पदके.
शनिवार २८ जुलै ते रविवार ५ ऑगस्ट
ठिकाण : विंबल्डन (ग्रास कोर्ट)
-टेनिस कोर्ट २४ मिटरपेक्षा थोडेसे लहान असते आणि कोर्टच्या मध्यभागी नेट असते. नेट १ मिटरपेक्षा थोडे कमी उंचीचे असते.
-दुहेरी सांमन्यांसाठी कोर्टची पूर्ण रूंदी वापरली जाते. एकेरी सामन्यांसाठी कोर्ट थोडे अरूंद असते. साईड लॉबीचा वापर केला जात नाही.
-खेळाचा मुख्य भाग म्हणजे चेंडू जाळ्याच्या पलिकडे अश्यापद्धतीने मारणे जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही.
-आपण मारलेल्या फटक्यावर आपण खालील कारणांमुळे पॉईंट हरू शकतो.
१. बॉल जाळ्यात अडकला तर
२. बॉल कोर्टच्या बाहेर पडला तर.
- प्रत्येक पॉईंटची सुरुवात सर्व्हिस पासून होते.
१. जर पहिली सर्व्हिस चुकली तर सर्व्हिस करणार्या खेळाडूला आणखी एक संधी मिळते.
२. ह्या सर्व्हिसला सेकंड सर्व्ह म्हणतात.
३. एका गेममध्ये एकच खेळाडू सर्व्हिस करतो . गेम संपल्यानंतर दुसर्या खेळाडूची सर्व्हिस सुरु होते.
-पॉईंट मोजण्याची पद्धत
१.पहिले तीन पॉईंट १५, ३०, ४० असे मोजतात तर पुढच्या पाँईटवर खेळाडू गेम जिंकतो.
२. स्कोर ४०-४० झाला तर त्याला ड्युस म्हणतात. ड्सुस नंतर जो खेळाडू सलग दोन पॉईंट जिंकतो, तो गेम जिंकतो.
३. गेम्सचा मिळून सेट बनतो. कमित कमी दोन गेमच्या फरकानी पहिल्यांदा ६ गेम जिंकणारा खेळाडू सेट जिंकतो. उदा. ६-४, ७-५.
४. जर सेट मधल्या गेम्सचा स्कोर ६-६ झाला तर टाय ब्रेकर खेळला जातो.टाय ब्रेकरमध्ये कमित कमी दोनाच्या फरकाने पहिल्यांदा सात पॉईंट जिंकणारा खेळाडू जिंकतो.
- मेडल्स
१. पुरूष एकेरी
२. महिला एकेरी
३. पुरुष दुहेरी
४. महिला दुहेरी
५. मिश्र दुहेरी
- पुरूष एकेरीची अंतिम फेरी पाच सेटची (बेस्ट ऑफ फाईव्ह) खेळली जाते बाकी सर्व सामने तीन सेटचे (बेस्ट ऑफ थ्री) खेळले जातात.
-टेनिसचे सामने बाद फेरी पद्धतीने खेळवले जातात. हरणारा खेळाडू किंवा संघ स्पर्धेबाहेर जातो.
-खेळाडू आणि संघांना मानांकन दिले जाते. सगळ्यात चांगला खेळाडू किंवा संघ प्रथम मानांकित असतो. सर्वोत्तम चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीपर्यंत एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत.
- चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतात. त्यातून दोन अंतिम फेरीत जातात. अंतिम विजेत्याला सुवर्ण पदक मिळते. उपविजेत्याला रजत पदक मिळते. उपांत्य फेरीत हरलेले दोन खेळाडू / संघ एकमेकांशी सामना खेळतात आणि त्यातल्या विजेत्याला कांस्य पदक मिळते.
ऑलिंपीकमध्ये टेनिस
-१८९६मध्ये टेनिसचा ऑलिंपीकमध्ये सर्वप्रथम समावेश झाला पण नंतर १९२४ च्या पॅरिस ऑलिंपीकमध्ये टेनिस वगळण्यात आले.
