युनिवर्सल स्टुडियो-सिंगापुर (प्रचि व माहिती)

Submitted by यशस्विनी on 30 July, 2012 - 03:05

सिंगापुरातील सेंटोसा या बेटावर "युनिवर्सल स्टुडियो" बनवला गेला आहे. या थीम पार्कच्या बांधकामाची सुरूवात १९ एप्रिल २००८ मध्ये झाली व औपचारीक उद्घाटन सोहळा २८ मे २०११ रोजी झाला. तेव्हापासुन "युनिवर्सल स्टुडियो" हा सिंगापुरातील महत्वाचे पर्यटन स्थळ बनला आहे. "युनिवर्सल स्टुडियो थीम पार्क" हा आशियात बनवला गेलेला दुसरा थीम पार्क आहे, प्रथम बनवला गेल्याचा मान "जपान" या देशाकडे आहे.

या पार्कमध्ये जवळपास वेगवेगळ्या प्रकारची २४ आकर्षणे आहेत. या पार्कमध्ये थीमनुसार ७ विभाग बनवले गेले आहेत. प्रत्येक विभागाची रचना हि तुफान यशस्वी चित्रपट किंवा टिवी शो यातील आकर्षण बिंदु, त्यातील पात्रांचे व्यक्तिमत्व, पेहराव यावर आधारीत आहे. त्यानुसार तेथील खाण्यापिण्याची ठिकाणे, वस्तुंची दुकाने यांची रचना देखील केली गेली आहे. यातील ७ विभाग पुढीलप्रमाने :-

१.हॉलीवुड - हा विभाग म्हणजे या पार्कचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा विभाग विविध वास्तुकलेचे नमुने, पाम वृक्ष ,ब्रोडवे स्टाईल थिएटर्स, विविध रेस्टॉरंट्स, रिटेल दुकानांनी सजला आहे

२.न्युयॉर्क - हा विभाग पुर्णतः न्युयॉर्क शहर व त्यातील विविध ठिकाणे यावर आधारीत आहे

३.sci-fi city - हा विभाग भविष्यातील मोठी शहरे ही कश्याप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत असतील यावर तयार केला आहे

४. पुरातन इजिप्त - हा विभाग इजिप्त संस्कृतीच्या सुवर्णकाळावर आधारीत आहे

५. the lost world - यामध्ये ज्युरॅसिक पार्क व वॉटरवर्ल्ड या चित्रपटांची थीम वापरली आहे

६. फार फार अवे - या विभागाची रचना ड्रीमवर्क अ‍ॅनिमेशन निर्मित "shrek" या पात्रावर आधारीत आहे. या विभागाचे मुख्य आकर्षण म्हणजे ४० मीटर उंच असणारा "फार फार अवेचा" देखणा महाल जो खालील प्रचिंमध्ये दिसत आहे. या महालात Shrek 4-D ( १७ मिनिटांची 3D फिल्म ) आणि Donkey Live ( हा एक इंटरॅक्टिव लाईव्ह शो आहे जो डिजीटल पपेटरी तंत्रावर आधारीत आहे) हे दोन कार्यक्रम दाखवले जातात.

७.Madagascar - हा विभाग ड्रीमवर्क अ‍ॅनिमेशन निर्मित Madagascar वर आधारीत आहे. ज्यामध्ये Alex, Gloria, Marty आणि Melman हे चार प्राणी प्राणीसंग्रहालयातुन पळुन जातात व दुर्दैवाने Madagascar या बेटावर येउन अडकतात. या विभागात उष्ण कटिबंधीय जंगल व दोन राइड्स आहेत

युनिवर्सल स्टुडियो हे कुंटुबासमवेत फिरायला जायला मस्त ठिकाण आहे..... लहान मुलांना हे ठिकाण खुप आवडेल, येथील विविध थीम वापरुन केलेली रचना, कार्यक्रम बघण्यात वेळ मजेत निघुन जातो..... सिंगापुरात आलात तर या ठिकाणाला भेट दयायला विसरु नका Happy

१अ.

universal studio.jpg

२अ.

524503_434660793245546_1206031459_n.jpg

३अ.

527553_434661153245510_1230658679_n.jpg

४अ.

306324_434661089912183_223929218_n.jpg

५अ.

558049_434661126578846_1787758337_n.jpg

६अ.

528612_434660829912209_983703287_n.jpg

७अ.

376302_434660849912207_279146215_n.jpg

८अ.

487252_434660886578870_1357352132_n.jpg

९अ.

314454_434660809912211_1043898295_n.jpg

१०अ.

481136_434660913245534_484310226_n.jpg

१.
24.jpg

२.

16.jpg

३.

8.jpg

४.

25.jpg

५.

14.jpg

६.

18.jpg

७.

9.jpg

८.

10.jpg

९.

7.jpg

१०.

21.jpg

११.

11.jpg

१२.

4.jpg

१३.

3.jpg

१४.

5.jpg

१५.

12.jpg

१६.

19.jpg

१७.

20.jpg

१८.

2.jpg

१९.

13.jpg

२०.

17.jpg

२१.

1.jpg

२२.

6.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users