मिनिमलिस्ट शूजबद्दल चर्चा

Submitted by सानुली on 26 July, 2012 - 17:33

मॅरॅथॉन आणि १०के रनिंगच्या बाफवर मिनिमलिस्ट शूजबद्दल चर्चा चालू होती, तिच पुढे continue करण्यासाठी हा बाफ. "मी लिहिन" असं वैद्यबुवांनी सांगितलं आहे, तेव्हा बॉल त्यांच्या कोर्टात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे लिहायचे विसरूनच गेलो होतो! बाफं उघडल्याबद्दल धन्यवाद सानुली. Happy

माझ्या माहिती प्रमाणे कुठल्याही प्रकारचा "सपोर्ट" नसलेले शूज म्हणजे मिनिमलिस्ट म्हणता येतील. इथे परत अगदी विब्रम फाईव फिंगर्स (Vibram Five Fingers), किंवा Huarache Sandals (मराठीत ज्यांना अगदी सपाता म्हणता येतील) सारखे एकदमच मिनिमल पासून इतर प्रसिद्ध कंपन्यांचे काहीही अँकल सपोर्ट नसलेले आणि तळव्यांना एकदम कमी फोम/रबर असलेले शूज ह्या मिनिमलिस्ट प्रकारात मोडतात.

स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगायचे तर मी क्रिस मक्डूगल ह्यांचे "बॉर्न टू रन" हे पुस्तक वाचून, प्रेरित होऊन अनवाणी किंवा मिनिमलिस्ट शूज घालून पळायला सुरवात केली.

विब्रमचे फाईव फिंगर्स जरा महाग आहेत त्यामुळे मी Fila चे स्केलिटोज विकत घेतले. थोडीफार पळायची सवय होती म्हणून सरळ स्केलिटोज घालूनच दुसर्या दिवशी पळायला गेलो. मस्त वाटलं.

एकदा आपण हे शूज घालून पळायला लागलो आणि जर तुम्ही एर्वी टाचेवर लँड होत असाल तर आपोआप टाचे वर लँड न होता एक तर मिडफूट (पाय जमिनीला समांतर टेकतो) लँड होता किंवा चवड्यावर लँड होता.
इथे एरवीच्या पळण्यापेक्षा काय वेगळं होतय हे लक्षात घ्या. पायात जाड रबराचे शूज घालून तुम्ही पळत असला की सहसा तुम्ही टाच आधी टेकवता, टाच नाही टेकवली पण पाय मिडफूट किंवा चवड्यावर जरी लँड करत असलात तरी पायाखालच्या जाड रबरामुळे तुमची टाच जास्त वेळ अधांतरी राहत नाही.
आता मिनिमल शूज घालून जेव्हा तुम्ही चवड्यावर लँड होता आणि त्यानंतर चवड्यापासून सुरु होऊन टाचेपर्यंत पाय जमिनिवर टेकतो आणि मग परत उचलला जातो, तेव्हा पायाखाली काहीच सपोर्ट नसल्यामुळे टाच बराच वेळ अधांतरीच असते आणि टेकली तरी अगदी एक सेकंदाकरता.
टाच अधांतरी राहिली म्हणजे काय होतं? काफ (पोटरी)चे मसल आणि त्यांच्या खालीच तळपाया जवळ असलेला एकिलिस टेंडन हे सतत अ‍ॅक्टिवेटेड राहतात.
आता विचार करा, तुम्ही जर साधारण पाऊण ते एक तास पळत असाल तर ह्यातला बराच सगळा वेळ तुम्ही दोन्ही पायाच्या चवड्यांवर असता आणि त्यामुळे तुमचे काफ मसल्स, एकिलिस टेंडन हे सतत कार्यरत असतात. आपल्याला ह्याची सवय नसते आणि त्यामुळे पोटर्‍या खुपच दुखून येतात.
पोटृयांचे दुखणे हे आपल्याला घातक वाटत नाही आणि मी स्वतः तरी तसच स्वतःला दामटलं आणि व्हायचं तेच झालं. दुखापत. ही पळायची पद्ध्त इतकी सवयीची नसल्यामुळे एक दिवशी एकिलिस टेंडन प्रचंड दुखायला लागला. ह्याच कारणाकरता मिनिमलिस्ट शूज घालून एकदम अचानक नेहमी सारखं पळायला सुरु करु नये. अगदी सावकाश सुरवात करावी.
मिनिमलिस्ट शूज बद्दल अजून एक गोष्ट चांगली समजली जाते. ती म्हणजे तुमच्या पायाच्या तळव्याला जर कमी बाक असेल तर मिनिमल शूजचा फायदा होऊ शकतो. सहसा कमी बाक असलेली लोकं जेव्हा मोठे रबरी सोल असलेले शूज घालून पळतात तेव्हा ते pronate करतात. प्रोनेट करणे म्हणजे, पायाला बाक (arch) कमी असल्यामुळे जेव्हा तुमचा पाय पळताना जमिनीवर टेकतो तेव्हा तो आर्च प्रमाणापेक्षा जास्त कोलॅप्स होतो.
आपल्या पायाच्या बाक असलेल्या डिजाईनच्या मुळाशी शॉक अ‍ॅबसॉर्पशन आहे. नॉर्मल आर्च असलेले लोकं जेव्हा पाय जमिनीवर टेकवतात तेव्हा तो शॉक अ‍ॅबसॉर्ब करत तो आर्च (तळ पायाचा बाक) एका मर्यादेपर्यंत कॉलॅप्स होतो आणि पाय उचलल्यावर परत पुर्ववत होतो.
ज्यांच्या तळपायांना खुप कमी आर्च असतो त्यांचा आर्च प्रमाणापेक्षा जास्त कोलॅप्स होतो आणि त्यामुळे आपला पाय पडत असताना तो पायाच्या हाडामध्ये आणि तळपायामध्ये अकारण एका विशिष कोन ठेवून पडतो. तसा जर पाय सतत पडत राहिला तर आपल्या पायाच्या हाडाचे वरचे टोक (जे गुडघ्यात जाते) ते गुड्घ्याच्या खोबणीत त्याची ठराविक रेषेतील नैसर्गिक हालचाल न करता वेगळ्या कोनातून हालचाल करते ज्यामुळे पुढे गुडघ्याची झीज होऊन दुखापत होते.

मिनिमलिस्ट शूज घालून आपण जेव्हा पळतो तेव्हा सहसा आपण फ्रंटफूट म्हणजे चवड्यावर लँड होतो त्यामुळे आर्च जास्त कोलॅप्स होत नाही आणि पुढे होऊ घातलेली गुडघ्याची दुखापत टळू शकते असं म्हणतात. Happy

वैद्यबुवा, छान माहिती दिलीत. धन्यवाद.
मी नेहमीचे स्पोर्ट्स शूज घालून नुसतं ब्रिस्क वॉकिंगला सुरूवात केली होती तर आठवड्याच्या आतच अ‍ॅचिलिसचं दुखणं मागे लागलं. चालणं ठप्प.