-१९८८ च्या ऑलिंपीकपासून टेनिसचा परत समावेश करण्यात आला.
मरे जोरात खेळत आहे. फेडीच्या
मरे जोरात खेळत आहे.
फेडीच्या तोंडावर पाणी करुन त्याला जागे करा कोणीतरी.
feddychya chuka hotayat pan
feddychya chuka hotayat pan murray cha game warchadh aaj!
मरे मस्तच खेळतोय... फेडीच्या
मरे मस्तच खेळतोय...
फेडीच्या तोंडावर पाणी करुन त्याला जागे करा कोणीतरी. > +१
अॅनालिटीकन पोस्ट्स
अॅनालिटीकन पोस्ट्स अॅलर्ट...
मरेचे अभिनंदन! वे टु गो. आय
मरेचे अभिनंदन!
वे टु गो.
आय एम हॅपी फॉर मरे अॅंड द ब्रिटिश पीपल.
(अश्रूपात वाचला)
फेडी हरला पण सिल्व्हर (लायनिन्ग) मेडल आहेच.
डेल पोट्रोचेही अभिनंदन!
डेल पोट्रोचेही अभिनंदन!
हे मॅच फिक्सिंग होते की काय?
हे मॅच फिक्सिंग होते की काय? फेडरर इतका सहज हरणे इतके सरळ वाटत नाही.
ब्रिटिश प्रतिष्ठेकरता टेबलाखालून काही सरकवले तर नसेल?
स्विस बँक घरचीच असल्यामुळे अर्थव्यवहार सुलभपणे होत असतील!
बॅडमिंटन खेळाडूंचे असेच फिक्सिंग उघडकीस आले आहेच.
सॉलिड खेळला आज मरे. मजा आली
सॉलिड खेळला आज मरे. मजा आली बघायला! शेवट पर्यंत आशा वाटत होती अगदी तिसर्या सेटच्या २र्या गेम पर्यंत पण तो कदाचित फेडी फॅन असल्यामुळे डोकावत असलेला दुर्दम्य (?) आशावाद असावा.
रिटर्न वगैरे तुफानच होते, फेडीला ऐकतच नव्हता मरे आज.
शेवट पर्यंत आशा वाटत होती
शेवट पर्यंत आशा वाटत होती अगदी तिसर्या सेटच्या २र्या गेम पर्यंत पण तो कदाचित फेडी फॅन असल्यामुळे डोकावत असलेला दुर्दम्य (?) आशावाद असावा.
रिटर्न वगैरे तुफानच होते, फेडीला ऐकतच नव्हता मरे आज....>>> १००% अनुमोदन वैद्यबुवा.. कालचा दिवस पूर्णपणे मरेचा होता. फेडेला सिल्व्हर मेडल मिळाले ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
अॅनालिटीकन पोस्ट्स
अॅनालिटीकन पोस्ट्स अॅलर्ट... >>> फक्त विरोधासाठी विरोध मी कधीच करत नाही रे बाबा. चष्मा बदल.
अॅनालिसिस करण्यासारखा फेडररचा खेळ झाला नाही तर काय डोंबल लिहिणार?
मॅच संपली तरी त्याला ब्रेकपॉईंट्स कमावता आणि वाचवता आले नाहीत तर बाकीच्या गेम पाँईंटसबद्दल लिहिण्यासारखे काही नाही. मरे चांगला खेळला आणि जिंकला.
मी विंबल्डन फायनलनंतर देखील लिहिले होते, लेंडल कोच म्हणून आल्यापासून मरेचा गेम खूप चांगला झाला आहे आणि तो विंबल्डनची फायनल जिंकला असता तरी आनंदच झाला असता. (पुन्हा 'तू लई भारी' असं सरकॅस्टिक वाक्य लिहिण्याआधी मी हे लिहिलं होतं की नाही ते पडताळून पहा. मी लिंक-बिंक देत बसत नाही, तरी तुला 'बरं, तू लई भारी' असे लिहावेसे वाटले तर ह्यावेळी मी ते कॉम्प्लिमेंट म्हणून घेईन
)
आजही पुन्हा तेच लिहितोय. मरे जिंकला आनंदच आहे त्याचे अभिनंदन. (जोको हरला म्हणून आनंद आणि दु:ख पैकी काहीच वाटले नाही.)
