मुक्तके

Submitted by भरत कुलकर्णी on 17 July, 2012 - 03:40

अगदी पहाटे पहाटे
रात्र पेंगुळली
शेवटी सुर्य उगवला
अन मग ती झोपी गेली

दुर कोठेतरी
रानातला वारा
कानात बोलला
अरे बघ तरी
किती छान
पाऊस पडला

नदी म्हटली
बाळांनो
वाळूसाठी खड्डे
खणू नका हो
न जाणो
कधीतरी तुम्हीच
त्यात पडाल

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ही रचना अशी वाचल्यास अधिक सुलभ होते !!

अगदी पहाटे पहाटे रात्र पेंगुळली , शेवटी सुर्य उगवला अन मग ती झोपी गेली !!
दुर कोठेतरी रानातला वारा कानात बोलला "अरे बघ तरी किती छान पाऊस पडला".
नदी म्हटली "बाळांनो वाळूसाठी खड्डे खणू नका हो... न जाणो कधीतरी तुम्हीच त्यात पडाल !!!"

सहजसुन्दर विचार...... साधीसोपी भाषा .......त्याहुनही शब्दोशब्दी दिसते आहे ते कवीचे साधेभोळे मन ही या रचनेची बलस्थाने आहेत

रचना आवडली

भरतराव, ही मुक्तके नसून मुक्तछंद आहे Happy

>>>दुर कोठेतरी
रानातला वारा
कानात बोलला<<< छान लिहिले आहे

नदी म्हणाली............. त वास्तवदर्शी लेखन केले आहे
त्याही ओळी वाखाण ण्याजोग्या आहेत