"सत्यमेव जयते"-भाग १२ (Water- Every Drop Counts)

Submitted by यशस्विनी on 22 July, 2012 - 08:26

आताच आजचा सत्यमेव जयतेचा "पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा" या विषयावर झालेला भाग बघितला. अंत्यत सुंदर सादरीकरण, मुद्देसुद झालेली चर्चा आवडली..... या भागावर मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया जाणुन घेउ या म्हणुन इथे आले तर अजुन चर्चा किंवा त्यावरील धागा सुरू झालेला दिसला नाही, या भागावर चर्चा करण्यासाठी काढलेला हा धागा......

सत्यमेव जयतेचा हा भाग खालील लिंकवर बघायला मिळेल ------http://www.satyamevjayate.in/issue12/

या आधीचे धागे मायबोलीकर आनंदयात्री आणि ज्ञानेश यांनी काढलेले आहेत त्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे --------

या आधीच्या भागांच्या लिंक्स-

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० -http://www.maayboli.com/node/36260
सत्यमेव जयते भाग ११- http://www.maayboli.com/node/36434

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषय काय असेल याबद्दल उत्सुकता होती म्हणुन इथे डोकावले. धन्यवाद मी_वर्षा.

आज माबोकर वविमध्ये असल्याने इथे चर्चा करायला फारसे येइल असे वाटत नाही.

मी अजुन आजचा भाग पाहिला नाही.

वत्सला, काय योगायोग आहे, आताच माझ्या लक्षात आले की "मी वर्षा" म्हणजे वर्षा-पाऊस-पाणी हिने आजचा धागा काढला, व त्यावर चर्चा करणारे मायबोलीकर "वर्षा विहार" करायला गेले आहेत Happy

आजचा विषय फार आवडला.
अतिशय महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा विषय आहे.

रच्याकने, शिक्षणक्षेत्रावर अजून एकही विषय आमीरने घेतला नाहीये. पुढचा भाग शेवटचा असेल..

आजचा भाग अत्यंत उत्कृष्ट... पण फार थोडक्यात आवरला गेला असे वाटले.

पाण्याचा प्रत्येक थेंब जीवन आहे हे प्रेक्षकांच्या मनात बिंबवण्यात काही प्रमाणात आमिरला यश आले असे जाणवले.

खरे तर ३-४ महत्त्वाचे मुद्दे जास्त प्रमाणावर चर्चिले जायले पाहिजे होते , जसे की:

१. मुंबईमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ई. गोष्टींना अड्कवण्यामध्ये टँकर लॉबीचे हित आहे हे समोर आले नाही. पाण्याचा किती मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालतो हे समोर आले असते तर अजून परिणामकारक झाले असते.

२. केमिकल्स आणि मेटल्सयुक्त पाणी़ (किंवा रसायने) पाण्यात, नदीत सोडणार्‍या कारखान्यांवर, कारखानदारांवर काय कारवाई करण्यात आली, किंवा होऊ शकते हे समोरच आले नाही.

३. आजच्या विश्लेषकामंध्ये (तज्ञ) यमुना योजनेचे संयोजक सोडले तर ईतर एव्हढे प्रभावी जाणवले नाही, तसे पाहिले तर ह्या क्षेत्रात काम करणारे खुप तज्ञ एकहाती विवीध राज्यांमध्ये काम करताहेत, त्यांना समोर आणले असते तर हा एपिसोड अजून प्रभावी झाला असता.

अर्थात वरील सर्व माझे वै. म.

एक खुप आवडले, कार्यक्रमाच्या शेवटी चेन्नई च्या आय.ए. एस ऑफिसरने केलेले स्तुत्य कार्य , पण नेमके सांगितलेले सत्य की जोपर्यंत राजकिय नेते (मंत्रिमंडळ) मनापासून अश्या योजना राबवण्यात पुढाकार घेत नाहीत आणि सहकार्य करत नाहीत तोपर्यंत एकट्याने जास्त काही करता येत नाही. कारण सामान्य जनता कायद्याला घाबरते आणि भीतीपोटी का होईना, सहकार्य करते आणि कायद्याचे पालन करते.

पण सरतेशेवटी आमिरला एक जळजळीत सत्य समोर आणल्याबद्दल मनापासून सलाम, अभिनंदन

एपिसोड थोडा आटोपता घेतला पण तरी चांगला प्रयत्न !
आजचं एपिसोड नंतर्चं शेवटचं सुखविंदर सिंग च गाणं अप्रतिम , 'वॉटर' एपिसोड ला गाण्यात जलतरंग वापारायची आयडीआ पण छान.
अत्ता पर्यंत आलेले इतर गायक आणि सुखविंदर च्या लाइव्ह सिंगिंग मधला फरक कळला :).

मृत /मृतप्राय नद्यांची माहिती घाबरवून सोडणारी होती. त्यावर उपाय काय; युरोपात, अन्य देशांत नद्या शुद्ध, स्वच्छ करणे कसे साध्य झाले हे सांगायला हवे होते.
तसेच गावांतल्या लोकांना पाणी अडवा/पाणी जिरवा हे शक्य आहे एवढेच कळले. कसे तेही कळले असते तर बरे झाले असते (अर्थात वेळेची मर्यादा आहेच)
सगळ्या शहरां/नगरांमध्ये रेनवॉटर हार्व्हेस्टिंगचे चेन्नई मॉडेल अनिवार्य करायलाच हवे.

खुप चांगला एपिसोड. महाराष्ट्र सरकारनेही नव्या इमारतींना पर्जन्यजलसाठवण अनिवार्य करण्याचे ठरवले आहे असे एकदा वाचनात आले होते. पण त्यात पळवाट अशी होती की जर ही सोय केली नसेल तर त्या इमारती जास्त टॅक्स भरतील. हा नियम प्रत्यक्षात लागू झाला का हे नंतर कळले नाही.

अतिशय महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा विषय!! >>
हा भाग बघून आपणही काहीतरी करायला हवे असे नक्कीच वाटले, आणि हेच त्यांचे यश आहे.

ज्यांना पाण्याचे व्यवस्थापन या विषयाचा शास्त्रशुध्द अभ्यास करायचा आहे त्यांच्या करता

आय आय टी मुंबई मधे अभ्यासक्रम आहेत.

http://www.iitb.ac.in/acadpublic/crsedetail.jsp?ccd=NR 624

http://www.iitb.ac.in/acadpublic/crsedetail.jsp?ccd=NR 622

आता हे भाग मला मिळवायलाच हवेत.
पाण्याच्या बाबतीत खरेच खुप नियोजन करायला हवे होते. नुसते धरणाचेच नव्हे सर्वच बाबतीत.

आपल्याकडे लॉब्या पण कसल्याही निर्माण होतात.
टँकर्सची असते, मेडिकल कॉलेजेस ची असते, पोलियो लसीची असते, अमकाविरोधी असते आणि तमका समर्थकांची पण असते Happy

@ श्रीकांत

तुम्ही शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केले की एरर मेसेज येत आहे (HTTP Status 500- )