फेडररचे लगोलग निघून जाणे आवडले नाही तो फार दु:खी वगैरे वाटला. मान्य आहे एवढं सगळं जिंकल्यानंतर सुवर्ण पदकाने हुलकावणी देणं (तेही बहूतेक शेवटची संधी असतांना) फार निराशाजनक असेल पण एवढ्या वर्षांत दाखवण्याईतका तरी दिलदारपणा तो शिकला नाही की काय असे वाटले.
नंतरच्या मुलाखतीतही त्याने मान्य केले की तो खूप दु:खी झाला होता पण मेडल सेरेमनी पर्यंत हसण्याईतपत ठीक झाला.
मरे असाच जिंकत राहो.
>>फेडररचे लगोलग निघून जाणे
>>फेडररचे लगोलग निघून जाणे
यावर माझे अॅनॅलिसिस-
ती मरेची मोमेन्ट होती. सगळे स्टेडियम त्याचे अभिनंदन करत होते. तेव्हा तिथून जाणेच योग्य होते. जाताना हात उंचावून लोकांना अभिवादन नाही केले तेही ठीक कारण लोकांचे लक्ष दुसरीकडे कशाला वळवा? फेडी तिथे लोकप्रिय आहे. मेडल सेरेमनीच्या वेळी फेडी पोडियमवर चढला आणि मरे चढला त्या दोन्ही वेळी तेवढाच जल्लोष झाला.
जिंकल्यावर मरेशी बोलणारी बाई लगेच मग याला आता ग्रँड स्लॅमची जोड कधी देणार इ. विचारत होती! काय पण! मॅकॅन्रो म्हणाला प्रत्येकाची मोमेन्ट असते, मरेची ही आहे.
लोला, +१ हेच लिहू पर्यंत
लोला, +१ हेच लिहू पर्यंत पोस्ट आली तुझी.
त्या दोघांनी जेव्हा हात मिळवले तेव्हा फेडी अगदी हसत त्याला काहीतरी म्हंटला.
मरेसाठी खुपच मोठा मोमेंट होता. होस्ट कंट्री + गोल्ड मेडल+ फेडी विरुद्ध, त्यामुळे अगदी जाणवलं फेडी मुद्दाम पटकन बाजुला झाला ते.
नाही पटत, फेडीची शेवटची संधी
नाही पटत, फेडीची शेवटची संधी गेली हे जाणवल्याच्या अतीव निराशेमधे (दु:ख नाही) त्याला तिथून निघून जावेसे वाटले असे मला वाटले. त्याला आधी असे करताना फार क्वचित(च) पाहिले आहे. Its no big deal really असे मला तरी वाटले. मुद्दामहून बाजूला वगैरे असे खास वाटले नाही. He got his composure back later and moved on during presentation.
बर. >>त्याला आधी असे करताना
बर.
>>त्याला आधी असे करताना फार क्वचित(च) पाहिले आहे
असे आधी कधी झालेलेही नाही.
धन्यवाद.
असे आधी कधी झालेलेही नाही. >>
असे आधी कधी झालेलेही नाही. >> आधी तो कधीच हरला नाहिये ?
धन्यवाद.
देवा! मी मर्याबद्दल बोलतेय!
देवा!
मी मर्याबद्दल बोलतेय!
देवी पण मी फेडीबद्दल बोलतोय
देवी पण मी फेडीबद्दल बोलतोय ना
बुवांच्या पोस्टमधले एक वाक्य
बुवांच्या पोस्टमधले एक वाक्य पुरे आहे-
>>मरेसाठी खुपच मोठा मोमेंट होता. होस्ट कंट्री + गोल्ड मेडल+ फेडी विरुद्ध
यात एक विम्बल्डन सेन्टर कोर्ट.
यात "हरला नाहीये?' काय! बाकी गोष्टी बघ की!
