ऊर्जा

Submitted by विनिता.झक्कास on 17 July, 2012 - 03:44

घरात एकटी राहणारी म्हातारी माणसे कदाचित अशीच राहत असतील
त्यांना सप्रेम अर्पण...

ऊर्जा

भर दुपार, आकाशात तळपणारा सूर्य
वातावरणात भयानक उकाडा
काळाकुट्ट डांबरी रस्ता, गरम लाटा फेकणारा
सर्वत्र विचित्र शांतता, झाडे ही निस्तब्ध उभी
तितक्याच स्तब्धपणे पाहते आहे,
खिडकीत बसलेली म्हातारी!
मधेच एक उसासा सोडते, काहीतरी पुटपुटते
बाहेरच्या वातावरणा प्रमाणे तिचे घर ही शांत आहे
चारा आणायला गेलेली पाखरे संध्याकाळी घरट्यात परततील
मग घर गजबजून जाईल, म्हातारी हसेल, बोलेल, रमून जाईल
जमवून ठेवेल ऊर्जा....
उद्याचा निस्तब्ध दिवस ढकलण्यासाठी!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अह्हाहाहा मस्त सह्ही जाम आवडली
क्या बात !!
बहोत बढिया !!

मग घर गजबजून जाईल, म्हातारी हसेल, बोलेल, रमून जाईल
जमवून ठेवेल ऊर्जा....
उद्याचा निस्तब्ध दिवस ढकलण्यासाठी!!!>>>>>>>>>>>>>>>काय सही दी एण्ड केलात वा वा

असाच प्रतिसाद देत राहा>>>>>>>>>

मला दरवेळी गॄहित धरू नका .............. लिखाण चांगलं असो नसो मला आवडलं की मी तारीफ करतोच ......बाकी तज्ञ मायबोलीकर आहेतच
आपणास इथे भरघोस मार्गदर्शन मिळेल याची खात्री बाळगा
लिहित रहा प्रकाशित करीत रहा
पुलेशु
आपला
शुभेच्छुक

-वैवकु

लिहित रहा प्रकाशित करीत रहा>>>>>दुसर्‍यांच्या कविता वाचा आणि त्यानासुद्धा प्रतिसाद देत रहा.
कविता आवडली.

वैभव

असाच प्रतिसाद ...म्हणजे आपला अभिप्राय
चांगलेच म्हणा असा आग्रह नाही

मकरंद
धन्यवाद. मी पण दुसऱ्यांना प्रतिसाद देतेच

धन्यवाद , जय.
माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई घरात एकट्याच असायच्या त्यावरून हि कविता लिहिली आहे

मग घर गजबजून जाईल, म्हातारी हसेल, बोलेल, रमून जाईल
जमवून ठेवेल ऊर्जा....
उद्याचा निस्तब्ध दिवस ढकलण्यासाठी!!! >>> व्वा मस्तच. अप्रतिम कविता पु.ले.शु.