आवाज साळुंख्यांचा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 July, 2012 - 02:38

आमच्या आवारात बर्‍याच साळुंख्या येतात. त्यांचे सततचे अस्तित्व जाणवुन देत असतो त्यांचा आवाज. त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्यांचे आवाजही वेगवेगळे ऐकू येत असतात. त्यांचा जेंव्हा चांगला मुड असतो, सर्वसामान्य परिस्थितीत असतात तेंव्हा त्यांचा गोड आवाज ऐकू येतो.

त्यांचा एक कर्कश्य आवाज निघतो तो साप दिसल्यावर. ह्या साळुंख्या इतकया शुर असतात की साप कुठे दिसला रे दिसला की सापाला धुडकाउन लावण्यासाठी कर्कश्य आवाज करत अगदी त्याला टोचायला जातात. ह्यांच्या जोडीला एखादा कावळाही असतो. आधीच त्याचा आवाज कर्कश्य असतो त्यात अजुन कर्कश्य आवाज तोही काढतो. शिवाय तो धुर्तच फक्त त्यांना साथ देतो पण सापाला टोचण्याचे अभय त्याच्यात नाही.

आश्च्यर्य म्हणजे सापही साळुंख्यांना पाहून गवतात वगैरे जाउन लपतो. जरा सापाचा थोडा भाग जरी दिसला की लगेच ह्या साळुंख्या जाऊन टोच मारतात. मग सापही गायब होउन जातो. अशा ह्या धाडसी साळुंख्या. ह्यांचे हे सापाबरोबरचे थरार नाट्य आम्ही खुप वेळा पाहतो.

परवाच संध्याकाळी आंब्याच्या झाडावर साळुंख्यांचा भांडण्याचा आवाज येत होता. आवाज भांडणाचा आहे हे मी ओळखले. कारण गोडही नव्हता आणि कर्कश्यही नव्हता नुसता किलकिलाट होता म्हणून कॅमेरा घेउन लगेच बाहेर जाउन पाहिले तर त्यांची अगदी मध्येच फायटींग होत होती तर मध्येच एकमेकांच्या अंगावर खेकसत होत्या. तस कारण कळल नाही. इतकच कळल की झाडाच्या ढोलीत काहीतरी आहे त्यावरून भांडण सुरु आहे. कदाचीत बाळही असेल. ढोलीत घरटे आहे असे वाटत होते. एकाच वेळी ४-५ साळुंख्या ह्या ढोलीवर बसुन आत पाहून ओरडत होत्या. हा आवाज त्यांच्या भांडणाचाच होता. ढोलीवरून शेकटावर जाऊन दोनदा दोन साळुंख्या एकमेकांशी कुस्तीही खेळल्या. फोटो घेई पर्यंत त्यांची कुस्ती परत हमरी तुमरीवर येत होती. मी फोटो काढते ह्याची परवाही नव्हती त्यांना. हे त्यांचे भांडण चालू असतानाचे फोटो.

१) ही साळुंखी ढोलीत जात होती आणि बाजुच्या ओरडत होत्या. त्यांना प्रतिकार करताना किती तिचा चेहरा रागिट झाला आहे पहा.

२) ढोलीत घरटे दिसत आहे.

३) ढोलीत घुसलेली सा़ळुंखी.

४) दुसरी साळुंखी आत डोकावतेय व त्यांचे भांडण चालू होते.

५) त्यांची हमरा तुमरी.

६) हे भांडणाचे पुर्ण दृष्य.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माणसांच्या भांडणात डोळे लाल होतात, साळुंक्यांच्या भांडणात निळे होताना दिसताहेत......
वर्णन व प्रचि भारीच....

मधु, योगुली, ससा, सेनापती, रुणुझुणू, रिया, इन्ना, मोनाली धन्यवाद.

शशांक त्यांच्यात पण डोळ्यांचे प्रकार असतील माणसांसारखे घारे, निळे, काळे.

बादवे; जागू, साळूंके रहातात शेजारी ? आमच्या तर नाही कोणाच्या राहत असतील तर त्यांचा आवाज नक्की टिपत जा Lol

अगदी आवाज कुणाचा !! असे वाटतेय,
साळुंक्या अनेक प्रकारचे आवाज काढतात, पण एकंदर आवेश चिडल्याचाच असतो.

व्वा जागुतै, साळुंख्यांचा आवाज प्रकाशचित्रांमार्फत पोचवण्याची कल्पना भन्नाट एकदम.
प्रकाशचित्रे सुंदर...

वा जागु मस्तच! छानच आलेत फोटो. वर्णनही मस्त झाले. अशावेळी आपल्याला पण पक्षांची भाषा यायला पाहीजे असे वाटले कि नाही??

सह्हीच गं जागु Happy काय भन्नाट फोटो काढल्येय्स साळुंख्यांच्या भांडणाचे!!

तुझा खुप हेवा वाटतो की तु अश्या निसर्गरम्य परीसरात रहातेस आणि त्यापेक्षा जास्त कौतुक वाटते... तुझ्या निसर्गाबद्दलच्या प्रेमाचे Happy

मस्तच जागू Happy झब्बू देऊ का? Happy

त्यापेक्षा जास्त कौतुक वाटते... तुझ्या निसर्गाबद्दलच्या प्रेमाचे>>>>लाजो +१

एक नंबर फोटो आहेत. Happy
<<ड्वायलाक पण लिहायचे ना..<< +१
अग्दी "काय गं ए भवाने, माझ्या घरट्यात घुसतेस" असेही चालेल. Proud

जागुकी पारखी नजर और... ! सेनाच्या या डाय्लॉगबद्दल 1050.png मान गये!

Pages