तुझ्याचसाठी

Submitted by वैभव फाटक on 25 July, 2012 - 23:56

तारेवरची कसरत सारी तुझ्याचसाठी
दुनियेसंगे मारामारी तुझ्याचसाठी

तसे कुणाचे तीळमात्रही ऐकत नाही
किती पचवले बोल जिव्हारी तुझ्याचसाठी

लाख चेहरे घुटमळणारे अवतीभवती
तरी फुंकली प्रीत तुतारी तुझ्याचसाठी

तुझ्या लोचनी अश्रू बघणे जमले नसते
मी दु:खाची दिली सुपारी तुझ्याचसाठी

तुझ्या सुखातच श्रीमंती मी मानित आलो
पत्करलेली किती उधारी तुझ्याचसाठी

------- ( वैभव फाटक - ५ जून २०१२) -------

गुलमोहर: 

छान...

स्वच्छ आहे, अजून खोल मात्र हवी होती असे वाटले ===>>

बेफिजी,
सूचना मान्य आहे..
काही शेर अजून चांगले होऊ शकतील हे खरे आहे.
पुन्हा कधी प्रयत्न करतो..
प्रांजळ प्रतिक्रियेसाठी सर्वांचे धन्यवाद..

तुझ्या लोचनी अश्रू बघणे जमले नसते
मी दु:खाची दिली सुपारी तुझ्याचसाठी

तुझ्या सुखातच श्रीमंती मी मानित आलो
पत्करलेली किती उधारी तुझ्याचसाठी
आवडले..!