वास्तवाचाही स्वप्नामध्ये....!

Submitted by सुधाकर.. on 17 July, 2012 - 10:52

अष्टोप्रहर झिजून येथे, रचली होती स्वप्नांची.. एक लगोरी
पण गनिमांचा या, तिलाच नेमके टिपण्याचा एक प्रयत्न होता.

-----------------------------------------------------------------

गझल -१
------------

या वास्तवाचाही स्वप्नांमध्येच, प्रवेशण्याचा एक प्रयत्न होता
अन माझ्याचमधला वेडा मी तो शोधण्याचा एक प्रयत्न होता?

तू म्हणतेस माझ्या डोळ्यातला तो दिवास्वप्नांचा भास होता.
पण मनातल्या या भूतकाळाला खोदण्याचा एक प्रयत्न होता.

तो कटाक्ष केवढा लाघवी होता जो मनाला.. स्पर्शून गेला
का तुझाच तो ही, जादुगारी मन वेधण्याचा एक प्रयत्न होता ?

हरताना हा प्रत्यक डाव, हसलो मी.. विजयाच्याच उन्मादाने
पण संयमाने तो, दु:खास सुख संबोधण्याचा एक प्रयत्न होता.

मी बोललो स्पष्ट एकदा, चिरावे.. जसे विजेने अंधाराला
तो काळोखाच्या अवकाशालाच भेदण्याचा एक प्रयत्न होता.

तो कोणता वसंत होता, जो फ़क्त तुझी.. स्वप्नेच घेऊन आला?
की, त्याचाही तो, काळीज माझे छेदण्याचा एक प्रयत्न होता?

गझल -२
----------

घाव दिले जगण्याने, तरी दु:खास.. उरण्याचा एक प्रयत्न होता
डाव गेले उलटून, तरी विजेता.. ठरण्याचा एक प्रयत्न होता

दोष दिला पायांनी, मातीस तरी.. या, काही न बोलल्या वाटा
घायाळ पायांचा तो, दु:ख हलके करण्याचा एक प्रयत्न होता.

हरवूनी मजला, जिंकण्याचा, तुझाही.. तो हर्ष केवढा होता
जो जिंकताना मी, तुझ्याचसाठी हरण्याचा एक प्रयत्न होता.

त्या निंदकांच्याच, सोबतीने, सदा राहीलो..मी याच कारणा
दोष काढुनी माझा सत्वापुरते उरण्याचा एक प्रयत्न होता.

त्सुनामीत तू, दिलास हात, वाटलो.. मीच एक ओळखीचा म्हणुनी
पण बुडताना मज कळले, तुझाच तो तरण्याचा एक प्रयत्न होता.

गझल -- ३
---------------

सुकलेल्या फ़ूला फ़ूलाला पुन्हा फ़ुलवण्याचा एक प्रयत्न होता
विझता विझता स्वत:लाच तो पुन्हा हसवण्याचा एक प्रयत्न होता.

कळून सारे, उगा पुन्हा मी हसताना, का तुला भासलो वेडा?
हे दु:ख विसरण्या, स्वत:लाही तो फ़सवण्याचा एक प्रयत्न होता.

शब्दाने वाढला शब्द जरी, वादाचा ना होता प्रश्न कुठे?
तू मला नि मी तुला हा आतून समजण्याचा एक प्रयत्न होता.

सत्य शोधण्या, वणवण फ़िरलो दशदिशा,तेंव्हा मजला कळून चुकले
कुठेच न्हवते त्या गाण्याला हा रुजवण्याचा एक प्रयत्न होता.

गायलेस तू मंजुळ गाणे परंतू माझ्याच मी भानात न्हवतो..
पुरात विस्कटल्या प्रवाहाला तो जुळवण्याचा एक प्रयत्न होता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मात्रावृत्तात बरं लिहितोस रे .............

प्रयत्न काबिलेतारीफ ...!!
ही रदीफ आणि हे लाम्बलचक वृत्त निभावताना खयालाचा दर्जा जरा उणावतोय/ हातातून काहीतरी निसटतंय असं नाही का जाणावत तुला?
मला अगदी जराजरा तसं जाणवतय (हे माझं व्यक्तिगत फीलिंग असण्याची ९९.९९%शक्यता आहे )

असो अभिनंदन रे ऑर्फी !!
पुलेशु!!
Happy

हा ऑर्फियस आणि ते देवपूरकर याना एका मिक्सरमध्ये घातले पाहिजे.

( ऑर्फियस कडे खयाल चांगले आणि छंदोबद्धता टुकार असते. देवपूरकरांकडे खयाल टुकार आणि छंदोबद्धता चांगली असते... Proud दोघाना मिक्सरमध्ये मिसळून एक चांगला शायर तयार करता येईल .. Proud )

मिक्सरमध्ये मिसळून ....?????

त्यापेक्षा ग्रायंडर मधे कुटावं का? .... ( खयाल म्हणतो मी ) Wink

कमळाक्का ... मी कातडीने जाड आणि देवपुरकर हडाने मोठ्ठे आहेत. त्यामुळे मिक्सर तुमच्याच घरातला घ्या..
.............हो! कारण पुन्हा शायर प्लेट खाताना माझा एखादा काफिया नाहीतर देवपुरकरांचा आख्खाच्या आख्खा
मतला नरड्यात आडकायचा.... Lol