समुद्रातील लाटांनी दिला पत्ता किना-याचा!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 July, 2012 - 05:04

गझल
समुद्रातील लाटांनी दिला पत्ता किना-याचा!
किनारा गाठण्यासाठी, मिळाला हात वा-याचा!!

दिशा सा-याच काळोख्या दिसाया लागती तेव्हा......
हवा आधार धरणीला, नभाच्या एक ता-याचा!

कितीदा भंगला गेलो! कितीदा सांधला गेलो!
मलाही वाटते माझा असावा पिंड पा-याचा!!

करावा कोंदणाने का हि-यापेक्षा अधिक तोरा?
*(फुलांपेक्षा अधिक तोरा फुलांच्या, आज गज-याचा!)

जगा! हा रोजचा झाला, तुझा भडिमार प्रश्नांचा!
मलाही लागला आहे लळा ह्या आज मा-याचा!

किती आवेश हा मोठा, किती देतात ते नारे!
समजला अर्थ कोणाला खरा एकेक ना-याचा?

पिताना गोड चखणा का , कुणी घेवून बसलेला?
अशा वेळेस ठरलेला असे तो मान खा-याचा!

जिथे माणूस तडफडतो.....पिण्यालाही नसे पाणी!
तिथे आ वासुनी बघतो बिचारा प्रश्न चा-याचा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

(टीप: * गज-याने हा काफिया इथे बसत नाही, कारण अलामत : अकारान्त झाली, ती आकारान्त असायला हवी. पण, खयाल छान असल्याने हा शेर देण्याचा मोह अनावर झाला. कृपया क्षमा असावी!)

गुलमोहर: 

देवसर,

खरे सांगू काय ?.........

एक म्हणजे मतला आणि ---

कितीदा भंगला गेलो! कितीदा सांधला गेलो!
मलाही वाटते माझा असावा पिंड पा-याचा!!

...................... यामध्ये जे खयाल आहेत ते इतर शेरांमध्ये नाहीत की असुन मलाच पकडता येत नाहीत
देव जणे. Happy पण वाचताना तसे वाटते खरे. आणि महत्वाचे म्हणजे अशाप्रकारच्या विषया मध्ये तुमच्या कडून या ही पेक्षा काहीतरी वेगळे, आशयघन येण्याचे राहीले आहे. असेही वाटते.

.........................ऑर्फिअस.