स्वप्नच पहात होतो मी..

Submitted by गणेश सावंत on 27 July, 2012 - 06:37

स्वप्नच पहात होतो मी.. अक्षम्य ,अपराधी ,निरागस
पाहुनाचारासकट अवहेलना होती ती ..
जाणले होते मी तेव्हा, चाहूलच म्हणा ना..
पण वेडावले मन का कुणास जाणे,
त्या क्षितीजामागे सैरावैरा धावू लागले ....
पामरा,किनाऱ्या लगतची दगडे संपून गेली..
सूर्य हि निपजतच खाली सरसावला ....
बोचरा काळोख पुन्हा डोकावू लागला ....
दुनियेची ही कैफियत काही औरच ...
हि जाणीव पूर्वी देखील होती म्हणा ////
स्वार्थ खरच इतका वाईट असतो का हो?
अनंत अमुची ध्येयासक्ती हीच का ती?

होईन पुन्हा कलंदर ,मदमस्तर
सुस्त आणि मस्त ओढून चादर
सरसावूनी ती रेशमी झालर
नाविन्य आणि चैतन्याचे वाहतील पुन्हा झरे..
सरसर शिरावे, प्रतिबिंब जगाचे ओजस्वी असे खरे..
अधिक उणे गणिताचा खेळ होताच जाणार .....
मला हातचा ठेवून जग मला गृहितच ठेवणार ...
पण मी बापडा शून्य असूनही
विश्वाचे न उलगडलेले कोडे सोडणार नाही
शून्यांची किंमत काय असते जगाला माहीतच आहे कि...

दुनियेचा रंग शैलीदार, उबदार,असरदार,कसदार कि अब्रूदार
नुकसान भरपाई हि जागाच देणार ,
मी कधी वाईट बगलो असे नव्हे.. देव तर मुळीच नाही मी...
हातात धनुष्य घ्यावाच लागतो का ?
चक्रधारी युगंधरालाही भावबंध सुटले का ?
येईल एक वेळ ....
आले देवाजीच्या मना या मताचा नव्हतोच मी केंव्हा ..
जगात जा .....दुनियेची मजा उपजतच जा ...
जगण्यात खरच मजा आहे..
हम सब रंगमंच कि कट पुतलीया है...
जिसकी दोर उपरवाले के हाथो मे है ...
कब, कौन, कहा,कैसे ..उठेगा ...ये कोई नाही जानता....
हा हा हा हा हा.///
भेदून साऱ्या रुंदावल्या कक्षा ...
देवच तारील ....करील आमची रक्षा ....
ऐकल का हो ...पेट्रोलचे दर ५ रुपयांनी वाढलेत म्हणे..
जीवनाचा धसकाच मुळी इतका वाईट ...
कधी कधी खरच वाटत कॅन्स पेक्ष्या
अर्ध्या सेकंदाचा 'हार्ट-अट्यक ' च बरा कि...
दारिद्र्य असूनही आनंद उपभोगणारी मानस पाहिली आहेत मी ....
कधी कधी चुंबक प्रमाणे माझे मन सरसावते त्यांच्या कडे ,
पण पाय काही उचलले जात नाहीत ....
सारांश देऊनच सांगतो तेव्हा मला अस जाणवत ...
माझा स्वार्थ काही केल्या सुटत नाही...
पण नसेल स्वार्थ ....तर त्या जीवनाला काय अर्थ...
सगळेच रुसवे ,,,,सगळ्याच हौशी कशा पुरवणार ?
----------------------------
जय महाराष्ट्र !

गुलमोहर: