IT मध्ये काही वर्षांनंतर स्किल् सेट मध्ये बदल..............

Submitted by अम्बाजोगाइकर on 29 July, 2012 - 23:19

मी संगणक अभियंता असून मला ६ वर्षांचा अनुभव आहे. मी सध्या Mainframe वर काम करतो. यात देखील मी एका विशिष्ट डोमेन वर काम करतो. यात सध्या संधी खूप कमी आहेत. त्यामुळे माझ्या मनात सतत स्किल सेट बदलण्याचा विचार येत आहे.
आमच्या टेक्नोलॉजी मध्ये onsite/ customer facing संधी खूप कमी आहेत. त्यामुळे एक तर काम कमी आणि परत संधी देखील कमी.
मला .net किंवा oracle pl sql शिकल्यास चांगल्या प्रकारे काम करायला मिळेल असे वाटते.
मला कृपया आपले खालील प्रश्नांवर मार्गदर्शन हवे आहे.
१. ६ वर्षांच्या अनुभवानंतर टेक्नोलॉजी बदलणे कितपत योग्य ठरेल ?
२. plsql/oracle Apps शिकले तर भरपूर संधी मिळतील का ?( Future of Oracle Plsql)
३. plsql चा वापर छोट्या कंपन्यांमध्ये होतो का ?

धन्यवाद
अंबाजोगाईकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबाजोगाईकर

IT मध्ये टेक्नोलॉजी ही दर ६-१२ महिन्यांनी बदलत असते. तुम्ही आज जे शिकाल त्यावर तुम्हांला जर लगेच त्याच कंपनी मध्ये किंवा २र्‍या कंपनी मध्ये काम करायला मिळत असेत तर ठिक आहे. अन्यथा २र्‍या कंपन्या शक्यतोवर फ्रेशर्स ना काम देत नाही. तुमचा जर एव्हढा अनुभव आहे तर तुम्ही जर विशिष्ट डोमेन चे knowledge जर अजून वाढवले तर तुम्ही सिनियर पोस्ट वर डोमेन एक्सपर्ट म्हणून काम करू शकतात, किंवा बिझीनेस अ‍ॅनालिस्ट म्हणूनही काम करू शकतात.
अश्या विभागात स्पर्धाही कमी असते आणि तुम्हांला अनुभव असल्याने प्रेफरन्स ही जास्त मिळतो.

प्रफुल्ल+१
त्यापेक्षा तुम्ही आयटी सोडून इतर काही स्किल्स अपडेट करता अल्यास बघा. किंवा एखादा साईड्बिजिनेस वगेरे.

तुम्ही मेनफ्रेमवर काम करता म्हणजे नक्कीच बिग साइज कंस्टल्टिंग कंपनीबरोबर असाल असं गृहीत धरून ही टीप.

तुमच्या कंपनीचे दुसरे कुठले प्रोजेक्ट्स सुरू आहेत त्याची माहिती काढून रिलेटेड टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग तुम्ही तुमच्या रिसोर्स म्~अनेजरकडे मागू शकता. म्हणजे निदान तुम्हाला स्वत :ला:त्या टेक मधला कामाचा अनुभवही मिळू शकेल प्लस तुम्ही तुमची रिस्क थोडी कमी करताय कारण कंपनीत असताना कंपनीसाठीचं तुम्ही हे करता असं निदान दाखवता येतं...तुम्हाला अनुभव आल्यावर तुम्ही कुठेही उडी मारू शकताच...

दुसरा पर्याय तुमची सहा वर्षे म्हणजे तसा चांगला अनुभव आहे मग आहे तिथेच श्रेणीप्रमाणे बढती झाली असेल तर प्रोजेक्ट म्~अनेजमेंट हे क्षेत्रही तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि त्या क्षेत्राला अगदी शंभर टक्के टेक्निकल स्किल लागत नाही..ते असलं तर फायद्याचं असतं नाही असं नाही पण मेनफ्रेमच्या माणसाने ओपन सिस्टिमचे प्रोजेक्ट मोठ्या कंपनीमध्ये म्~अनेज करणं हे खूप कॉमन आहे....

गुड लक.

इथे कोणी घरुन काम करत आहे का?

मी १ महिना क्लाईंट साईड ला होती पण ते काम पार्ट टाईम या भागात येते [ पार्ट टाईम /फुल टाईम असे दोन भाग]

सध्या घरुन काम करायचे आहे म्हणुन
ही रिक्शा
मी ४ वर्षे व्यवसाईक software tester होती ,
माझ्या कडे QTP 10 , loadrunner , rational robot. अशी testing tools आहेत , तरी कुणाला ,funcational, performance testing करायचे असल्यस सांगा.
[तसेच मी ही tools वापरुन बरीच repetative कामे पण करते जसे ली एका folder मधेल सगळ्या files ला रिनेम करणे ,
एक फोर्म मधे १००० users चा डाटा बनवणे]. ई.