ये तूच मग तेथे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 July, 2012 - 14:31

दारात ज्यांच्या धुत्कार गर्जतात
पायरीवरी अन श्वान भुंकतात
स्वामित्व त्या घराचे नकोच केव्हा मला
दरिद्री स्वागताचे अप्रूप असे मला

त्या उभारल्या भिंती भीतीत चिणलेल्या
अन रोखल्या झडपा संदेही आक्रसलेल्या
घेवूनी धानिकतेला काय करावे असल्या
जगणेच शाप त्यांना पदी बांधल्या साखळ्या

दे मोकळे आकाश झोपडी विस्कटलेली
दे स्वतंत्रता हृदयी स्वागता उत्सुकलेली
दे प्रेममयता ती भीती मुळी नसलेली
ये तूच मग तेथे शोधीत जागा आपुली

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

विभाग्रजजी,
होय हि कविता झाल्यावर मलाही संत तुकडोजी महाराजांची हि कविता आठवली . मला वाटते त्या वृक्षाच्या बीजातून या कवितेचा जन्म झाला आहे .धन्यवाद.