यायचे केव्हा तुझ्या गझलेत वैभव वैभवा?

Submitted by सतीश देवपूरकर on 29 July, 2012 - 04:00

रसिक मित्रमैत्रिणिंनो!
मला माफ करा. हा माझा पिंड नाही. हा माझा स्वभाव नाही. पण, सोशिकतेचे सीमोल्लंघन झाल्याने, नाइलाजाने मला ही गझल लिहावी व पोस्ट करावी लागत आहे.
...........प्रा. सतीश देवपूरकर
...................................................................
गझल
यायचे केव्हा तुझ्या गझलेत वैभव वैभवा?
षंढ शब्दांचा तुझ्या, हा नाच थांबव वैभवा!

शब्दब्रम्हाचा तुला अद्याप नाही गंधही;
काय तुज कळणार गझलेतील मार्दव वैभवा?

आग पाखडतोस, चिल्लर शायरी करतोस तू!
आव शब्दांची तुझी तात्काळ थांबव वैभवा!!

साधना, आराधना करतोस का केव्हा तरी?
वेळ कोणाला? तुझे बघण्यास तांडव वैभवा!

खूप झाले कोडकौतुक वांझ शब्दांचे तुझ्या!
आज ना कोणी तुझी करणार आर्जव वैभवा!!

शब्द असते शस्त्र, त्याचा योग्य वापर पाहिजे;
शब्दक्रीडेची तुझी ही हाव घालव वैभवा!

या! चला! सामील व्हा! नेऊ गझलदिंडी पुढे....
सर्व आपण मायबोलीचेच बांधव, वैभवा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खूप खूप आवडली ही गझल देवसर
तुम्ची मला आजवर सर्वात जास्त आवडलेली गझल आहे ही

"निवडक दहात."..............

धन्यवाद !!

विठ्ठलाशपथ ही चेष्टा नाही आहे ...............

(शेवटच्या शेरात रदीफ इतर शेराप्रमाणे तितक्या ताकदीने/ सफाईदारपणे साम्भाळला गेला नाही असे वाटले,.... वैयक्तिक मत कृगैन!!)

ही गझल देवसरानी का लिहिली ?
तुम्हाला प्रश्न पडलाय ना ??

त्याचे मूळ/उत्तर असे आहे ............जे मी काल देवसराना एका प्रतिसादात दिले होते
.

किती निर्भिडपणे पूर्वी गझल पाडायचो आम्ही
कुठुन हे देवसर आले नि अमुची ही दशा झाली

विजा घेवून येणार्‍या पिढ्यांचे स्वप्न सरणावर
चितेची राख करण्यास्तव पडा की देवसर खाली

गझल फडतूस असते रे तिची सोडून दे इच्छा
गुरू कर देवसर सुचतिल तुलाही शेर पर्यायी

कुणाच्या सर्टिफिकिटांची मला नव्हती तमा तेंव्हा
म्हणाले देवसर "हा शेर गोटीबंद का नाही ?"

यात अत्ताच सुचलेला एक नवा शेर=मक्ता अ‍ॅड करतोय ...............

मुघलि तुघलकीशाही नकोतर शूण-हूणी द्या
गझलराज्यात आम्हाला नको ही "देवसर"शाही


गझलराज्यात आम्हाला नको ही "देवसर"शाही !!!

गझलराज्यात आम्हाला नको ही "देवसर"शाही !!!!!

मराठी गझलेत चिता, सरण असे शब्द वारवार का येतात हा प्रश्न पडायचा पूर्वी. ही जमवाजमव होती तर.. Wink
गझलकारांच्या दूरदृष्टीला सलाम !

प्रेमळ संवाद >>>
हो हो !!
अहो इतकेच नाही ............."पर्यायीगझल : गुरु-शिष्य सन्वाद" आहे हा ...............

काळजीचे कारण नाही............रीलॅक्स !!!.....जस्ट चिल् !!
Happy

विजयराव हा प्रतिसाद नक्की कुणाला ..............

