गझल सांगायचा अंदाज माझा...

Submitted by वैवकु on 29 July, 2012 - 06:33

जरा संदिग्धसा आहे पुरेसा नेमका नाही
गझल सांगायचा अंदाज माझा बोलका नाही

तुझी सद्दी खपत नाही नि करतो बंडखोरी मी
स्वभावा ; वाटतो मित्रा... तसा मी भांडका नाही

यशाची पायरी कुठली कसे ठरवायचे सांगा
नशीबाचा जिना पडका...कुठेही बांधका नाही

जगाच्या कारभाराची तुला जी काळजी असते
तिची मी काळजी करणे ..कधी संपेलकाsनाही?

गझल सांभाळते हल्ली तुझ्या प्रत्येक शेराला
तुझा रे वैभवा विठ्ठल् अताशा पोरका नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगाच्या कारभाराची तुला .............का कुणास ठावुक हा शेर मला पक्का माझा वाटत नाही आहे असाच एखादा शेर मा बो वर इतरत्र वाचल्याचे स्मरते
ओरीजनल शेर कुणाचा असेल त्याने जरूर कळवणे
कुणास आठवत असेल तर नक्की सान्गा

-वै व कु

'जगाच्या कारभाराची तुला जी काळजी असते
तिची मी काळजी करणे ..कधी संपेलकाSSनाही ?'

मस्तच वैभव.. कविता, (सॉरी, गझल ) हेच कवीचे शस्त्र,शास्त्र,वाद,प्रतिवाद,संवाद प्रतिसाद,असे सारेच ..सर्वंकष पर्याय.

पण याच ओळी तुम्हाला नेमक्या कुणाच्या ते आठवत नाहीयेत् !असे गझल मध्येच घडू शकते कदाचित.

जुन्या आठवणीतल्या माझ्या काही ओळी प्रतिसादादाखल द्याव्याशा वाटले होते,पण मूळ कवितेचा रसभंग पहिल्याच प्रतिसादात नवीन आणि अ-गझल कवितेमुळे नको म्हणून तो मोह आवरतेय. असल्या चुका या कवीपणामुळे होतात. :))

पु.ले.शु.

जगाच्या कारभाराची तुला .............का कुणास ठावुक हा शेर मला पक्का माझा वाटत नाही आहे असाच एखादा शेर मा बो वर इतरत्र वाचल्याचे स्मरते
ओरीजनल शेर कुणाचा असेल त्याने जरूर कळवणे<<<

माझा आहे असा एक शेरः

जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी

मतला छान आहे तुमच्या गझलेचा वैवकु

होहो......... तोच , तोच तो शेर !! करेक्ट बेफीजी ........ अत्ता आठवला तो शेर

हा तर तुमच्या शेकडो 'माबो'ज् मोस्ट पॉप्युलर शेरान्पैकी एक आहे आणि माझा अत्यन्त आवडताही !!

माझ्या गझलेच्या बांधकामासाठी असा बावनकशी 'कच्चामाल' तुमच्या गझलांमधून कैकदा (तोही विनामूल्य....) मिळत असतो त्याबद्दल मी आपला ऋणी आहे !!

गझल सांभाळते हल्ली तुझ्या प्रत्येक शेराला
तुझा रे वैभवा विठ्ठल् अताशा पोरका नाही

देवा खुप छान !

तुमचा माझ्यासाठीचा आशिर्वाद अन् विठ्ठलासाठीचे प्रेम आहे हे!!.... देसले साहेब
दोन्हीही असेच राहूद्यात
धन्यवाद