सदाहरीत मनांचे म्हणे बरे असते

Submitted by वैवकु on 19 July, 2012 - 07:00

सदाहरीत मनांचे म्हणे बरे असते
घडेल काय उद्या कधी काळजी नसते

अशी नकोस बघू माझिये वळून मला
तुझी अधीर नजर काळजामधे धसते

कुठून येते हे मळभ दाटते 'अवघे'
अशी कशी मनातली पुनव अमावसते

किती चटोर फूलपाखरू मनाचे हे
कधी इथे बसते तर कधी तिथे बसते

रिकामटेकडे , खयाल आणि तू - दोघे
तुम्हामुळेच वैभवा तुझी गझल फसते

गुलमोहर: 

सुंदरच.आवडली.

अशी नकोस बघू माझिये वळून मला
तुझी अधीर नजर काळजामधे धसते

खर्‍या कवीलाच असं लिहिणं जमतं. कधी कधी स्वतःला वेळही द्यावा लागतो तेव्हा कवितेचा कस पूर्वपदावर येतो. पु.ले.शु...

धन्यवाद किरण

भारतीताई मनःपूर्वक आभार
नेमका प्रतिसाद दिलात ...............(कधी कधी स्वतःला वेळही द्यावा लागतो >>>>१००%सहमत)

;)) कविता हा सगळ्यात निसरडा साहित्यप्रकार..ईश्वरप्राप्तीइतकाच गुंगारा देणारा. हाती येतायेता दूर जाणारा..

भारतीताई आपले मत पटले
कविता आणि गझल यात मला जाणवलेला एक फरक ..त्यावर माझे मत अजून शब्दबद्ध कराण्याइतपत माझे चिन्तन पक्के झाले नाहीये ; पण झाल्यावर अपणास नक्की कळवीन विचारपूसमध्ये !!

अवश्य वैभव,माझ्या किशोरवयापासून गझलकारांच्या जादूच्या वर्तुळाजवळ वावरूनही व गझल अत्यंत आवडत असतानाही का कोण जाणे,मी स्वतःची गझल कमीच लिहिली. एखादी माझी गझलसदृश रचना माबो वर ठेवेनही,इथल्या तुमच्यासारख्या मातब्बरांसमोर. :)) कधीतरी हिम्मतीने.गझल ही वृत्ती असते हेच खरे.