कृपया स्पष्ट करावे

"दोघाना" असे पॉलिटि़कल उत्तर शक्यतो नको Rofl

गझलदिंडी ???>>>>>>>>

दिंडी नावाचा छंद की वृत्त काय असतंना.... त्यात केलेली गझल असं प्रा. साहेबाना म्हणायचं असणार
डिक्शनरीत बघायला पायजे .........;)

किरण............... : या बोल्ड प्रकाराला 'हिजो' असे म्हणतात असे मी कुठेतरी वाचले आहे
इतर शायर व त्यांच्या शायरीची निंदा /विटंबना करणे , टर /खिल्ली उडवणे म्हणजे हिजो !!
हा तसा जुना प्रकार असला तरी याची प्रॅक्टिस आधीपासूनच जास्त केली गेली नसावी असे मला वाटते

मराठी माणसाचा स्वभाव बघता मराठीत याला हातपाय पसरणे फार सोपे आहे हे नक्की

(नेहमीप्रमाणे माझे अगाध ज्ञान .:D!! )

http://www.maayboli.com/node/21889
हा तुमचा धागा आहे बेफीजी.
And i Quote,
प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की गझल हा काव्यप्रकार पूर्णतः उत्स्फुर्तपणे सुचणे जवळपास अशक्य आहे. इतर कविता, विशेषतः आज लिहिल्या जाणार्‍या मुक्तछंदातील कविता एखाद्याला वरपासून खालपर्यंत सलग लिहिणे शक्यही होईल. गझलेतील मात्र एखादी ओळ, एखादा शेर, एखादी कल्पना, असे सुचू शकते. त्यावरून व त्यानंतर इतर काही विचार गुंफले जाऊ शकतात. गझलेतील प्रत्येक शेर एक वेगळी कविता असल्याने, एकाच तंत्रात पाच विविध विचार कवीला एकत्रितरीत्या सुचणे जवळपास अशक्य असते.

याचमुळे गझल हा कृत्रिम काव्यप्रकार आहे अशी टीकाही होते
unQuote....

व्वा सर व्वा....!!!

यायचे केव्हा तुझ्या गझलेत वैभव वैभवा? पासून ते
शब्दक्रीडेची तुझी ही हाव घालव वैभवा!

केवळ सुरेख. आशय भिडतो तो असा. Happy

-दिलीप बिरुटे
(देवपुरकरसरांचा विद्यार्थी)

सतीश,
मला माफ करा. हा माझा पिंड नाही. हा माझा स्वभाव नाही. पण, सोशिकतेचे सीमोल्लंघन झाल्याने, नाइलाजाने मला ही गझल लिहावी व पोस्ट करावी लागत आहे.
> > >

इथेच वाजवलीत पहिली Happy , खूपच छान.

पण बाकि कवितेच्या पात्राचे प्रतिसाद वाचले आणी एक हिंदी म्हण आठवली, भैंस के सामने बीन बजाना.

अड्नाव पण लिहून टाकायचत की गझलेत, तेवढ अडनाव बसवता आलचं असत तुम्हाला
> > >

अहो श्यामली,

तुम्ही अचुक बोललात, वैभवाची काढलीच आहे, कुळाची नको म्हणुन फक्त नांवच लिहिले. Proud

राजपुर मी काय बुवा घोडं मारलय तुमचं ?"

बिरुटे बरोबर बोललात !!ही गझल अतीशय उत्तन्म अशी गझल आहे देवसरांची
असे म्हणायची अनेक कारणेव आहेत त्यातील एक म्हणजे जे पोटात ते ओठावर अगदी सहज आले अहे ह्या गझलेत
शब्द योजना अतीशय प्रभावी व नेमकी आहे जे म्हणायव्हे ते छान व उठवदार पणे व्यक्त झाले अहे
गझलेत फ्लो मस्तच
वाचताच प्रभावित करणारी गझल!

मलाही फार आवड्ते

राजपुर मी काय बुवा घोडं मारलय तुमचं ?"

> > >

सॉरी , पण सतीश ह्यांची ही कविता खूपच प्रभावी आहे, थोडाबहुत

माझ्यावरही पडलाच. Happy

नैसर्गीक आपत्ती टळून गेल्यानंतरही काही अवशेष तिची भीती दाखवत राहतात तसे नुकतेच काही प्रतिसाद आलेले दिसतात या रचनेवर.

मधेच इब्लिसांनी माझ्या वेगळ्याच एका तुच्छ लेखनापैकी काही भाग येथे कॉपी पेस्ट करून या नितांत सुंदर धाग्यावर काही अपवित्र शिंतोडे का उडवले आहेत समजत नाही आहे.

नैसर्गीक आपत्ती टळून गेल्यानंतरही काही अवशेष तिची भीती दाखवत राहतात तसे नुकतेच काही प्रतिसाद आलेले दिसतात या रचनेवर.
> > >

बेफिकीर, वर सतीश ह्यांच्या काव्यात " आव ", बद्दल लिहिले आहे, ह्या नैसर्गिक आपत्तीची गोष्ट करत आहात काय ?
Wink