विठ्ठलाचा हात आहे..

Submitted by कमलाकर देसले on 26 July, 2012 - 08:45

विठ्ठलाचा हात आहे..

मी तुझ्या श्वासात आहे;
प्राण माझा गात आहे..

शोधतो सौन्दर्य मी जे;
आतल्या लैलात आहे..

बावरी राधा बिचारी;
श्याम आभासात आहे..

चावला ना सर्प.कारण-
काढला मी दात आहे..

या उजेडाची प्रभू रे-
कोणती ही वात आहे..

संपले कार्पण्य माझे;
टाकली मी कात आहे..

बिघडण्यामध्ये तुक्याच्या-
विठ्ठलाचा हात आहे..

या सरीतुन,या झर्‍यातुन-
ईश्वरा तू गात आहे..

पाहिला मी बाप माझा-
राबत्या बैलात आहे..

एक त्यान्चा प्रश्न की,मी ;
कोणत्या पक्षात आहे ..

स्पन्दनातुन नान्दतो बघ;
मी तुझ्या वक्षात आहे ..

शोधणे आहे कठिण. पण-
राम हा ह्रदयात आहे..

गुलमोहर: 

वा वा देसले साहेब मस्तच
वात , कात ('कार्पण्य'साठी),बैलात , आवडले
विठ्ठलाचा हात ....वा वा मस्तच!!
मला 'लैला' जाम आवडली ...फार फार अगदी !!...खूप वेगळा झालाय शेर 'लैला' मुळे.(ही लैला मजनूची लैलाच ना?)

कुलकर्णी सर , धन्यवाद >>मला 'लैला' जाम आवडली ...फार फार अगदी !!...खूप वेगळा झालाय शेर 'लैला' मुळे.(ही लैला मजनूची लैलाच ना?)>>> सरजी अगदी बरोबर .