Submitted by Kiran.. on 15 July, 2012 - 14:52
झाडाखालच्या फळ्यावरच्या
उभ्या आडव्या रेषा
जमिनीवर उमटल्यात
ओस पडलेली शाळा
माळावरची रणरण
कुठे वैरण कुठे वणवण
चिमुकल्यांच्या हातातले दुभते कासे
आणि पायाखाली चटकती खाटीकवाट
किती ओढ देशील ?
कोळ्याची जळमटं
कपाळावर चढलीत
डोळ्यातल्या भेगा रुंदावल्यात इतक्या
कि टिप्पूससुद्धा एखादा ठरत नाही थेंबाचा !
आलाच नाहीस तर विझतोय .. फडफडता दिवा
आलास तर बुडवशील.. माझ्या गावा
एक भिंत डोंगरात उभी राहील
आणि
स्वप्नांची समाधी खोल खोल जाईल
तेव्हां
बाहेर आणि डोळ्यातही कोसळसरी असतील
मात्र.. उताराउतारावर झगमगणा-या
लाखो दिव्यांसाठी तरी..
आवंढा गिळून विचारतोय... या दुश्मनदोस्ताला
किती ओढ देशील ?
- Kiran..
गुलमोहर:
शेअर करा
डोळ्यातल्या भेगा रुंदावल्यात
डोळ्यातल्या भेगा रुंदावल्यात इतक्या
कि टिप्पूससुद्धा एखादा ठरत नाही थेंबाचा !
परिणामकारक, विलक्षण सुंदर कविता.
(No subject)
अप्रतिम!!! ही अश्शीच व्यथा
अप्रतिम!!!
आता तरी याने दुश्मनी सोडून दोस्ती निभावण्यासाठी यावेच.
ही अश्शीच व्यथा वाचली होती मागच्या आठवड्यात एका शेतात मशागत करून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या मावशींच्या शब्दांत...
खुपच मस्त... आवडली
खुपच मस्त...
आवडली
किरण, सुरेखच रे ! फार प्रभावी
किरण, सुरेखच रे ! फार प्रभावी झाली आहे. शेतकरी कशाला, आता तर सगळेच वाट बघताहेत.
छान
छान
आभारी आहे.
आभारी आहे.
'झाडाखालच्या फळ्यावरच्या
'झाडाखालच्या फळ्यावरच्या
उभ्या आडव्या रेषा
जमिनीवर उमटल्यात
ओस पडलेली शाळा
माळावरची रणरण
कुठे वैरण कुठे वणवण
चिमुकल्यांच्या हातातले दुभते कासे
आणि पायाखाली चटकती खाटीकवाट'
नि:शब्द.
आवडली. <<आवंढा गिळून
आवडली.
<<आवंढा गिळून विचारतोय... या दुश्मनदोस्ताला >> सुरेख.
<<मात्र.. उताराउतारावर झगमगणा-या लाखो दिव्यांसाठी तरी>> कळले नाही.
आलाच नाहीस तर विझतोय ..
आलाच नाहीस तर विझतोय .. फडफडता दिवा
आलास तर बुडवशील.. माझ्या गावा>>>>>>अप्रतिम.... आणि कविताही.
सुसुकु धरणग्रस्त शेतक-याच्या
सुसुकु
धरणग्रस्त शेतक-याच्या नजरेतून पहा
(उद्या धरण झाल्यावर खाली उताराला वीज, पाणी मिळणार आहे )
छान! ..आवडली.
छान! ..आवडली.
मस्त, आवडली.....
मस्त, आवडली.....
--
--
आजच्या दुष्काळाच्या
आजच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कवितेची आठवण झाली.