वर्षानुवर्षं सकाळी उठून चहा/ कॉफी घेण्याची जवळजवळ प्रत्येकाला सवय असते. तीच चव.. साधारण तीच वेळ.. आणि बहुतेकदा जागाही तीच, फक्त काही ठराविक काळानंतर 'कप' बदलतो. तसंच अगदी तसंच.. वर्षानुवर्षं रोज सकाळी जाग आल्यावर प्रेमत्रिकोणाची कॉकटेल घ्यायची बॉलीवूडकरांचीही जुनी सवय आहे. फक्त ठराविक काळानंतर इथेही पिण्याचा 'ग्लास' बदलत जातो..
'होमी अदाजानिया' दिग्दर्शित नवीन ग्लासातल्या जुन्या "कॉकटेल" मधली मिश्रणं आहेत -
गौतम (सैफ अली खान) - एक महाफ्लर्ट पंजाबी लौंढा
वेरॉनिका (दीपिका पडुकोण) - एक टिपिकल बिघडलेली श्रीमंत बापाची व्यसनाधीन मुलगी
मीरा (डायना पेंटी) - एक टिपिकल 'शादी मटेरीअल' मुलगी
तिघेही मूळचे दिल्लीकर, लंडनमध्ये एकमेकांना भेटतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर गौतम नोकरीनिमित्त लंडनमध्ये असतो, तर फोटोग्राफर वेरॉनिका (बहुतेक तरी) फक्त अय्याशी करण्यासाठी. मीरा, तिला सोडून लंडनला आलेल्या तिच्या नवऱ्याला (रणदीप हूडा) शोधण्यासाठी तिथे येते, पण तिचा नवरा तिला अपमानित वगैरे करून हाकलून वगैरे देतो. अपमानित, असहाय्य आणि हताश मीराला वेरॉनिका आधार देते. स्वत:च्या घरी घेऊन येते. एअरपोर्टवरच तिला ‘भिडलेल्या’ गौतमबाबत मीरा जेव्हा वेरॉनिकाला सांगते, तेव्हा वेरॉनिका जाऊन गौतमला ‘भिडते’. पुढे गौतम आणि वेरॉनिका आपापल्या चारित्र्या(?)शी प्रामाणिक राहून एकमेकांसोबत ‘झोपतात’. (सिनेमात असंच वारंवार म्हटलं आहे, मी ऐकताना लाजलो नाही… लिहिताना का लाजू?)
गौतम, वेरॉनिका आणि मीरा एकत्र राहू लागतात आणि अश्यातच गौतमची आई (डिंपल कपाडिया) लंडनला अवतरते. तिच्या समाधानासाठी मीराला गौतमच्या होणाऱ्या बायकोचं सोंग वठवावं लागतं. हे सोंग करता करता गौतम आणि मीरा खरोखरच प्रेमात पडतात, तर दुसरीकडे वेरॉनिकाही गौतमवर प्रेम करू लागते.
बस्स फिर वोही घीसी-पिटी कहानी.... मीरा-गौतम-वेरॉनिका की जुबानी....!
बहुतांश सिनेमा वास्तवाचं भान ठेवून पुढे सरकत जातो. अनेक ठिकाणी पडद्यावरील व्यक्तिरेखा आपल्याला कधी तरी पाहिलेल्या, अनुभवलेल्या किंवा जगलेल्याही वाटतात, ही 'हाताळणी'ची जमेची बाजू. पण अनेक अनावश्यक फाटे उगाचच सिनेमा रेंगाळवतात. त्यात ती हार्मोनियमच्या शेवटच्या सप्तकात सुरू होऊन तिथेच कुठे तरी गोल-गोल फिरून मग संपणारी कर्णकर्कश्य गाणी तुम्हाला सिनेमात भावनिक ओढाताणीमुळे डिस्टर्ब झालेल्या पात्रांपेक्षा जास्त डिस्टर्ब करतात. (अपवाद – तुम ही दिन ढले…)
गौतमच्या भूमिकेत सैफ अली खानचा वावर खूप नैसर्गिक वाटतो, पण नवाब साहेबांचं वय लपत नाही.
डायना पेंटीला मीराच्या भूमिकेत चांगलं काम करायला खूप वाव होता, पण 'मीरा वाया गेली.'
दीपिका पडुकोण 'वेरॉनिका' जगते आणि जगवते. तसं पाहाता, ही परीक्षा देण्यासाठी तिला हवं तेव्हढं 'स्टडी मटेरीअल' बाजारात उपलब्ध झालं असेल; पण शेवटी अभ्यासही करावाच लागतो आणि तो तिने केलेला दिसला. एरव्ही मला तिचं ते भुवया आकुंचित करून बोलणं अजिबात आवडत नाही, पण इथे ते फारसं जाणवलं नाही. आत्तापर्यंतच्या छोट्याश्या कारकीर्दीत दीपिकाने केलेलं 'वेरॉनिका' हे सर्वोत्कृष्ट काम असावं.
सिनेमा लंडनमध्ये का घडतो? - उगाच..
शेवट दिल्लीत का होतो ? - उगाच..
बोमन इराणी आणि डिंपल सारखे दिग्गज सिनेमात का आहेत ? - उगाच..
अश्या अजून काही 'उगाच' गोष्टी असल्या तरी तीच व्होडका आणि तीच व्हिस्की ओतून बनवलेलं तेच 'कॉकटेल' एकदा घेऊन बघण्यास हरकत नसावी. (कारण सिनेमापूर्वी आणि मध्यंतरानंतर 'कॉकटेल' ड्रिंकिंग इज इन्ज्युरिअस टू हेल्थ अशी सूचना केली जात नाही!!)