हेमाशेपो.
लोला/बुवा फेडी काही वैयक्तिक
लोला/बुवा
फेडी काही वैयक्तिक स्लॅम खेळत नव्हता तो स्विस प्रतिनिधी होता. त्याचे असंख्य सपोर्टर्स/चाहते होते तिथे. चाहते, ज्यांनी ऑलिंपिक्सच्या प्रत्येक सामन्यात त्याला चिअर-अप केले होते, पाठींबा दिला होता.
त्यांना अभिवादन करायला आणि धन्यवाद द्यावयास नको का? की त्यांना मेडल सेरेमनीपर्यंत ताटकळत ठेवायचे.
शक्यतो असा प्रघात आहे की (नियम नाही) प्लेअर्स बरोबर कोर्टवर येतात आणि बरोबरच कोर्टवरून जातात आणि पवेलिअनमध्ये जातांना स्वाक्षरी देतात (ही जागा बहूतेक लहान मुलांनाच दिलेली असते).
हारलेला खेळाडू, जिंकलेल्या खेळाडूचं लिमिटेड सेलिब्रेशन होईपर्यंत शांतपणे थांबतो.
हे पब्लिकमध्ये वर चढून जाणे शो-ऑफ (बरं! ईमोशन्स म्हणा) आजकालच वाढले.
>>शक्यतो असा प्रघात आहे की
>>शक्यतो असा प्रघात आहे की (नियम नाही) प्लेअर्स बरोबर कोर्टवर येतात आणि बरोबरच कोर्टवरून जातात
ते ग्रँड स्लॅम्समध्ये. आणि असूदेत प्रघात. वेळ बघून वागावे. काल फेडीने जे केले ते योग्यच होते. उगाच कायतरी फालतू मुद्दे काढू नका.
इथे काय आता मर्याला माज आलाय म्हणणार का!
देवी माझे पोस्ट पूर्णपणे
देवी माझे पोस्ट पूर्णपणे फेडीबद्दल आहे. 'क्वचित'चे वाक्यही फेडीबद्दल आहे. माझा मुद्दा साधा आहे कि फेडी शेवटची संधी गेली हे जाणवल्याच्या अतीव निराशेमधे निघून गेला, ह्यापलिकडे काही नाहि. अशीच reaction (निघून जाणे नाहि तर विजेता हग करताना complete blank faced expression) मकेनाची पण गोल्ड मेडल हुकल्याबद्दल होती. असो .
मिकेला मरोनी आणि फेडीच्या
मिकेला मरोनी आणि फेडीच्या रिअॅक्शनमध्ये काहीही साम्य नाही.
>> शेवटची संधी गेली
देशाला मिळते हे बरोबर. पण टेनिसच काय बरेच प्रो बास्केटबॉल, सॉकरवालेही ऑलिंपिकमध्ये नाहीत.
ठीक आहे.
माझे असे ठाम मत आहे की व्यायसायिक टेनिसपटू ऑलिंपिकमधल्या मेडलला अवास्तव महत्त्व देत नाहीत.
फेडीला विचारले की देशाकडून खेळताना कसे वाटते तर तो म्हणाला मी नेहमीच देशाकडून खेळतो पण ऑलिंपिकमध्ये खेळायला छान वाटते.
बरं ठीक आहे आमचा तो मुद्दा
बरं ठीक आहे आमचा तो मुद्दा फालतू. चाहत्यांबद्दलच्या मुद्द्याचं काय?
ग्रँड स्लॅममध्ये मॅच झाल्यानंतर बक्षीसाचा कार्यक्रम असतो म्हणून समोरच्याने 'शीला की जवानी...मै तेरे हाथ न आनि' म्हणत आख्ख्या गाण्यावर डान्स केला तरी तुम्ही निमूटपण बघत बसणारच ना?
मग ईथे लागलीच बक्षीस मिळत नाही म्हणून तुमच्यासाठी टाळ्या पिटणार्या प्रेक्षकांकडे/चाहत्यांकडे तुम्ही ढुंकूनही पाहणार नाहीत
चमन, प्रघात आहे हे बरोबर आहे.
