शोध

Submitted by तुटता तारा on 20 July, 2012 - 16:24

जगण्याच्या या दाट धुक्यात
मी शोधतो आहे काहीतरी
हे धुकं खूप रम्य आहे
पण
सतत काहीतरी
माझ्या समोर असून
दिसत नसल्याची खंत
बोचत राहते मनाला
मग मी तिथे जाऊन पोचतो
थोडाफार थांबतो
मग कळून चुकत
की हे ठिकाण आपलं नाही
मग पुन्हा सुरु होतो
एक नवा प्रवास
वाटेत मला
माझीसुद्धा ठिकाणं सापडतात
पण तरी
नव्या ठिकाणांच कुतूहल
मला खुणावत राहत
साद घालत राहत
बरीच ठिकाण फिरल्यावर
आता जाणवतंय
की मी
स्वतःलाच शोधतो आहे
.
कदाचित
-तुटता तारा

गुलमोहर: