Submitted by सुप्रिया जाधव. on 26 July, 2012 - 10:48
आठवांनो जा निजा, अन या सकाळी...
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !
सोबतीने तू तुझ्या घेवून जा ना...
आठवे छळतात ही तीन्ही-त्रिकाळी !
कोरडे ठेवू कसे डोळे असे मी..
रात्र का सरते सख्याविण पावसाळी ?
शोधण्यामध्येच सारा जन्म जातो...
चार दिन नात्यातली टिकते नव्हाळी
'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी !
दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी..
वाहतो तो ओंडका, तगती लव्हाळी !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम्........खूप खूप
अप्रतिम्........खूप खूप आवडली........
जबरदस्त ! शिर्षक अफाट आवडले.
जबरदस्त !
शिर्षक अफाट आवडले.
सुधारणेनंतर संपूर्ण गझल
सुधारणेनंतर संपूर्ण गझल झक्कास झाली आहे..
मतला खल्लास...
गझल खूप आवडली..
शुभेच्छा.
मनःपुर्वक आभार्स मंडळी!
मनःपुर्वक आभार्स मंडळी!
सुप्रिया, (नाव ओळखीच वाटतय
सुप्रिया, (नाव ओळखीच वाटतय !)
गझल उत्तम झाली आहे आणि म्हणूनच विडंबनाचा मोह आवरता आला नाही.
बाय ऑल मिन्स ! धन्स रे
बाय ऑल मिन्स !
धन्स रे
आवडली.
आवडली.
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !
आवडला मिसरा.
छान सुप्रिया ताई
छान सुप्रिया ताई
अभिजितशी सहमत
अभिजितशी सहमत
आभार्स मंडळी
आभार्स मंडळी
मस्तच! खुप आवडली!!!
मस्तच! खुप आवडली!!!
आजुन येऊद्या ... शुभेच्छा !!
आजुन येऊद्या ... शुभेच्छा !!
खूप आवडली
खूप आवडली
आभारी आहे.
आभारी आहे.
.
.
सुरेख !
सुरेख !
आठवांनो जा निजा, अन या
आठवांनो जा निजा, अन या सकाळी...
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !
'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी !>>>> वाह!!!!
अप्रतिम!!! खुप आवडली.
लय भारी....
लय भारी....
आठवांनो जा निजा, अन या सकाळी.
आठवांनो जा निजा, अन या सकाळी...
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !....... भारीच
व्वा, सगळेच शेर मस्त
आवडली..
आवडली..
अप्रतीम
अप्रतीम
Pages