चमन, प्रघात आहे हे बरोबर आहे. आता पर्यंत फेडीचे दर वेळचे कंपोजर बघता, तो निराश होऊन वैतागून गेला हे पटत नाही. अगदी मॅच हरताना सुद्धा तो कुठे जास्त इमोशन दाखवत नाही, म्हणजे शॉट चुकला तर शिवीगाळ, लाथा, एंप्टी बुक्के वगैरे. तो जर चांगले शॉट खेळला, खुप खाली गेल्यानंतर तेव्हा (फक्त स्वतःच्या चांगल्या शॉट्स वर) "कमॉन" म्हणतो. काल तर त्याला कुठेही एकदाही मरे नी जम बसवू दिला नाही. त्यामुळे तो जसं जमेल तसं खेळताना दिसला पण झाल्यावर त्याचं पटकन बाजुला सरकणे अगदी जाणवले की मुद्दाम मरे करता होते ते.
ते चाहते बघून घेतील काय
ते चाहते बघून घेतील काय करायचे ते!
मेडल सेरेमनीतला जल्लोष पाहिला तर त्यांना अजिबात काही वाटलेले नाही हे कळेल!
माझे असे ठाम मत आहे की
माझे असे ठाम मत आहे की व्यायसायिक टेनिसपटू ऑलिंपिकमधल्या मेडलला अवास्तव महत्त्व देत नाहीत. >>> हे बरोबर आहे... मॅकेन्रो आणि बाकीचे बरेच सुद्धा हेच म्हणत होते.
मरोनीचा वाईट्टं अॅटिट्यूड खेदजनक होता. ह्या लोकांनी पर्फेक्ट स्कोर मारत सुवर्ण जिंकले तरी ओल्गा वगैरे सारख्या लोकांची नखाचीही सर त्यांच्या खेळाला येणार नाही.
ते चाहते बघून घेतील काय
ते चाहते बघून घेतील काय करायचे ते! >> तेच तर करतोय ना बघितल्यावर.
स्लॅम जिंकल्यानंतर तुम्ही ब्रँड एंडॉर्समेंटची आठवण ठेवत हातात रोलेक्स वगैरे आठवणीने घालत शो-ऑफ करणार आणि हरल्यावर स्वतःच्या निराशेला अवास्तव महत्त्व देत प्रेक्षकांना/चाह्त्यांना साफ विसरणार?
पटतंय का?
नाही. माझे असे ठाम मत आहे की
नाही.
माझे असे ठाम मत आहे की खेळाचे अॅनॅलिसीस करता न आल्याने तू वागण्याचे करत आहेस.

तुला त्याने कॅमेर्यातून हात करायला हवा होता का? "साफ विसरणे" इ. आता फार ताणलं जातय.
बास आता.
नाही >> नाही ना पटत.. मला ही
नाही >> नाही ना पटत.. मला ही नाही पटलं फेडररचं निघून जाणं म्हणूनच लिहिलं
माझे असे ठाम मत आहे की खेळाचे अॅनॅलिसीस करता न आल्याने तू वागण्याचे करत आहेस >>

हेही बरोबर! तेही करता आले नाही की मी त्याच्या कपड्यांचे, हसण्याचे आणि बोलण्याचेही अॅनालिसिस करणार आहे.
तुला त्याने कॅमेर्यातून हात करायला हवा होता का? >> तेच्च!! कळले आता तुला माझे खरे दु:ख.
बुवा, तो नेहमी तसे करत नाही बरोबर आहे ..पण ह्यावेळी केले म्हणूनच लिहिले.
स्विस ड्रेस फारच भडक लाल
स्विस ड्रेस फारच भडक लाल होता, पण फेडीला छान दिसत होता.
डबल्स पाहिल्या नाही का कोणी? मी लेडीज आणि मिक्स्ड दोन्ही पाहिल्या. अझारेन्का-मिरनी - मरे-रॉबसन मॅच चांगली झाली.
Pages