साकव

Submitted by बेफ़िकीर on 17 July, 2012 - 04:33

प्रत्येकाच्या इच्छेशी अपुल्या इच्छा जुळवत बसणे
जुळल्या तर जुळल्या नाही तर भिन्नतेस मिरवत बसणे

असण्यासाठी असणार्‍याने काही केलेले नसते
नसण्यासाठी मात्र इथे असणे हे आवश्यक असते

आल्यानंतर आहे म्हणुनी असण्याचा उत्सव होतो
अस्तित्वाचा असणे नसणे यामधला साकव होतो

नदी वाहते म्हणून असतो पूल, पुलाला समजेना
'मी असल्याने नदी वाहते' गर्व पुलाचा संपेना

नदी तिच्या वळणावळणावर पूल जरूरीचे करते
त्या एकाच नदीवर सृष्टी लाख पुलांची अवतरते

मग ते पूल पुलांशी आजूबाजूच्या... इच्छा जुळवत
विजयोन्मादाने म्हणती मी पहा नदी नेली वळवत

इच्छा जुळली नाही तर मग भिन्नतेस मिरवत बसती
पैलतिरावर भिन्न ठिकाणी एकटेच पोचत हसती

भूकंप किंवा पूररुपाने दैव पुलांवरती रुसते
कोसळणारे पूल पाहुनी नदी निगर्वाने हसते
असण्यासाठी असणार्‍याने काही केलेले नसते
नसण्यासाठी मात्र इथे असणे हे आवश्यक असते

इच्छा जुळवत असताना दैवाची इच्छाही आठव
असणे नसणे असते म्हणुनी त्यांच्यामधला तू साकव

असणे नसणे असते म्हणुनी त्यांच्यामधला तू साकव

====================================================

-'बेफिकीर'!

(साकव = पूल)

गुलमोहर: 

व्वा!!!

अगदी ओघवती,

असण्यासाठी असणार्‍याने काही केलेले नसते
नसण्यासाठी मात्र इथे असणे हे आवश्यक असते

आल्यानंतर आहे म्हणुनी असण्याचा उत्सव होतो
अस्तित्वाचा असणे नसणे यामधला साकव होतो

इच्छा जुळली नाही तर मग भिन्नतेस मिरवत बसती
पैलतिरावर भिन्न ठिकाणी एकटेच पोचत हसती

इच्छा जुळली नाही तर मग भिन्नतेस मिरवत बसती
पैलतिरावर भिन्न ठिकाणी एकटेच पोचत हसती

क्या बात...अफाट अफाट!

प्रत्येकाच्या इच्छेशी अपुल्या इच्छा जुळवत बसणे
जुळल्या तर जुळल्या नाही तर भिन्नतेस मिरवत बसणे >> वाह!

इच्छा जुळवत असताना दैवाची इच्छाही आठव
असणे नसणे असते म्हणुनी त्यांच्यामधला तू साकव >> क्या बात है!

वाह.. भन्नाट! Happy

इच्छा जुळवत असताना दैवाची इच्छाही आठव
असणे नसणे असते म्हणुनी त्यांच्यामधला तू साकव... व्वा. छानै.

आल्यानंतर आहे म्हणुनी असण्याचा उत्सव होतो
अस्तित्वाचा असणे नसणे यामधला साकव होतो

व्वा !! क्या बात... मस्तच.

खूपच सुंदर...!

नदी तिच्या वळणावळणावर पूल जरूरीचे करते.... नदी करते हे कोणत्या अर्थाने आहे?

वेगळाच आशय, विषय छान मांडलाय.
कविता आवडली.
"आल्यानंतर आहे म्हणुनी असण्याचा उत्सव होतो
अस्तित्वाचा असणे नसणे यामधला साकव होतो" >>> हे सर्वाधिक आवडलं.

__/\__