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/cocktail-movie-review.html
थोडक्यात आनि मस्त लिहल आहे
थोडक्यात आनि मस्त लिहल आहे
दीपिका पडुकोण 'वेरॉनिका' जगते आणि जगवते. >>>>>>>>>> प्रीविह्यु पाहुन मला पण असच वाटत होत..
....
:स्मित:....
पहिला भाग जबरदस्त
पहिला भाग जबरदस्त मनोरंजनात्मक होता...दुसर्या भागात स्लो झाला फार.... दुसर्याभागाची स्क्रिप्टवर मेहनत घेतली नाही...बस काहीही करुन नेहमीच्या थांब्यापर्यंत रेटायचीच आहे..या मानसिकतेने दुसरा भाग लिहिला गेला आहे... पहिल्याभागातच पैसे वसुल...विशेषतः "शीला की जवानी" या प्रसंगात तर धमाल आहे..:हाहा:
.
.
चित्रपट एका विशिष्ट वर्गात राहणार्या लोकांच्या मानसिकतेवर आहे...त्यामुळे जे असल्याप्रकारातुन गेलेच नाहीत अथवा गंध ही नाही त्यांना हा चित्रपट बिल्कुलच पटणारा नाही आहे...;)
आज पाहिला. ठिके टाईमपास. थोडा
आज पाहिला. ठिके टाईमपास. थोडा कापला असता सिनेमा तर बरे पडले असते.
बोमन इराणीला हात जोडले. कालच फेरारी पाहिला, आज हा. गुणी अभिनेता आहे खरंच.
डायना पेंटी बरी वाटली. निदान थोडी कोवळिक आहे चेहर्यात.
दिपिकाही बरीये की यात.
संवाद टाळीखाऊ आणि हशाखाऊ. (काही चक्कं दाद देण्यासारखे वाटले). पण दर तिन शब्दानंतर इंग्रजी शब्द वापरतात ते सिनेमा लंडनात घडतो म्हणुन की काय कोण जाणे.
वैताग होता तो.
यांना कोणालाही रीतसर कामधंदे का नस्तात आणि एवढी ऐश करायला वेळ कुठुन मिळतो हा बोर सनातन प्रश्न पडलाच. तरी बरं त्या मीराच्या व्हिसाचे लॉजिकल स्पष्टीकरण ऐकुन दिल भर आया.
तिलाही लगेच नोकरी मिळते. मज्जाय.
इथे चित्रपट गृहात पडद्यावर
Smoking and alcohol is injurious to health. असे लिहीले होते पण ऑडियो मात्र फक्त Smoking is injurious to health एवढेच. ३ दा झाला हा प्रकार :फिदी
Smoking is injurious to
Smoking is injurious to health एवढेच >>> alcohol नसेल घातक म्हणुन कदाचीत.
Watching Cocktail last night
Watching Cocktail last night was one of the best decisions I’ve made for the past week. I really enjyed the movie... No analysis required, Jus go WATCH !!!
One has to be young n should have lots of love inside him like HomiAdajania to make film like #cocktail it's going to be blockbuster.Saif's tribute to 'sheila kijawani' is MINDBLOWING!". Its deepika's best till date !
( One liner from a friend - Deepika is the hero and Saif is the heroine of the film )
टाइमपास होता बराच वेळ, नंतर
टाइमपास होता बराच वेळ, नंतर कंटाळा आला पण सैफ त्याच्या टिपिकल फ्लर्टी-गुलछबु मोड विथ कॉमेडीका तडका हे पॅकेज होतेच अभुतेक वेळा वर्क तसे, यातही झालय बर्यापैकी :).
दगडी तेलीण दीपिका यात बरी दिसते आणि रोल अल बर्या पैकी फिट वाटली.
नवीन हिरॉइन "आयेशा टाकिया+रिया सेन +असीन" यांचं काँबो वाटते, पण अळणी प्रकारात मोडते अगदी(अर्थात तशीच मुलगी आपेक्षित होती त्या रोल मधे.)
सैफ चा ' शीला कि जवानी 'प्रसंग थेट 'दोस्ताना' च्या' बीडी जलायले 'सीन वरून उचलल्या सारखा वाटला.
दोस्ताना मधेही धम्माल होता तो 'गे पार्टी' सीन आणि मग किरण खेर चे येणे.. तसेच यात त्याच वेळी हिरोच्या आईची (डिंपल ची एंट्री.)
बोमन इराणी आणि डिंपल सीन्स धमाल आहेत.
गाणॅए सगळी 'क्लब ' मधे वाजावीत याच हेतुने बनवलीयेत, पार्टी साँग्ज म्हणून ठिक आहेत.
ओव्हरऑल एकदा बघायला हरकत नाही.
नवीन हिरॉइन "आयेशा
नवीन हिरॉइन "आयेशा टाकिया+रिया सेन +असीन" यांचं काँबो वाटते, पण अळणी प्रकारात मोडते अगदी >>>

ह्या नवीन हिरॉइन्सची नावं उच्चारणं थोडसं धोकादायकच आहे, नाही का ?
मला सिनेमाचा पुर्वार्ध आवडला.
मला सिनेमाचा पुर्वार्ध आवडला. उत्तरार्ध रटाळ आहे.
सगळीच गाणी मला अफाट आवडलीत.
नीलमजी आपला प्रतिसाद माझ्या
नीलमजी
आपला प्रतिसाद माझ्या निवडक दहांत
Smoking and alcohol is
Smoking and alcohol is injurious to health. असे लिहीले होते पण ऑडियो मात्र फक्त Smoking is injurious to health एवढेच. ३ दा झाला हा प्रकार :फिदी
>>>
अगदी अगदी.