श्री साईंनाथाय नम:

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 July, 2012 - 05:05

श्री साईंनाथाय नम:

तुझी करुणा दयाघना
ओघळली पुन्हा जीवना
तव प्रीतीची प्रचिती आली
पुन्हा एकदा मना

तू तो माझा तारणहार
सदा संकटी सावरणारा
हात धरुनी हाक मारता
सुखरूप घरी पोहचवणारा

तूच घडविले वाढवले मज
नकळत माझ्या मम दातारा
तव प्रेमाच्या ऋणात राहू दे
हेच मागणे पुन्हा उदारा

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

गुलमोहर: 

छान !