वेबमास्तर

Submitted by चक्रम on 26 July, 2012 - 00:04

आणखी देशात आले वेबमास्तर आपले
'भावना' म्हणते तयांची भोग निस्तर आपले

अ‍ॅडमिनची वाहणारी सांगते तुजला विपू
नावडीच्या आयडीवर काढ नस्तर आपले

आत्महत्या जन्मठेपा वा दिले फाशीवरी
नवनवी ड्यू आय तरिही दाखवी स्तर आपले

धार्मिकांचा नास्तिकांचा त्याच त्या मुद्द्यावरी
वाद चाले , अ‍ॅडमिन तू दाव शास्तर आपले

हापिसाच्या सिस्टमीवर काम पहिले कोणते
पसरणे माबोवरी हे बाडबिस्तर आपले

चक्रमा डोकावलासी बहु दिसांनी या इथे
शोध कंपू ओळखीचा निवड मास्तर आपले

चक्रम रिटर्न्स!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy

छान

ह्यी आम्च्या बेफीजींनी 'बुजकूज'मदी दिलेल्या वंळीवर्ची तऱ्ही हाय नव्हं ?
बेष्ट ह्हाये बगा,,,येक नंबर !!
लै भारी