पेरणीस्तव योग्य ही वाळू किती ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 July, 2012 - 23:21

भावनांचा भार सांभाळू किती...
आसवांचे वाहणे टाळू किती ?

दु:ख होते, दु:ख आहे सोबती...
पाहुण्या सौख्यावरी भाळू किती ?

'ल्यायचे नाही म्हणे सौभाग्यही'
जाचणारे हे नियम पाळू किती ?

श्वास येतो, श्वास जातो आजही...
भूतकाळाशीच घोटाळू किती ?

या जिण्याला अर्थ दे, वा प्राण घे...
आठवांना सांग कवटाळू किती ?

ठेव निष्ठा गावच्या मातीवरी...
पेरणीस्तव योग्य ही वाळू किती ?

-सुप्रिया.

गुलमोहर: 

<<<विशेष आवडली नाही>>>>१००% सहमत सरजी Happy

मयुरेश,
शामजी...:-)
योगुली ,
नानुभाऊ ,
अरविंदजी

मनःपुर्वक धन्यवाद!

-सुप्रिया.

वास्तवाला अर्थ दे, वा प्राण घे...
आठवांना सांग कवटाळू किती ?<<<

आशा आहे की '१००% सहमत' हा आपला प्रतिसाद रागावून दिलेला नसावा . मी मनमोकळेपणाने वाटले ते लिहिले.

वरील शेराबाबत :

वास्तव म्हणजे सत्य! सत्याला अर्थ असतोच. येथे बहुधा 'सध्याच्या अस्तित्वाला, आयुष्याला अर्थ दे' असे अभिप्रेत असावे. (म्हणजे भूतकाळातील आठवणी किती कवटाळत बसू? सध्याच्या आयुष्यालाही काही अर्थ दे ना - असे म्हणायचे असावे असा माझा अंदाज आहे).

सध्याचे आयुष्य, जिणे याला उद्देशून 'वास्तव' हा शब्द नीटसा लागू होणार नाही असे माझे मत! किंवा पहिल्या ओळीत वास्तव आले तर दुसर्‍या ओळीत 'आठवांना' ऐवजी 'मी भ्रमांना सांग कवटाळू किती' असे यायला हवे असे वाटते. वास्तव या शब्दाशी भ्रम, अवास्तव, स्वप्ने, कल्पनाविलास असे शब्द जुळतात तर आठवे या शब्दाशी वर्तमान, भविष्य असे काही शब्द जुळतील. (आठवेसुद्धा त्या त्या क्षणी वास्तवच होती ना? ) Happy

चिकित्सकपणे लिहिण्याचे कारण असे की शेर अचूक आहे की नाही याबाबत दिलखुलास चर्चा व्हावी असे वाटते.

बेफीजी नेमके कुठे काय कमी पडतय ते कळत नव्हत...

आपल्या सविस्तर चर्चेबद्दल अन सुचवलेल्या बदलाबद्दल शतशः आभार सर,

योग्य बदल केले आहेत Happy

<<<आशा आहे की '१००% सहमत' हा आपला प्रतिसाद रागावून दिलेला नसावा>>>> छे! एवढ्या-तेवढ्याला रागवायच काय ?

-सुप्रिया.

ठेव निष्ठा गावच्या मातीवरी...
पेरणीस्तव योग्य ही वाळू किती ?

मस्त
जबराट
_____________

आधी 'ही' भरीचा वाटत होता मग ...'पेरणीस्तव योग्य वाळूही किती'... असा वाचून पाहिला

नाही ताई कफिया नाही ...........
मी अर्थासाठी तसे केले .तो माझ्यापुरता अधिक स्पष्ट व्हावा याकरता मी तसे वाचून पाहिले फक्त

ओ.के. Happy

शेर प्रामाणिक किंवा आपबीती असलेले आहेत हे दिसून येत आहे परंतू शेरांत अपेक्षेइतके 'वजन' नाहीये हे म्हणावेसे वाटते.

सुप्रिया राग मानू नयेत.

शुभेच्छा Happy

विदिपा....१०१ % सहमत Happy

(अवांतर- मी खरच रागीट नाही Happy )

-सुप्रिया.