मरंददान

Submitted by करकोचा on 14 July, 2012 - 02:25

लाभले तुला अपूर्व रूप मेनकेसमान
दोष काय जर तुला बघून डोलले इमान?

ऊरभेट वस्त्रगाळ शांतवील का तहान?
चंद्र पाहु दे निरभ्र, फेड लाज, देहभान

का उगाच संस्कृतीस ओढतेस आपल्यात?
प्रेमिकांत का कधी अधरसुधा अपेयपान?

नाहतेस चांदण्यात, नाहतेस तू जळात
आज अमृतात प्रीतिच्या करू अचैल स्नान

"गोड गोड बोलण्यास धूप मी न घालणार
माळ घातल्याविना न द्यायची मरंददान"

गुलमोहर: 

वा !! पुरेपुर गझलिश आहे ही रचना
भाषाशैली अत्यन्त प्रासादिक ...गोड .....मधाळ!!
खयाल बेहद रोमॅण्टिक................
आहाहा .............मज्जा आली !!
पुढील लेखनास शुभेछा!!

मरन्द्+दान = मकरन्द +दान = मधाचे दान!! ...................रे ऑर्फी.

सन्दर्भ = गझलसम्राट भटसाहेबान्नी एका शेरात मधाला मरन्द म्हटल्याचे ऐकिवात आहे
बहुधा त्यान्नी हा शब्द नवीन योजला असावा ....मला नक्की माहीत नाही पण आता तो बर्‍यापैकी प्रचलीत आहे असेही ऐकले आहे

भटसाहेब-'मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो
अजून तू अजाण या कुवार कर्दळीपरी
गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी
दूरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो..
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!'

आज माझ्या दिवंगत वडिलांच्या पुण्यतिथीदिवशी माझ्यावर अल्प सहवासात पितृतुल्य प्रेम करून गेलेल्या कविश्रेष्ठांची आठवण करून दिलीत्.त्यांच्या प्रतिभाशाली शब्दांचा पुनरुच्चार करायचा मोह आवरला नाही.धन्स.

अतिशय सुरेख, फुल टू - रोमॅन्टिक कविता.
भारती ताई - भट साहेबांच्या या अतिसुंदर ओळी इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.........

मला अत्ता पुन्हा पुन्हा वाचताना ....हा मराठीतून चाललेला 'नल-दमयन्ती'सन्वाद तर नाहीय ना?.... असे वाटते आहे !!